मंत्रिमंडळ बैठकीला जाणार का?, संजय राठोड म्हणाले, तासा-तासाला प्रतिक्रिया काय द्यायची

संजय राठोड हे नॉट रिचेबल होते. मात्र मंगळवारी वाशिममधील पोहरादेवी गडावर (Pohradevi) जाऊन त्यांनी शक्तिप्रदर्शन केलं.

मंत्रिमंडळ बैठकीला जाणार का?, संजय राठोड म्हणाले, तासा-तासाला प्रतिक्रिया काय द्यायची
Sanjay Rathod
Follow us
| Updated on: Feb 24, 2021 | 11:53 AM

नागपूर : वनमंत्री संजय राठोड (Maharashtra Minister Sanjay Rathod) हे नागपूरवरुन मुंबईकडे रवाना झाले आहेत. राज्य मंत्रिमंडळाची (Maharashtra cabinet meeting) आज बैठक होत आहे. या बैठकीला ते प्रत्यक्ष हजर राहणार आहेत. पूजा चव्हाण आत्महत्याप्रकरणानंतर (Pooja Chavan suicide case) संजय राठोड हे नॉट रिचेबल होते. मात्र मंगळवारी वाशिममधील पोहरादेवी गडावर (Pohradevi) जाऊन त्यांनी शक्तिप्रदर्शन केलं. त्यानंतर आज ते नागपूर विमानतळावरुन मुंबईकडे रवाना झाले. (Are you go to the maharashtra cabinet meeting ?, Sanjay Rathod said why are you asking again and again )

दरम्यान, नागपूर विमानतळावर संजय राठोड यांना माध्यमांनी गाठलं. आजच्या बैठकीला हजर राहणार का असा प्रश्न संजय राठोड यांना विचारण्यात आला. त्यावेळी संजय राठोड यांनी माध्यमांना प्रतिक्रिया देणं टाळलं. “दोन तासांपूर्वीच मी माझी प्रतिक्रिया दिली आहे. तासा-तासाला प्रतिक्रिया काय द्यायची?” असा प्रश्न संजय राठोड यांनी विचारला.

सपत्नीक मुंबईकडे रवाना

शिवसेना नेते आणि वनमंत्री संजय राठोड (Sanjay Rathod) मुंबईला रवाना झाले आहेत. यवतमाळमधील निवासस्थानाहून सकाळी साडेनऊ वाजताच्या सुमारास ते सपत्नीक रवाना झाले. मुंबईतील राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीला ते उपस्थित राहणार आहेत. “माझं सुरळीत काम सुरु झालं आहे. माझ्या शासकीय कामांना सुरुवात करतोय. मंत्रिमंडळ बैठकीला मी रवाना होतोय” अशी माहिती राठोडांनी निवासस्थानाहून निघताना दिली. आज दुपारी साडेतीन वाजता सह्याद्री अतिथीगृहावर राज्य मंत्रिमंडळाची बैठक आयोजित करण्यात आली आहे. याआधीच्या बैठकीला राठोड ऑनलाईन उपस्थित राहणार असल्याचं बोललं जात होतं.

मुख्यमंत्र्यांना भेटणार का?

दरम्यान, संजय राठोड यांना पत्रकारांनी मुख्यमंत्र्यांना भेटणार का?, असा सवाल विचारला. त्यावेळी वेळ मारुन नेत मी कॅबिनेट बैठकीसाठी चाललोय, असं म्हणत पत्रकारांच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष केलं. (Maharashtra Minister Sanjay Rathod on Cm uddhav thackeray)

“माझं रितसर काम सुरु झालंय. तसंच माझ्या शासकीय कामांना देखील मी सुरुवात करतोय. त्याच अनुषंगाने मंत्रिमंडळ बैठकीसाठी मी मुंबईला रवाना होतोय”, अशी प्रतिक्रिया त्यांनी माध्यमांना दिली. काल पोहरादेवी इथं हजारोंची गर्दी जमवून ओंगळवाणं शक्तीप्रदर्शन केल्यानंतर आज ते कॅबिनेट बैठकीसाठी हजेरी लावणार का, असा प्रश्न होता. मात्र खुद्द राठोड यांनीच मी मंत्रिमंडळ बैठकीसाठी निघालो असल्याची प्रकिक्रिया दिली आहे.

पोहरादेवी गडावरील गर्दीवर कारवाई करण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश

शिवसेना नेते आणि राज्याचे वनमंत्री संजय राठोड यांनी वाशिमधील पोहरादेवी गडावर जाऊन जगदंबा मातेचं दर्शन घेतलं. पुण्यात पूजा चव्हाण या तरुणीच्या आत्महत्येनंतर तब्बल 16 दिवसांनी राठोड माध्यमांसमोर आले. त्यांनी पोहरादेवी येथे जावून सर्व समाधींची आणि देवीचं दर्शन घेतलं. त्यानंतर होम हवनमध्येही ते सहभागी झाले. यावेळी पोहरादेवी गडावर त्यांच्या समर्थकांची प्रचंड गर्दी उसळली होती. यावरुन विरोधकांकडून ठाकरे सरकारवर निशाणा साधला जात होता. या घटनेची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गंभीर दखल घेतली. त्यांनी याप्रकरणी कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.

संबंधित बातम्या 

संजय राठोड मंत्रिमंडळाच्या बैठकीसाठी मुंबईला, पूजा चव्हाण प्रकरणानंतर पहिल्यांदाच हजेरी

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची भेट घेणार का?, संजय राठोड म्हणाले…

नियम मोडला तर उद्धव ठाकरे आपल्या जवळच्या व्यक्तीलाही सोडत नाहीत: संजय राऊत

(Are you go to the maharashtra cabinet meeting ?, Sanjay Rathod said why are you asking again and again )

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.