Nanded Corona : नांदेडमध्ये 11 दिवसांसाठी संचारबंदी, पालकमंत्री अशोक चव्हाण यांची मोठी घोषणा
राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री आणि नांदेडचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी जिल्ह्यात संचारबंदी लागू करण्याची घोषणा केलीय.

नांदेड : राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री आणि नांदेडचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी जिल्ह्यात संचारबंदी लागू करण्याची घोषणा केलीय. वाढत्या कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेत असल्याची माहिती त्यांनी दिलीय. यावेळी त्यांनी नागरिकांना सहकार्य करण्याचंही आवाहन केलंय. तसेच या काळात जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा आणि अत्यावश्यक सेवांवर परिणाम होणार नाही, असं आश्वासनही दिलंय.
अशोक चव्हाण म्हणाले, “नांदेड जिल्ह्यातील कोरोनाची परिस्थिती चिंताजनक होते आहे. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील प्रमुख अधिकार्यांसमवेत आज (21 मार्च) सकाळी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे आढावा बैठक झाली. कोरोना नियंत्रणासाठी जिल्हा प्रशासनाने आवश्यक त्या सर्व उपाययोजना तातडीने कराव्यात, असे निर्देश मी या बैठकीत दिले. व्यापक जनहितास्तव जिल्हाधिकाऱ्यांनी 24 मार्चच्या मध्यरात्रीपासून 11 दिवसांसाठी संपूर्ण नांदेड जिल्ह्यात संचारबंदी लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा व अत्यावश्यक सेवांवर परिणाम होणार नाही, याची काळजी प्रशासन घेते आहे. नागरिकांनी सहकार्य करावे, ही विनंती.”
नांदेड जिल्ह्यातील कोरोनाची परिस्शिती चिंताजनक होते आहे. या पार्श्वभूमिवर जिल्ह्यातील प्रमुख अधिकार्यांसमवेत आज सकाळी व्हीडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे आढावा बैठक झाली. कोरोना नियंत्रणासाठी जिल्हा प्रशासनाने आवश्यक त्या सर्व उपाययोजना तातडीने कराव्यात, असे निर्देश मी या बैठकीत दिले. pic.twitter.com/NYdWLWzETf
— Ashok Chavan (@AshokChavanINC) March 21, 2021
नांदेडमध्ये काय सुरु काय बंद?
- मैदानं, गार्डन आणि सर्वच सार्वजनिक ठिकाणं बंद राहणार. मॉर्निंग वॉकलाही बंदी.
- उपहारगृह, बार, लॉज, हॉटेल्स, रिसॉर्ट, मॉल, बाजार, मार्केट संपूर्णतः बंद राहणार.
- सर्व केश कर्तनालय, सलून, ब्युटी पार्लर बंद.
- मटन, चिकन, अंडी, मासे इत्यादीच्या विक्रीवर बंदी. घरपोच सेवा देण्यास सवलत.
- सार्वजनिक आणि खासगी सर्व वाहनं बंद असतील, केवळ अत्यावश्यक सेवेतील वाहनांना परवानगी.
- सर्व प्रकारचे बांधकाम संपूर्णतः बंद, कामाच्या ठिकाणी कामगारांच्या राहण्याची व्यवस्था असेल तर काम सुरु ठेवता येणार.
- सर्व चित्रपटगृहं, व्यायामशाळा, जलतरण तलाव, नाट्यगृहं देखील बंद राहणार.
- मंगल कार्यालयं, हॉल, लग्न समारंभ, स्वागत समारंभ संपूर्णतः बंद राहणार.
- सामाजिक, राजकीय, मनोरंजन, क्रीडा, सांस्कृतिक, धार्मिक कार्यक्रम आणि सभांवर संपूर्णतः बंदी.
- धार्मिक स्थळे आणि प्रार्थना स्थळे पूर्णपणे बंद राहणार.
- नांदेडमधील सर्व खासगी कार्यालयं बंद राहणार.
- सर्व शासकीय कार्यलयांसमोर मोर्चे, धरणे, आंदोलनं करण्यास बंदी.
- 31 मार्च अखेरची बँकेची कामं करण्यास परवानगी, पण ग्राहकांना प्रवेशास बंदी, शटर बंद करुन 2-3 कर्मचाऱ्यांमध्ये क्लोजिंगचं काम करता येणार.
हेही वाचा :
IPS अधिकाऱ्यांनाही प्रश्न पडला, कोव्हिशिल्ड की कोवॅक्सीन, कोणती लस चांगली?
दररोज 1 लाख लोकांना लस, 45 लाखाचं टार्गेट, मुंबई आयुक्तांचा मास्टर प्लॅन
व्हिडीओ पाहा :
ही बातमी आताच ब्रेक झाली आहे. या बातमीला आम्ही अजुनही अपडेट करत आहोत. तुम्हाला सर्वात आधी माहिती पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यामुळे ह्या पेजला रिफ्रेश करत चला. तसेच आमच्या इतर स्टोरीज वाचण्यासाठी इथं क्लिक करा.