Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

माथाडी कामगारांना अडवल्यामुळे नरेंद्र पाटील आक्रमक, APMC मार्केट चालू न देण्याचा राज्याला इशारा

माथाडी कामगारांना अडवल्यामुळे माथाडी कामगार नेते नरेंद्र पाटील आक्रमक झाले आहेत. ( maharashtra apmc market narendra patil)

माथाडी कामगारांना अडवल्यामुळे नरेंद्र पाटील आक्रमक, APMC मार्केट चालू न देण्याचा राज्याला इशारा
Navi-Mumbai-APMC-crowd
Follow us
| Updated on: Apr 23, 2021 | 4:13 PM

सातारा : राज्यात कोरोनाचा संसर्ग वाढल्यामुळे लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. वाढत्या रुग्णांची संख्या कमी करण्यासाठी राज्य सरकारने हा निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार नागरिकांना विनाकारण बाहेर पडण्यास मानाई करण्यात आली आहे. तसेच अत्यावश्यक सेवा वगळता अन्य दुकानं सुरु ठेवण्यास बंदी घालण्यात आली आहे. याच नियमानुसार माथाडी कामगारांना अडवल्यामुळे माथाडी कामगार नेते नरेंद्र पाटील (Narendra Patil) आक्रमक झाले आहेत. त्यांनी राज्य सरकारकडून कोणत्याही माथाडी कामगाराला अडवण्यात येऊ नये, अन्यथा एपीएमसी मार्केट चालू देणार नाही, असा इशारा दिला आहे. (APMC market in Maharashtra will not let to open warns Narendra Patil demand AMPC market work should bring in emergency services)

माथाडी कामगारांना अडवले 

नवी मुंबई सानपाडा रेल्वे स्थानकामधील माथाडी कामगार तसेच मापाडी तोलणार यांना अडवण्याचा प्रकार घडला. या कामगारांना रेल्वे स्थानकावर टीसी यांनी अडवले. यावेळी कामगारांना सोडण्याची विनंती केली असता महाराष्ट्र सरकारकडून माथाडी कामगार तसेच Apmc शी संबंधित कर्मचाऱ्यांना प्रवास करण्यास मुभा असल्याच्या सूचना मिळालेल्या नाहीत असे उत्तर देण्यात आले. या प्रकारामुळे नरेंद्र पाटील यांनी आक्रमक होत या प्रकाराचा विरोध केला. तसेच जर माथाडी कामगार आणि मापाडी कामगारांना अडवण्यात येऊ नये. त्यांचा अत्यावश्यक सेवेत समावेश करावा अशी मागणी त्यांनी केली. यानंतर जर माथाडी कामगारांना अडवले तर उद्यापासून (23 एप्रिल) एपीएमसी मार्केट चालू देणार नाही, असा इशाराही नरेंद्र पाटील यांनी दिला. पाटील यांनी फेसबुक लाईव्ह करत वरील मागणी केली आहे.

अत्यावश्यक सेवेत समावेश करण्याची मागणी

नरेंद्र पाटील यांनी काल (22 एप्रिल) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी संवाद साधला होता. त्यांनी Zoom Video conference च्या माध्यमातून माथाडी कामगार, मापाडी तोलणार आणि बाजार समितीच्या सर्व कामांना अत्यावश्यक सेवेत समाविष्ट करावे, अशी विनंती केली होती. तसेच सरकारने त्याबाबतीत आदेश जारी करावेत असेसुद्धा नरेंद्र पाटील यांनी म्हटलं होत.

दरम्यान, 22 एप्रिल रोजी विनंती करुनसुद्धा 23 एप्रिल रोजी माथाडी कामगारांना अडवण्यात आले आहे. त्यामुळे नरेंद्र पाटील यांनी एपीएमसी मार्केट सुरु न करण्याचा इशारा दिला आहे. त्यानंतर आता पुढे काय होणार, याकडे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

इतर बातम्या : Corona Cases and Lockdown News LIVE : ऑक्सिजन एक्स्प्रेस रात्री उशिरा नागपूरला पोहोचणार

Virar Hospital Fire | विरारच्या आगीत पतीचा मृत्यू; बातमी कळताच कोरोनाबाधित पत्नीनेही प्राण सोडले

शरद पवार ऑक्सिजन तुटवड्यावर मार्ग काढण्यासाठी मैदानात, साखर कारखान्यांना निर्मिती करण्याचे आदेश

(APMC market in Maharashtra will not let to open warns Narendra Patil demand AMPC market work should bring in emergency services

वाल्मिक कराडच्या एन्काउंटरच्या सुपारीबाबत खरं असू शकतं - करुणा शर्मा
वाल्मिक कराडच्या एन्काउंटरच्या सुपारीबाबत खरं असू शकतं - करुणा शर्मा.
धीरेंद्र शास्त्री महाराजांनी केलं छत्रपती संभाजीराजेंचं कौतुक
धीरेंद्र शास्त्री महाराजांनी केलं छत्रपती संभाजीराजेंचं कौतुक.
तिसऱ्या दिवशी माझ्यावर खुनाचा गुन्हा..गोरेंनी सांगितली 'ती' मधील घटना
तिसऱ्या दिवशी माझ्यावर खुनाचा गुन्हा..गोरेंनी सांगितली 'ती' मधील घटना.
राज्यातील 'या' भागांना हवामान खात्याचा अलर्ट, पुढील 3 दिवस...
राज्यातील 'या' भागांना हवामान खात्याचा अलर्ट, पुढील 3 दिवस....
धक्कादायक! डीजेच्या आवाजाने तरुणाचा दुर्दैवी मृत्यू?
धक्कादायक! डीजेच्या आवाजाने तरुणाचा दुर्दैवी मृत्यू?.
रायगडचं पालकमंत्रिपद गोगावलेंना नाही; ठाकरेंच्या नेत्यानं कारण सांगितल
रायगडचं पालकमंत्रिपद गोगावलेंना नाही; ठाकरेंच्या नेत्यानं कारण सांगितल.
बॉलीवूडच्या भाईजानचं टेंशन वाढलं; गाडी उडवून देण्याची मिळाली धमकी
बॉलीवूडच्या भाईजानचं टेंशन वाढलं; गाडी उडवून देण्याची मिळाली धमकी.
'पुन्हा भिसे प्रकरण...', 'दीनानाथ' मधील घटनेनंतर चाकणरांची मोठी ग्वाही
'पुन्हा भिसे प्रकरण...', 'दीनानाथ' मधील घटनेनंतर चाकणरांची मोठी ग्वाही.
ढोल वाजवण्यात आणि लेझिम खेळण्यात सुरेश धस रमले
ढोल वाजवण्यात आणि लेझिम खेळण्यात सुरेश धस रमले.
प्रफुल पटेल भाजपसोबत गेल्यावर दाऊदची संपत्ती मुक्त केली; राऊतांची टीका
प्रफुल पटेल भाजपसोबत गेल्यावर दाऊदची संपत्ती मुक्त केली; राऊतांची टीका.