महाराष्ट्रात पुन्हा भूकंप? ‘राजकारणात काहीही घडू शकतं’, शिवसेनेच्या बड्या नेत्याकडून सूचक इशारा!

| Updated on: Nov 30, 2024 | 6:05 PM

सुत्रांकडून मिळत असलेल्या माहितीनुसार एकनाथ शिंदे हे गृहमंत्रिपदावर अडून बसले आहेत. मात्र दुसरीकडे भाजप देखील गृहमंत्रिपदावरील दावा सोडण्यास तयार नाहीये, यावर प्रतिक्रिया देताना शिवसेना शिंदे गटाच्या नेत्यानं मोठं वक्तव्य केलं आहे.

महाराष्ट्रात पुन्हा भूकंप? राजकारणात काहीही घडू शकतं, शिवसेनेच्या बड्या नेत्याकडून सूचक इशारा!
mahayuti
Follow us on

सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार एकनाथ शिंदे हे गृहमंत्रिपदावर अडून बसले आहेत. गृहमंत्रिपद मिळालं तरच उपमुख्यमंत्रिपद स्विकारणार अशी त्यांची भूमिका आहे. त्यातच ते आता त्यांचं मुळगाव असलेल्या साताऱ्यातील दरे इथे गेले आहेत, त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे. एकनाथ शिंदे हे नाराज असल्याची चर्चा आहे. या सर्व पार्श्वभूमीवर प्रतिक्रिया देताना संजय शिरसाट यांनी मोठं वक्तव्य केलं आहे, शिरसाट यांच्या या वक्तव्यानंतर महाराष्ट्रात पुन्हा एकदा राजकीय भूकंप पहायला मिळणार का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

नेमकं काय म्हणाले संजय सिरसाट? 

नव्या मंत्रिमंडळाचा शपथविधी पाच तारखेपर्यंत होईल अशी अपेक्षा आहे. महायुतीच्या नेत्यांची निवड झाली आहे, मात्र भाजपच्या गटनेत्याच्या निवडीची प्रक्रिया बाकी आहे. एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणीस आणि अजित पवार यांनी पूर्ण निर्णय वरिष्ठांवर सोपवलेला आहे. त्यांचा निर्णय सोमवारपर्यंत येईल आणि त्यानंतर दोन दिवसांमध्ये शपथविधी होईल.

शिंदे साहेब मुख्यमंत्री असतानाही गावी जायचे आताही ते गेलेले आहेत. राजकीय उलाढाली होत आहेत, मुख्यमंत्री कोण यावरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. खातेवाटपावर बोललं जात आहे, याचं उत्तर त्यांना शोधाव लागणार आहे. ते पक्षाचे नेते आहेत, त्यामुळे त्यांना याचं उत्तर शोधण्यासाठी निवांत वेळ हवा असेल, त्यामुळे ते तिथे जाऊन सगळा निर्णय घेतील आणि त्यांचा निर्णय सोमवारी आम्हाला सांगतील, असं शिरसाट यांनी म्हटलं आहे.

दरम्यान पुढे बोलताना ते म्हणाले की, मुख्यमंत्र्यांचे नाव जाहीर झाल्याशिवाय कोणतं खातं कोणाकडे आहे, याचं स्पष्टीकरण देऊ शकत नाही.  प्रायमरी स्टेजवरती चर्चा झाली आहे. फायनल काही झालं नाही, जर मुख्यमंत्री भाजपचा झाला तर गृहखात आमच्याकडे असावं हा आमचा आग्रह आहे. उपमुख्यमंत्री व गृहखात याबाबतचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सोमवारी जाहीर करतील. तोपर्यंत वेट अँड वॉच सोमवारी शिंदे साहेब काय निर्णय घेतील हे कळेल. राजकारणात कधीही काहीही होऊ शकतं. कुठलीही उलथा-पालथ होऊ शकते, याचा नेम नाही.  मात्र जोपर्यंत मुख्यमंत्र्यांच्या नावाची घोषणा केली जात नाही, तोपर्यंत अनिश्चिता आहे, असं शिरसाट यांनी म्हटलं आहे.