Ashadhi Wari 2021 : आषाढी एकादशी निमित्त नगरविकास मंत्री एकनाथ शिंदेंनी टाळ, मृदुंगाच्या तालात धरला ठेका

शिवसेनेचे खासदार राजन विचारे यांच्या संकल्पनेतून ठाण्यात वारकरी भवनाची निर्मिती करण्यात आली आहे. या भवनाचं उद्घाटन आज एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आलं. त्यावेळी वारकऱ्यांसोबत एकनाथ शिंदेही भजनात तल्लीन झाल्याचं पाहायला मिळालं.

Ashadhi Wari 2021 : आषाढी एकादशी निमित्त नगरविकास मंत्री एकनाथ शिंदेंनी टाळ, मृदुंगाच्या तालात धरला ठेका
एकनाथ शिंदे यांचं वाकरऱ्यांसोबत भजन
Follow us
| Updated on: Jul 20, 2021 | 8:21 PM

ठाणे : कोरोना संकटामुळे यंदा आषाढी वारीचा पारंपरिक सोहळा पार पडू शकला नसला तरी राज्यभरात आज भक्तीमय वातावरण पाहायला मिळालं. ठाण्यात पालकमंत्री आणि नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी वारकऱ्यांसमवेत टाळ, मृदुगांच्या तालात विठुरायाचा गजर केला. ठाण्यातील नौपाडा भारात तब्बल 10 वर्षानंतर वारकऱ्यांना त्यांच्या हक्काचं वारकरी भवन मिळालं आहे. शिवसेनेचे खासदार राजन विचारे यांच्या संकल्पनेतून ठाण्यात वारकरी भवनाची निर्मिती करण्यात आली आहे. या भवनाचं उद्घाटन आज एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आलं. त्यावेळी वारकऱ्यांसोबत एकनाथ शिंदेही भजनात तल्लीन झाल्याचं पाहायला मिळालं. (Inauguration of Warkari Bhavan in Thane by Eknath Shinde)

‘वारकरी भवनाचे लोकार्पण करताना तीच इच्छा पूर्ण केल्याची अनुभूती मिळाली. संत शिरोमणी ज्ञानेश्वर माऊली सेवा संघ, ठाणे यांनी गेल्या १० वर्षांपासून शहरात हक्काचं वारकरी भवन असावं अशी मागणी केली होती, याप्रसंगी सेवा संघाच्या सदस्यांनी समाधान व्यक्त केले. खासदार राजन विचारे आणि महापौर नरेश म्हस्के, उपमहापौर पल्लवी कदम, स्थायी समिती सभापती संजय भोईर,नगरसेविका नंदिनी विचारे,शिवसेना महिला आघाडी प्रमुख मीनाक्षी शिंदे,ज्येष्ठ नागरिक संघटनांचे प्रतिनिधी,अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे पदाधिकारी,वारकरी संप्रदायातील ठाणेकर उपस्थित होते’, अशी माहिती एकनाथ शिंदे यांनी ट्विटरवरुन दिली आहे.

मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठ्ठलाची शासकीय महापूजा

आषाढी एकादशीनिमित्त पंढरपुरात विठ्ठल-रखुमाई यांची शासकीय महापूजा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांच्या हस्ते संपन्न झाली. यावेळी विठुमाऊलीच्या जयघोषात मंदिराचा गाभारा दुमदुमून गेला. आज सकाळी पहाटे 3 वाजून 40 मिनिटांनी विठ्ठल-रखुमाई यांची शासकीय महापूजा करण्यात आली. यंदा आषाढी वारीच्या महापूजेसाठी वारकऱ्यांचे प्रतिनिधी म्हणून मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या समवेत विठ्ठल मंदिरातील विणेकरी केशव शिवदास कोलते (वय 71.) आणि इंदुबाई केशव कोलते (वय 60) या दाम्पत्याने महापूजा केली.

“लवकरात लवकर ते वातावरण आपल्याला मिळावे”

“मी भाग्यवान आहे की मला इतक्या जवळून महापूजेचा बहुमान मिळाला. लाखो भाविक कळसाचे दर्शन घेऊन परतत आहेत. मी मोठं काहीही केलेले नाही. तुडुंब पंढरपूर, आनंदाची उधळण असते, ते वातावरण आम्हाला सर्वांना हवंय. लवकरात लवकर ते वातावरण आपल्याला मिळावे, अशी मी विठुराया चरणी प्रार्थना करतो,” असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले.

संबंधित बातम्या : 

Ashadhi Ekadashi 2021 | पंढरपुरात मुख्यमंत्र्यांकडून सपत्नीक विठ्ठल-रखुमाईची शासकीय महापूजा संपन्न

मोठी बातमी ! पंढरपुरात अखेर 300 वारकऱ्यांना परवानगी, विसाव्यापासून मठापर्यंत मानाच्या पालख्या पायी जाणार

Inauguration of Warkari Bhavan in Thane by Eknath Shinde

मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.
मंत्रिमंडळात 39 पैकी 20 नव्या चेहऱ्यांना संधी, बघा कोणाची लागली वर्णी?
मंत्रिमंडळात 39 पैकी 20 नव्या चेहऱ्यांना संधी, बघा कोणाची लागली वर्णी?.
प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन
प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन.
महायुतीचा अखेर मंत्रिमंडळ विस्तार, कोणत्या जिल्ह्यात किती मंत्री?
महायुतीचा अखेर मंत्रिमंडळ विस्तार, कोणत्या जिल्ह्यात किती मंत्री?.
अजित दादांनी आपल्याच मंत्र्यांचे टोचले कान, '... अन्यथा वेगळा निर्णय'
अजित दादांनी आपल्याच मंत्र्यांचे टोचले कान, '... अन्यथा वेगळा निर्णय'.
प्रचंड बहुमतानंतर बहुप्रतिक्षेत मंत्रिमंडळाचा विस्तार, कोणाची वर्णी?
प्रचंड बहुमतानंतर बहुप्रतिक्षेत मंत्रिमंडळाचा विस्तार, कोणाची वर्णी?.
33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ
33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ.
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ.