मराठा आरक्षण प्रश्नावर तीन पक्षांची ठगेगिरी; शेलार म्हणतात, ‘कितने आदमी थे’!

मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून भाजप नेते आशिष शेलार यांनी सत्ताधारी आघाडीवर जोरदार टीका केली. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून तीन पक्षांची राजकीय ठगेगिरी सुरू आहे. (ashish shelar attacks maha vikas aghadi over maratha reservation)

मराठा आरक्षण प्रश्नावर तीन पक्षांची ठगेगिरी; शेलार म्हणतात, 'कितने आदमी थे'!
ashish shelar
Follow us
| Updated on: Jul 11, 2021 | 5:53 PM

कराड: मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून भाजप नेते आशिष शेलार यांनी सत्ताधारी आघाडीवर जोरदार टीका केली. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून तीन पक्षांची राजकीय ठगेगिरी सुरू आहे. त्यांना मराठ्यांना आरक्षणच द्यायचंच नाही, असा आरोप आशिष शेलार यांनी केला आहे. (ashish shelar attacks maha vikas aghadi over maratha reservation)

आशिष शेलार यांनी आज पत्रकार परिषद घेऊन हा आरोप केला. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर खूप चर्चा झाली आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सरकार आणि माध्यमांमध्ये मराठा आरक्षणावर सविस्तर भूमिका मांडली आहे. राज्यांना स्वत:च्या अखत्यारीत आरक्षण देण्यापासून सर्वोच्च न्यायालयाने मज्जाव केलेला नाही. आरक्षणाचा कायदा टिकाऊ करण्यासाठी आयोगाची निर्मिती करण्याची गरज आहे. राज्य स्तरीय आयोगामार्फत ऐतिहासिक, सांख्यकी आणि इम्पिरीकल डेटा जमा केला पाहिजे. त्या आधारावर सरकारने मराठा आरक्षणाचा प्रस्ताव मंजूर करावा. हा प्रस्ताव कॅबिनेटमध्ये मंजूर केल्यावर तो सभागृहात मंजूर करून घ्यावा. नंतर हे विधेयक राष्ट्रपतींकडे गेल्यावर सूचीमध्ये बदल करण्याचा अधिकार केंद्र सरकारला आहे. आरक्षणाबाबतची ही अशी प्रक्रिया आहे. पण हे सरकार शेवटचं पाऊल आधी सांगतं. पायाभरणी न करता इमारत उभी राहिली असं अभासी चित्रं निर्माण करण्याचं पाप केलं जात आहे. हे जाणूनबुजून केलं जात आहे. त्यांना मराठ्यांना आरक्षण द्यायचं नाही. कायदेशीररित्या योग्य टप्पे पूर्ण न करता आरक्षणाबद्दल राज्यकर्ते भ्रम निर्माण करत आहेत, असा आरोप शेलार यांनी केला आहे. केंद्रीय कृषी कायदे रद्द करू म्हणणाऱ्या राष्ट्रवादी आणि शिवसेनेने तर मोदींच्या कृषी कायद्यांना तत्त्वत: मंजुरी दिली आहे. त्यात काही सुधारणा केल्या आहेत, असा टोलाही त्यांनी लगावला.

‘कितने आदमी थे?’

फोन टॅपिंगच्या मुद्द्यावरूनही शेलार यांनी आघाडीवर टीका केली. परवा विधानसभेत एका पक्षाच्या बोलघेवड्या अध्यक्षाने फोन टॅपिंगचा मुद्दा मांडला. तर, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री फोन टॅप करत असल्याचं काल ते लोणावळ्यात बोलल्याचं समजलं. फोन टॅपिंग करताना ‘अमजद खान’ हा त्यांचा कोडवर्ड ठेवला होता. ते जर अमजद खान असतील तर ‘कितने आदमी थे?’, हा आमचा सवाल आहे. तुमचा फोन टॅप करायला मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांसह ‘कितने आदमी थे?’ हे आम्ही विचारत आहोत. जनतेच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करून केवळ टगेगिरीच्या विषयावर लक्ष घातलं जात आहे. त्यातून राज्याचं नुकसान होत आहे. त्यामुळेच आगामी काळात आम्ही सरकारविरोधी एल्गार अधिक तीव्र करणार आहोत, असं त्यांनी सांगितलं.

‘चोर के दाढी में तिनका है’

यावेळी त्यांनी नव्या सहकार खात्यावरही भाष्य केलं. शरद पवारांबद्दल मी बोलणार नाही. ते केंद्रात कृषी मंत्री होते. एनसीडीसी त्यांच्याच अंतर्गत काम करत होती. त्यावर बोलण्याची गरज नाही. आम्ही सहकार से समृद्धी हा व्यापक दृष्टीकोण घेऊन आलो आहे. तो विषय जनतेत येण्याआधीच हस्तक्षेपाची भीती व्यक्त केली जात आहे. याचाच अर्थ ‘चोर के दाढी में तिनका है’, असा दावाही त्यांनी केला. (ashish shelar attacks maha vikas aghadi over maratha reservation)

संबंधित बातम्या:

पंकजा मुंडे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीला, चर्चांना उधाण

पवारसाहेबांनी पटोलेंचा पार पान टपरीवालाच करून टाकला; निलेश राणेंची खोचक टीका

आघाडी एकत्रित निवडणुका लढणार की स्वबळावर?; वाचा बाळसाहेब थोरात काय म्हणाले?

(ashish shelar attacks maha vikas aghadi over maratha reservation)

अजितदादा तिसऱ्या दिवशी विधिमंडळात प्रकटले? नॉटरिचेबल असण्याच कारण समोर
अजितदादा तिसऱ्या दिवशी विधिमंडळात प्रकटले? नॉटरिचेबल असण्याच कारण समोर.
'वन नेशन, वन इलेक्शन' रखडलं, सरकारच्या बाजूनं अन् विरोधात किती जण?
'वन नेशन, वन इलेक्शन' रखडलं, सरकारच्या बाजूनं अन् विरोधात किती जण?.
आधी अपहरण नंतर सरपंच संतोष देशमुखांची हत्या...मस्साजोगची A टू Z स्टोरी
आधी अपहरण नंतर सरपंच संतोष देशमुखांची हत्या...मस्साजोगची A टू Z स्टोरी.
मंत्रिमंडळ विस्तारात नाराजीरावांचा पूर, खातेवाटपाच्या वेळी काय होणार?
मंत्रिमंडळ विस्तारात नाराजीरावांचा पूर, खातेवाटपाच्या वेळी काय होणार?.
भुजबळांचं मंत्रिपद दादांनी मंत्रिपद नाकारलं? भुजबळ मोठा निर्णय घेणार?
भुजबळांचं मंत्रिपद दादांनी मंत्रिपद नाकारलं? भुजबळ मोठा निर्णय घेणार?.
ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर
ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर.
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला.
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?.
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?.
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप.