फडणवीसांच्या आणखी एक ड्रीम प्रोजेक्टला ब्रेक, आरे कारशेड, हायपरलूपनंतर नाशिक मेट्रोला स्थगिती?

माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या नाशिकच्या मेट्रो प्रकल्पाला अन्न नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ ब्रेक लावण्याची शक्यता वर्तवली जात (chhagan bhujbal Nashik metro stay) आहे.

फडणवीसांच्या आणखी एक ड्रीम प्रोजेक्टला ब्रेक, आरे कारशेड, हायपरलूपनंतर नाशिक मेट्रोला स्थगिती?
Follow us
| Updated on: Jan 18, 2020 | 9:45 PM

नाशिक : माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या नाशिकच्या मेट्रो प्रकल्पाला अन्न नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ ब्रेक लावण्याची शक्यता वर्तवली जात (chhagan bhujbal Nashik metro stay) आहे. नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री झाल्यानंतर छगन भुजबळ यांनी जिल्हा नियोजन समितीची बैठक घेतली. यावेळी अऩेक काम रखडल्याने भुजबळांनी अधिकाऱ्यांची शाळा घेतली. आधी एवढी कामं शिल्लक आहे. त्यानंतर मेट्रो प्रकल्पाचं बघू असं म्हणत भुजबळांनी ब्रेक मारल्याचे संकेत दिले आहेत.

सुमारे वीस हजार कोटी रुपये खर्च करुन नाशिकमध्ये टायर बेस मेट्रो प्रकल्प सुरु करण्याची घोषणा फडणवीस सरकारने केली होती. या कामासाठी फिजिबिलिटी रिपोर्ट देखील सादर करण्यात आला होता. नाशिक शहराच्या दोन टोकांना जोडल्या जाणाऱ्या या मेट्रोच्या कामासाठी अधिकाऱ्यांना युद्धपातळीवर कामाचे आदेश देण्यात आले होते. मात्र सरकार बदलल्यानंतर आता या कामाला ब्रेक लागण्याची शक्यता वर्तवली जाते (chhagan bhujbal Nashik metro stay) आहे.

जिल्हा नियोजन समितीच्या पहिल्या बैठकीमध्ये मेट्रो प्रकल्प सोडून सगळ्या प्रकल्पावर आणि कामांवर चर्चा झाली. मात्र मेट्रोचा साधा उल्लेख देखील करण्यात आला नाही. अधिकाऱ्यांनी काम केले नाहीत. कोट्यवधींचा निधी पडून आहे. ही परिस्थिती शहरासाठी भयावह आहे, असं म्हणताना छगन भुजबळ यांनी मेट्रो प्रकल्पाबाबत मात्र बघू अशी भूमिका घेतली.

नाशिकसाठी तयार करण्यात आलेल्या मेट्रोचं नाव मेट्रो नियो असे होते. ही मेट्रो नियो ओव्हरहेड ट्रॅक्शनवर चालणार आहे. ही शहराच्या महत्वाच्या टोकांना जोडण्यासाठी प्रोजेक्ट आहे. प्रत्येक मेट्रोसाठी 25 मीटर लांबीचे इलेक्ट्रिक कोच असणार आहे. या कोचमध्ये एकावेळी 240 ते 250 प्रवाशी प्रवास करु शकणार आहे. या पहिल्या टप्प्यात दोन कॉरिडॉर असणार आहे.

यात गंगापूर रोड ते नाशिकरोड असा 22 किलोमीटरचा पहिला रुट आहे. यावर 19 स्टेशन असतील. तर गंगापूर ते मुंबईनाका असा 10 किलोमीटरचा दुसरा रुट असून यावर 10 स्टेशन आहेत. दोन फिडर कोच रुट देखील असणार आहे. दोन्ही रुटसाठी सीबीएस मध्यवर्ती जोडणारं स्टेशन असणार आहे. आरामदायक सिट्स, ऑटोमेटीक दरवाजे असणार आहे. अस असलं, तरी या प्रकल्पाबाबत साशंकता निर्माण झाली आहे.

दरम्यान हा प्रकल्प नाशिककरांच्या हिताचा असून याबाबत अधिकाऱ्यांनी चर्चा करायला हवी. याचे फायदे पालकमंत्र्यांना सांगायला हवेत, असं भाजपच्या खासदार भारती पवार यांनी म्हटलं.

राज्यामध्ये सरकार बदलल्यानंतर, मागच्या सरकारच्या अनेक प्रकल्पांना स्थगिती देण्याचे निर्णय झाले आहेत. मात्र नाशिक दत्तक घेतलेल्या आणि नाशिकमध्ये ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या देवेंद्र फडणवीस यांच्या मेट्रो प्रकल्पाला स्थगिती देण्याच्या हालचाली सुरू आहेत. भाजपच्या आमदार आणि खासदारांमध्ये अस्वस्थता पसरली आहे. याबाबत पुढच्या नियोजन समितीच्या बैठकीत निर्णय होणार का हे बघणे महत्त्वाचं ठरणार (chhagan bhujbal Nashik metro stay) आहे

आधी अपहरण नंतर सरपंच संतोष देशमुखांची हत्या...मस्साजोगची A टू Z स्टोरी
आधी अपहरण नंतर सरपंच संतोष देशमुखांची हत्या...मस्साजोगची A टू Z स्टोरी.
मंत्रिमंडळ विस्तारात नाराजीरावांचा पूर, खातेवाटपाच्या वेळी काय होणार?
मंत्रिमंडळ विस्तारात नाराजीरावांचा पूर, खातेवाटपाच्या वेळी काय होणार?.
भुजबळांचं मंत्रिपद दादांनी मंत्रिपद नाकारलं? भुजबळ मोठा निर्णय घेणार?
भुजबळांचं मंत्रिपद दादांनी मंत्रिपद नाकारलं? भुजबळ मोठा निर्णय घेणार?.
ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर
ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर.
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला.
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?.
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?.
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप.
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.