Maratha Reservation: सरकारने न्यायालयात योग्यरित्या बाजू मांडली, आज आमची मागणीही मान्य झाली- अशोक चव्हाण

राज्य सरकारच्या दिरंगाईमुळे आजच्या सुनावणीत मराठा आरक्षणाला दिलेली स्थगिती उठवण्यात अपयश आल्याचा आरोप होत आहे. | Ashok Chavan

Maratha Reservation: सरकारने न्यायालयात योग्यरित्या बाजू मांडली, आज आमची मागणीही मान्य झाली- अशोक चव्हाण
Follow us
| Updated on: Oct 27, 2020 | 3:39 PM

मुंबई: राज्य सरकारने मराठा आरक्षणाबाबत सर्वोच्च न्यायालयात मंगळवारी झालेल्या सुनावणीवेळी योग्यरित्या बाजू मांडली. यानंतर न्यायालयाने राज्य सरकारची मागणी मान्यही केली, असा दावा राज्याचे मंत्री आणि मराठा उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी केली. राज्य सरकारच्या दिरंगाईमुळे आजच्या सुनावणीत मराठा आरक्षणाला दिलेली स्थगिती उठवण्यात अपयश आल्याचा आरोप होत आहे. (Ashok Chavan on Maratha Reservation hearing in SC)

या पार्श्वभूमीवर अशोक चव्हाण यांनी ‘टीव्ही 9 मराठी’शी बोलताना राज्य सरकारची बाजू स्पष्ट केली. राज्य सरकारने आज न्यायालयात योग्यरित्या बाजू मांडली. यावेळी हे प्रकरण पाच सदस्यीय घटनापीठाकडे सोपवण्याची राज्य सरकारची मागणी न्यायालयाने मान्य केली. आता या घटनापीठासमोर आपल्याला बाजू मांडावी लागेल, असे अशोक चव्हाण यांनी स्पष्ट केले.

मराठा आरक्षणावरील स्थगिती उठली पाहिजे, असेही सरकारलाही वाटते. परंतु, आपल्या हातात काही नाही. मराठा समाजाने आक्रमक होता कामा नये. न्यायालयीन लढाई ही रस्त्यावर लढून चालणार नाही. आपल्याला घटनापीठासमोरच आपली बाजू मांडली पाहिजे, असे अशोक चव्हाण यांनी सांगितले.

तत्पूर्वी आज सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण याचिकेवरील सुनावणी चार आठवड्यांसाठी पुढे ढकलली. मराठा आरक्षण याचिकेवर आज काहीच करु शकत नाही. तुम्ही घटनापीठासमोर जा, असे सर्वोच्च न्यायालयाने सांगितले. याचिकाकर्त्यांनी यादरम्यान घटनापीठाकडे आपलं म्हणणं मांडावं असंही कोर्टाने नमूद केलं. त्यामुळे याचिकाकर्ते विनोद पाटील यांनी उद्याच घटनापीठासमोर जाणार असल्याचं सांगण्यात आल्याने उद्या घटनापीठासमोर काय निर्णय होतो याकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागले आहे.

मराठा समाजाला आरक्षण द्यायचं आहे की नाही?; चंद्रकांत पाटील यांचा सरकारला सवाल मराठा आरक्षणावरून राज्य सरकारचा गोंधळ सुरू आहे. त्यांच्या वकिलांमध्येही एकवाक्यता नाही हे आजच्या प्रकारातून दिसून आलं आहे, असं सांगतानाच सरकारला मराठा समाजाला आरक्षण द्यायचं आहे की नाही?, असा संतप्त सवाल भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केला.

संबंधित बातम्या:

मराठा समाजाला आरक्षण द्यायचं आहे की नाही?; चंद्रकांत पाटील यांचा सरकारला सवाल

घटनापीठाची मागणी आधीच का केली नाही?, दीड महिना वाया का घालवला?; संभाजीराजेंचा चव्हाणांना सवाल

मराठा आरक्षण : सरपंचपदाच्या मुदतवाढीचा उल्लेख, सुप्रीम कोर्टात नेमकं काय काय झालं?

(Ashok Chavan on Maratha Reservation hearing in SC)

छगन भूजबळांचा मंत्रिमंडळातून नेमका कोणामुळे पत्ता कट? कारणं आली समोर
छगन भूजबळांचा मंत्रिमंडळातून नेमका कोणामुळे पत्ता कट? कारणं आली समोर.
बीडचा बिहार की गँग्स ऑफ वासेपूर? सरपंच हत्या प्रकरणात सूत्रधार कोण?
बीडचा बिहार की गँग्स ऑफ वासेपूर? सरपंच हत्या प्रकरणात सूत्रधार कोण?.
बीड सरपंचाच्या हत्येचा 'आका', देवेंद्र फडणवीसांचा कोणाकडे इशारा?
बीड सरपंचाच्या हत्येचा 'आका', देवेंद्र फडणवीसांचा कोणाकडे इशारा?.
... अन् एकटी महिला भिडली, छेड काढणाऱ्याला चांगलंच चोपल, बघा व्हिडीओ
... अन् एकटी महिला भिडली, छेड काढणाऱ्याला चांगलंच चोपल, बघा व्हिडीओ.
मुंबईतील काँग्रेस कार्यालयात घुसून आंदोलन करणं 'भाजप युवा'च्या अंगाशी
मुंबईतील काँग्रेस कार्यालयात घुसून आंदोलन करणं 'भाजप युवा'च्या अंगाशी.
'ए अंबादास खाली बस...', शिंदेंनी विरोधकांना फटकारलं, सभागृहात काय झाल?
'ए अंबादास खाली बस...', शिंदेंनी विरोधकांना फटकारलं, सभागृहात काय झाल?.
'.. आता भाजपची वाट', सुषमा अंधारे यांचा नेमका कोणाला खोचक टोला?
'.. आता भाजपची वाट', सुषमा अंधारे यांचा नेमका कोणाला खोचक टोला?.
बीड सरपंच संतोष देशमुखांची हत्या, शवविच्छेदन अहवालातून काय आलं समोर?
बीड सरपंच संतोष देशमुखांची हत्या, शवविच्छेदन अहवालातून काय आलं समोर?.
अचानक संध्याकाळी 17 लाख मतं वाढली? EVMच्या आरोपांवर फडणवीसांचं उत्तर
अचानक संध्याकाळी 17 लाख मतं वाढली? EVMच्या आरोपांवर फडणवीसांचं उत्तर.
'लाडक्या बहिणीं'नो तुमच्यासाठी मोठी बातमी, डिसेंबरचा हफ्ता कधी मिळणार?
'लाडक्या बहिणीं'नो तुमच्यासाठी मोठी बातमी, डिसेंबरचा हफ्ता कधी मिळणार?.