अरविंद सावंतांनी बाळासाहेबांचं जुनं व्यंगचित्र ट्विट करून कुणाला दिला इशारा ?

| Updated on: Oct 11, 2022 | 2:03 PM

आत्ताचे राजकारण बघता शिवसेनेत दोन गट पडले आहेत. त्यात उद्धव ठाकरे यांना मशाल हे चिन्ह मिळाले असून त्याच पार्श्वभूमीवर सावंत यांनी हे ट्विट केले आहे.

अरविंद सावंतांनी बाळासाहेबांचं जुनं व्यंगचित्र ट्विट करून कुणाला दिला इशारा ?
Image Credit source: Social Media
Follow us on

Arvidn Sawant : शिवसेनेत (Shivsena) उभी फुट पडल्यानंतर दोन्ही गटांकडून एकमेकांवर टीकेचे बाण सोडले जात आहे. टोकाची टीका करत असतांना थेट पक्षाचे चिन्ह आणि नावं गेल्यानं नव्या नावांचा आणि चिन्हांचा शोध घेण्याची वेळी दोन्ही गटावर आली. त्यातच शिवसेनेने यापूर्वी निवडणूक लढवत असतांना भारतीय जनता पार्टीच्या (BJP) कमळ या निशाणीवर देखील निवडणूक लढवली आहे. याच काळात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी काढलेले एक व्यंगचित्र  (Cartoon) सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ते व्यंगचित्र शिवसेना नेते अरविंद सावंत यांनी ते ट्विट केले आहे. त्यात कमळ धरला त्यावेळी सुखावलात असे एका बाजूच्या चित्रात शीर्षक दिलंय तर दुसऱ्या बाजूला आता मशालीची धग सहन करा असे शीर्षक दिले आहे.

खरंतर अरविंद सावंत यांनी ट्विट केलेले हे व्यंगचित्र 1984 ते 1985 च्या काळात काढल्याचे नमूद केले आहे.

त्यात सावंत यांनी व्यंगचित्र ट्विट करत असतांना “हे वंदनीय हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांनी १९८४/८५ मध्ये काढलेले बोलके व्यंगचित्र… #मशाल” असा आशय लिहिला आहे.

या शिवाय त्यांनी हे ट्विट उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांनी टॅग देखील केले असून मशाल हा हॅशटॅग देखील वापरला आहे.

दिवंगत शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे भारतीय जनता पार्टीच्या चिन्हावर निवडणूक न लढविण्याचा निर्णय घेत मशाल हे चिन्ह हाती घेतल्याचे त्या व्यंगचित्रातून सांगितले होते.

त्यात त्यांनी भाजपवर निशाणा साधत कमळ शिवसेने हाती घेतले त्यावेळी सुखावला होता, आता मात्र शिवसेने हातात मशाल घेतली असून तिची धग सहन करा असा इशारा दिला होता.

आत्ताचे राजकारण बघता शिवसेनेत दोन गट पडले आहेत. त्यात उद्धव ठाकरे यांना मशाल हे चिन्ह मिळाले असून त्याच पार्श्वभूमीवर सावंत यांनी हे ट्विट केले आहे.