डोनेशन घेऊन प्रवेश देणाऱ्या नवी मुंबईतील अपीजय शाळेची चौकशी होणार, बच्चू कडूंचे आदेश
या तक्रारीनुसार शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडूंनी शाळेची चौकशी करून डोनेशन प्रतिबंध कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्याची कारवाई करण्याचे आदेश दिलेत.
नवी मुंबई : नेरूळ येथील Apeejay स्कूल प्राचार्य आणि संस्था चालक यांनी पालकाकडून शाळा प्रवेशासाठी 1,22,201 रुपयांचा डीडी आणि 6457 रुपये ऑनलाईन घेतल्याची तक्रार पालकांनी राज्यमंत्री बच्चू कडू यांच्याकडे केली, या तक्रारीनुसार शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडूंनी शाळेची चौकशी करून डोनेशन प्रतिबंध कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्याची कारवाई करण्याचे आदेश दिलेत.
शाळा प्रवेशासाठी डोनेशन घेणे फौजदारी गुन्हा
The Maharashtra Educational Institutions(Prohibition of Capitation Fee) Act 1987 अंतर्गत अनुदानित किंवा विनाअनुदानित शाळेत शाळा प्रवेशासाठी डोनेशन घेणे फौजदारी गुन्हा आहे. पालक अजय तापकीर यांनी त्याची मुलगी कथा तापकीर हिच्या शाळा प्रवेशावेळी दिलेला डीडी आणि ऑनलाईन पेमेंट याची झेरॉक्स पुरावा म्हणून जोडला.
पालकांचे पैसे परत देण्याची प्रहार विद्यार्थी संघटनेची मागणी
Apeejay स्कूल नेरूळमधील प्राचार्य आणि संस्था चालक यांच्यावर The Maharashtra Educational Institutions(Prohibition of Capitation Fee) Act 1987 अंतर्गत फौजदारी गुन्हा दाखल करून पालकांचे पैसे परत देण्याची मागणी प्रहार विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष अॅड. मनोज टेकाडे यांनी केली.
खासगी शाळांची 15 टक्क्यांनी कमी करण्याचा निर्णय
महाराष्ट्राच्या शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर खासगी शाळांच्या फीमध्ये 15 टक्के फी कपात करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती दिली होती. सुप्रीम कोर्टानं राजस्थान सरकारला दिलेल्या निकषांप्रमाणे महाराष्ट्रातही खासगी शाळांची फी कमी करण्याचा निर्णय घेण्यात आलाय. पालकांनी शाळांची फी 85 टक्के भरावी, असं आवाहन वर्षा गायकवाड यांनी केलं होतं. पालकांना मोठ्या प्रमाणात आशा होती, असं वर्षा गायकवाड म्हणाल्या होत्या. राज्य सरकारच्या या निर्णयामुळे विद्यार्थ्यांना आणि पालकांना दिलासा मिळेल, असं त्या म्हणाल्या होत्या.
संबंधित बातम्या
Apijay School in Navi Mumbai will be investigated for accepting admission with donation, orders of Bachchu Kadu