Raghav Chadda | ‘अरविंद केजरीवाल आता भाजपाचे प्रतिस्पर्धी’
अरविंद केजरीवाल (Arvind Kejrawal) आता भाजपाचे (BJP) प्रतिस्पर्धी असणार, असे वक्तव्य पंजाबचे आपचे (AAP) सहप्रभारी राघव चढ्ढा यांनी केले आहे. आता आम्ही पंजाबमध्ये रोजगार वाढवण्याचा प्रयत्न करू, पंजाबमध्ये वीज, पाणी, रस्ते, आरोग्य व्यवस्था निर्माण करण्यासाठी प्राधान्य दिले जाणार असल्याचे ते म्हणाले.
अरविंद केजरीवाल (Arvind Kejrawal) आता भाजपाचे (BJP) प्रतिस्पर्धी असणार, असे वक्तव्य पंजाबचे आपचे (AAP) सहप्रभारी राघव चढ्ढा यांनी केले आहे. दिल्ली मॉडेलला पंजाबच्या जनतेने पसंती दिलीय. निवडणुकांमध्ये एकीकडे अधर्म होता तर आमच्याकडे धर्म होता, मुख्यमंत्री म्हणून भगवंत मान यांचे नाव जाहीर केल्याचा आम्हाला फायदा झाला. आपचे भगवंत मान भाषण करण्यासाठी उभे राहिले असताना सर्वात आधी त्यांनी आपल्या आईला मिठी मारली आणि त्यानंतरच भाषणाला सुरुवात केली, अशी आठवण त्यांनी यावेळी सांगितली. ज्यांनी आमच्यावर आरोप केले, चिखलफेक केली ते आज पराभूत झाले आहेत. तर भगवंत मान यांचाही मोठा विजय झाला आहे. आप आता राष्ट्रीय पार्टी झाली आहे. लोकांनी आमच्यावर विश्वास दाखवला. निवडणुकीतला थकवा आता पूर्ण दूर झाला, असे ते यावेळी म्हणाले. तसेच आता आम्ही पंजाबमध्ये रोजगार वाढवण्याचा प्रयत्न करू, पंजाबमध्ये वीज, पाणी, रस्ते, आरोग्य व्यवस्था निर्माण करण्यासाठी प्राधान्य दिले जाणार असल्याचे ते म्हणाले.
Published on: Mar 10, 2022 04:21 PM
Latest Videos