भर पावसात आंदोलन, पेंढरकर कॉलेजवर प्रशासक नेमा, अन्यथा पदवीधर मतदार संघ निवडणूकांवर बहिष्कार
एकीकडे शिक्षण महाग होत असताना सर्वसामान्य कुटुंबातील मुलांना परवडणारे हे महाविद्यालयाचे खाजगीकरण झाल्यास शिक्षण घेणे महाग होईल अशी खंत माजी विद्यार्थ्यांनी यावेळी व्यक्त केली आहे. त्यामुळे कोकण पदवीधर निवडणूकांच्या मतदानावर बहिष्कार टाकण्याच्या घोषणेने राजकीय मंडळींचे इकडे लक्ष जाणार का असा सवाल डोंबिवलीकर विद्यार्थी करीत आहेत.
डोंबिवलीतील के.व्ही.पेंढरकर विनाअनुदानित करण्याचा प्रयत्न व्यवस्थापनाने सुरु केला आहे. शिक्षणाच्या या खाजगीकरणाचा निषेध करण्यासाठी भरपावसात डोंबिवली शिक्षण प्रसारक मंडळाच्या के.व्ही. पेंढरकर महाविद्यालयाच्या शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी आज आंदोलन केले. ज्युनिअर आणि डिग्री कॉलेजच्या प्राध्यापकांसह शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना काम न देता त्यांना वर्गात बसवून ठेवण्याच्या कथित मनमानी कारभाराविरोधात ‘सेव्ह पेंढरकर कॉलेज’ असा नारा देत कॉलेजच्या समोर माजी विद्यार्थी साखळी उपोषणाला बसले आहेत.
डोंबिवलीतील के. व्ही. पेंढरकर कॉलेज विनाअनुदानित करण्याचा व्यवस्थापनाचा प्रयत्न आहे. या महाविद्यालयातील जुनिअर आणि डिग्री कॉलेजच्या प्राध्यापकांसह शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना काम न देता वर्गात बसवून ठेवण्याच्या कथित मनमानी कारभाराविरोधात ‘सेव्ह पेंढरकर कॉलेज’ असा नारा कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी दिला आहे. के. व्ही. पेंढरकर कॉलेजच्या समोर माजी विद्यार्थी साखळी उपोषणाला बसले आहेत. मात्र या गंभीर समस्येकडे राजकारणी आणि इतर कोणीही लक्ष देत नसल्याने आता माजी विद्यार्थी आंदोलन केले आहे. या संघटनांनी येत्या कोकण पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीच्या मतदानावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे.
माजी विद्यार्थी आणि शिक्षक एकवले
डोंबिवली शिक्षक प्रसारक मंडळावर लवकरात लवकर प्रशासक नेमावा अशी मागणी आता जोर धरू लागलेली आहे. जवळपास 80 हजार मतदार या निवडणुकीमध्ये मतदान करू शकतात. मात्र राजकीय मंडळीनी हा विषय गांभीर्याने घेतलेला नाही असा आरोप करीत संघटना आणि माजी विद्यार्थ्यांनी मोठा निर्णय घेतला आहे. आम्ही कोकण पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीत मतदान करणार नाही आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून इतर मतदारांपर्यंत सुद्धा हा मेसेज पोहोचवणार आहोत असे माजी विद्यार्थ्यांनी म्हटले आहे. त्यामुळे आता हे प्रकरण चांगलेच चिघळलेले आहे.