गोपीचंद पडळकर म्हणजे तमासगीर…अरविंद सावंत यांची जहरी टीका; पडळकर यांनी तेव्हा काय केलं होतं ? अरविंद सावंत म्हणाले…
ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत यांनी भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांच्यावर जहरी टीका केली आहे. त्यामध्ये गोपीचंद पडळकर यांना तमासगीर असे सावंत यांनी म्हंटले आहे.
नागपूर : ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत ( Arvind Sawant ) यांनी आमदार गोपीचंद पडळकर ( Gopichand Padalkar ) यांच्यावर सडकून टीका केली आहे. यामध्ये गोपीचंद पडळकर हे तमासगीर असल्याची जहरी टीका अरविंद सावंत यांनी करत गोपीचंद पडळकर यांनी हातात टाळ घेऊन केलेले आंदोलनाची आठवण करून दिली आहे. आजपासून एसटी कर्मचारी हे आंदोलन करीत आहे. आझाद मैदान येथे 16 मागण्यांसाठी एसटी कर्मचारी आझाद मैदानावर आंदोलनाला बसणार आहे. महाविकास आघाडीचे सरकार असतांना गोपीचंद पडळकर यांनी आंदोलन केले होते. एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनात सहभागी होऊन जोरदार हल्लाबोल केला होता. आता त्यांचे सरकार असतांना गोपीचंद पडळकर का बोलत नाही असा सवालही ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत यांनी उपस्थित केला आहे.
अरविंद सावंत यांनी महाविकास आघाडीच्या माध्यमातून उद्धव ठाकरे यांनी 360 कोटी रुपये बाजूला ठेवत मोठा निर्णय घेतल्याचे म्हंटले आहे. एसटी कर्मचारी यांच्यासाठी शिवसेनेच्या मंत्र्यांनी मोठे काम केले आहे.
दिवाकर रावते आणि अनिल परब हे परिवहन मंत्री असतांना त्यांनी सर्वात चांगले काम केले आहे. विविध योजना आणून एसटी कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा देण्याचे काम केले आहे. याशिवाय महिला कंडक्टर यांची नियुक्ती करण्याचे कामही आम्हीच केलं होतं असं अरविंद सावंत यांनी म्हंटलं आहे.
तर ज्या कामगारांचा अपघात झाला होता. त्या कामगारांना कार्यालयातील काम देऊन मार्ग काढला आहे. ज्यामध्ये दिवाकर रावते यांनी आणि नंतर अनिल परब यांनी जे काम केलं तसं काम कुणीच केलं नाही असा दावाही अरविंद सावंत यांनी केला आहे.
मात्र, महाविकास आघाडी सरकार असतांना एसटी कर्मचाऱ्यांना मोठी वाढ देण्यात आली होती. तरीही भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी आंदोलन करत आझाद मैदान येथे आंदोलन केले होते. ते एक तमासगीर असल्याचा टोला अरविंद सावंत यांनी लावला आहे.
याशिवाय विलणीकरनाची मागणी तेव्हा करणारे आता का करत नाही म्हणत गोपीचंद पडळकर, सदाभाऊ खोत यांच्यासह गुणरत्न सदावर्ते यांना टोला लगावला आहे. आजपासून एसटी कर्मचारी हे आझाद मैदान येथे आंदोलन सुरू करणार आहे.
तर दुसऱ्या बाजूला अरविंद सावंत यांनी नागपूर येथे बोलत असतांना आज सलग तिसऱ्या आठवड्यात महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षावर होणाऱ्या सुनावणीवर प्रतिक्रिया दिली आहे. 16 आमदार कायद्याने अपात्र व्हायला हवेत असे मतही सावंत यांनी व्यक्त केले आहे.
घोडेबाजार टाळण्यासाठी पक्षांतर बंदी कायदा आणला गेला, बाहेर राजकीय पक्ष असतो, आणि विधानसभेत हा विधिमंडळ पक्ष असतो त्यामुळे बाहेरच्या लोकांच मत तुम्ही विश्वासात घेणार नाही का ? जे आमदार पडले त्यांचे मत लक्षात घेणार नाही का ? असा सवालही अरविंद सावंत यांनी उपस्थित केला.