महाराष्ट्र शासनाकडून महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर, पद्मश्री आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या नावाची घोषणा
आज रेवदंडा येथे जाऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पद्मश्री आप्पासाहेब धर्माधिकारी यांची भेट घेत त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.
मुंबई : ज्येष्ठ समाजसेवक आणि निरूपणकार आप्पासाहेब धर्माधिकारी ( Appasaheb Dharmadhikari ) यांना महाराष्ट्र भूषण ( Maharashtra Bhushan ) पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ( CM Eknath Shinde ) यांच्याकडून करण्यात आली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भेट घेऊन शुभेच्छा दिल्या आहे. महाराष्ट्र भूषण निवड समितीने केलेल्या शिफारशीवरून हा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. महाराष्ट्र शासनाच्या वतिने हा पुरस्कार दरवर्षी दिला जातो. 2022 या वर्षाचा पुरस्कार ज्येष्ठ समाजसेवक आणि निरूपणकार आप्पासाहेब धर्माधिकारी यांना देण्यात येणार आहे.
ज्येष्ठ समाजसेवक आणि निरूपणकार अप्पासाहेब धर्माधिकारी यांना यापूर्वी केंद्र सरकारच्या वतिने दिला जाणारा पद्मश्री पुरस्कार देण्यात आला आहे.
आज रेवदंडा येथे जाऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पद्मश्री आप्पासाहेब धर्माधिकारी यांची भेट घेत त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.
गेल्या 30 वर्षाहून अधिक काळापासून पद्मश्री डॉ.दत्तात्रेय तथा आप्पासाहेब धर्माधिकारी हे अंधश्रद्धा, बालमनावर संस्कार यावर मोठे कार्य केले आहे.
याशिवाय आप्पासाहेब धर्माधिकारी विशेष बालसंस्कार बैठका, आदिवासी विभागातील पाड्यांवर व्यसनमुक्ती सारखं मोठे काम केले आहे.
डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या माध्यमातून विविध सामाजिक उपक्रम राबविले जातात. त्यामुळे देशभरात त्यांच्या कार्याची ओळख आहे.
सर्वाधिक वृक्षारोपण करण्याचा विक्रमही त्यांच्या संस्थेच्या नावावर आहे. वेगवेगळ्या उपक्रमाच्या माध्यमातून पर्यावरणपूरक संदेश देण्याचा प्रयत्न नेहमी त्यांच्याकडून होत असतो.
आप्पासाहेब धर्माधिकारी यांनी त्यांचे वडील डॉ. नानासाहेब धर्माधिकारी यांच्या नावाने प्रतिष्ठानच्या माध्यमातून त्यांचे कार्य पुढे सुरू ठेवले आहे. त्याचा प्रसार मोठ्या प्रमाणात झाला आहे.
गावागावात आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्यामाध्यमातून सामाजिक आणि आध्यात्मिक कार्य केले गेले आहे. त्याच माध्यमातून केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांच्यामाध्यमातून दखल घेण्यात आली आहे.