राष्ट्रवादी शरद पवार गटाला आणखी एक मोठा धक्का, बड्या नेत्याच्या कुटुंबात उभी फूट
राष्ट्रवादी शरद पवार गटाला ऐन विधानसभा निवडणुकीच्या काळात आणखी एक मोठा धक्का बसला आहे. मोठी बातमी समोर आली आहे.
हर्षवर्धन पाटील यांनी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादी शरद पवार गटात प्रवेश केला होता. त्यानंतर लगेचच त्यांना पक्षाकडून इंदापूर विधानसभेची उमेदवारी देखील जाहीर झाली. मात्र हर्षवर्धन पाटील यांना उमेदवारी जाहीर झाल्यामुळे इंदापूर राष्ट्रवादीमधील अनेक पदाधिकारी नाराज आहेत. प्रवीण माने यांनी बंडखोरी करत अपक्ष उमेदवारी अर्ज भरला. तर अप्पासाहेब जगदाळे यांनी महायुतीचे उमेदवार दत्तात्रय भरणे यांना पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला. दरम्यान या धक्क्यांनंतर आता हर्षवर्धन पाटील यांना आणखी एक धक्का बसला आहे. मयूर पाटील यांनी हर्षवर्धन पाटील यांची साथ सोडत प्रवीण माने यांना पांंठिबा जाहीर केला आहे. मयूर पाटील हे हर्षवर्धन पाटील यांचे चूलत बंधू आहेत.
इंदापुरात राजकीय वर्चस्व
हा हर्षवर्धन पाटील यांच्यासोबतच राष्ट्रवादी शरद पवार गटासाठी देखील मोठा धक्का मानला जात आहे. हर्षवर्धन पाटील यांच्या उमेदवारीनंतर पाटील कुटुंबात फूट पडली आहे. त्यांचे बंधू मयूर पाटील यांनी प्रवीण माने यांना पाठिंबा दिला आहे. मयूर पाटील हे इंदापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती असून, त्यांचं इंदापुरात मोठं राजकीय वर्चस्व असल्याचं मानलं जातं. त्यांनी प्रवीण माने यांना पाठिंबा दिला आहे, मयूर पाटील यांच्यासोबतच कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक सचिन देवकर यांनी देखील प्रवीण मानेंच्या परिवर्तन विकास आघाडीला पाठिंबा दिला आहे.
यावेळी बोलताना मयुर पाटील यांनी हर्षवर्धन पाटील यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. हर्षवर्धन पाटील यांना सत्ता त्यांच्या मुला-मुलींच्या हातात द्यायची आहे. कारभारी योग्य असावा असं वाटतं. तुम्ही तालुक्यावर उमेदवार लादला. भाजपमध्ये कोणाचीही गय केली जात नाही. आम्ही राजकीय स्वर्थ बघितलेला नाही, मोठ्या-मोठ्या नेत्यांनी आम्हाला वेळ दिला होता. चार वर्षांपासून माझ्या मनात खदखद होती. मी स्वार्थासाठी राजकारण करत नाही, असं हर्षवर्धन पाटील यांचे चुलत बंधू मयुर पाटील यांनी म्हटलं आहे. हा इंदापुरात राष्ट्रवादी शरद पवार गटासाठी मोठा धक्का माणला जात आहे.
Non Stop LIVE Update