सोशल मीडियावर दिग्गजांची बदनामी करणं महागात पडणार; सरकारने पोलिसांना दिले कारवाईचे आदेश

सोशल मीडियावर दिग्गजांची बदनामी करणं आता महागात पडणार आहे. कारण महाराष्ट्र सरकारने पोलिसांना याबाबत कारवाईचे आदेश दिले आहेत.

सोशल मीडियावर दिग्गजांची बदनामी करणं महागात पडणार; सरकारने पोलिसांना दिले कारवाईचे आदेश
aslam shaikh
Follow us
| Updated on: Oct 31, 2020 | 6:15 PM

मुंबई : “केंद्रात भाजपचं सरकार सत्तेत आल्यापासून समाजमाध्यमांचा गैरवापर करुन विविध क्षेत्रांतील नामांकित आणि दिग्गज व्यक्तींच्या बदनामीच्या घटना वाढल्या आहेत. महाराष्ट्रात यापुढे अशा असामाजिक तत्त्वांना पायबंद बसावा यासाठी कठोर कारवाई करण्याचे आदेश पोलिसांना देण्यात आलेले आहेत”, अशी महत्त्वपूर्ण माहिती मुंबई शहराचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी दिली आहे. (Aslam Shaikh Statement On Social Media Defamation)

“केंद्रात भाजपचे सरकार आल्यापासून सोशल मीडियावरुन विशेषकरुन राजकीय क्षेत्रातील प्रसिद्ध व्यक्तींच्या बदनामी करण्याच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होऊ लागली. विविध क्षेत्रातल्या नामांकित आणि दिग्गज व्यक्तींना बदनाम करण्यासाठी अनेक अ‌ॅपचा वापर करण्यात येऊ लागला आहे”, असं शेख म्हणाले.

“अनेक अ‌ॅप्सचा वापर कोणत्याही सन्माननीय व्यक्तीबद्दल बदनामी करण्यासाठी तसंच समाजमाध्यमांवर आक्षेपार्ह मजकुर प्रसिद्ध करताना समाज विघातक लोक दिसतात. महाराष्ट्रात यापुढे अशा असामाजिक तत्त्वांना पायबंद बसावा यासाठी कठोर कारवाई करण्याचे आदेश पोलिसांना देण्यात आलेत”, असं अस्लम शेख यांनी सांगितलं.

अनेक वेळा अनेक दिग्गज लोकांना ट्रोल केलं जातं किंवा एखाद्या भूमिकेवरुन त्यांच्याविषयी अर्वाच्य भाषेत समाजमाध्यमांवर लिहिलं जातं. अशा घटना गेल्या काही दिवसांपासून सातत्याने घडत आहेत. अनेक वेळा अनेक दिग्गज मान्यवरांनी देखील याविरोधात आवाज उठवला आहे.

(Aslam Shaikh Statement On Social Media Defamation)

संबंधित बातम्या

‘ईस्टर्न फ्री वे’ला विलासराव देशमुख यांचे नाव द्या; पालकमंत्री अस्लम शेख यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

महाराष्ट्राच्या इतिहासात राज्यपालांनी पुस्तक छापणे ही पहिलीच घटना: मंत्री अस्लम शेख

'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?.
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?.