Achalpur Vidhan Sabha : यंदाही बच्चू कडूंची विजयी पताका फडकणार का ? अचलपूर मतदारसंघात कोणाची लढत ?

परिवर्तन महाशक्ती आघाडीने अचलपूरमधून बच्चू कडू यांना उमेदवारी जाहीर केली असून ते विजयी घोडदौड कायम राखतात का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या मतदारसंघात महायुतीतर्फे भाजपने प्रवीण तायडे यांना उमेदवारी दिली आहे. तर महाविकास आघाडीतून काँग्रेसच्या वाट्याला ही जागा आली असून अनिरुद्ध देशमुख यांना उमेदवारी मिळाली आहे.

Achalpur Vidhan Sabha : यंदाही बच्चू कडूंची विजयी पताका फडकणार का ? अचलपूर  मतदारसंघात कोणाची लढत ?
बच्चू कडूImage Credit source: social media
Follow us
| Updated on: Oct 25, 2024 | 3:09 PM

राज्यात येत्या 20 नोव्हेंबरला विधानसभा निवडणुकीसाठी मतदान होणार असून 23 नोव्हेंबरला मतमोजणी होऊन निकाल लागणार आहे. महायुती वि महाविकास आघआडी असा चुरशीचा सामना या निवडणुकीत रंगणार असून जनता कोणाला सत्ता स्थापन करण्याची संधी देते हे महिन्याभरातच समजेल. विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजल्यानंतर आता प्रत्येक राजकीय पक्षांकडून आपापल्या उमेदवारांची यादी जाहीर करण्यात येत आहे. अशातच राज्यातील तिसऱ्या आघाडीने आपल्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. बच्चू कडू, संभाजी राजे आणि राजू शेट्टी यांनी मिळून महाशक्ती ही तिसरी आघाडी स्थापन केली आहे. याच परिवर्तन महाशक्ती आघाडीच्या 10 उमेदवारांची पहिली यादी काही दिवसांपूर्वीच जाहीर करण्यात आली . परिवर्तन महाशक्ती आघाडीने अचलपूरमधून बच्चू कडू यांना उमेदवारी जाहीर केली असून ते विजयी घोडदौड कायम राखतात का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या मतदारसंघात महायुतीतर्फे भाजपने प्रवीण तायडे यांना उमेदवारी दिली आहे. तर महाविकास आघाडीतून काँग्रेसच्या वाट्याला ही जागा आली असून अनिरुद्ध देशमुख यांना उमेदवारी मिळाली आहे. या तिरंगी लढतीत कोणाचा विजय होतो हे 23 नोव्हेंबरलाच स्पष्ट होईल.

अचलपूर हे महाराष्ट्रातील अमरावती जिल्ह्यातील एक शहर आहे. अचलपूर विधानसभा मतदारसंघ हा महाराष्ट्र विधानसभेच्या 288 मतदारसंघांपैकी एक आहे. बडनेरा, अमरावती, तेओसा, दर्यापूर (SC) आणि मेळघाट (ST) या पाच विधानसभा मतदारसंघांसह हा अमरावती लोकसभा मतदारसंघाचा एक भाग आहे.

बच्चू कडू यांची विजयी घोडदौड कायम राहणार का ?

बच्चू कडू यांनी 2004, 2009, 2014 आणि 2019 सालच्या विधानसभा निवडणुकांमध्ये यांनी लागोपाठ विजय मिळवला आहे. 2019 च्या विधानसभा निवडणुकीत प्रहार जनशक्ती पार्टी पक्षातर्फेनिवडणूक लढवत त्यांनी 81 हाजर 252 मतं मिळवत विजय संपादन केला. काँग्रेस पक्षाचे अनिरुद्ध उर्फ बबलूभाऊ सुभानराव देशमुख हे 72 हजार 856 मतं मिळवन दुसऱ्या स्थानी होते. यंदा बच्चू कडू यांचा सामना महायुतीतील भाजप उमेदवार प्रवीण तायडे आणि मविआचे काँग्रेसचे उमेदवार अनिरुद्ध देशमुख यांच्याशी होणार आहे.

महायुतीत राहूनही दर्शवला होता विरोध

महायुतीत राहूनही बच्चू कडू यांनी महायुतीविरोधी भूमिका देखील घेतली होती. काही महिन्यांपूर्वीच झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाने अमरावती लोकसभा मतदारसंघातून नवनीत राणा यांची उमेदवारी जाहीर केली होती मात्र त्यास बच्चू कडू यांनी कडाडून विरोध दर्शवला होता. त्यानंतर बच्चू कडूंच्या प्रहार जनशक्ती पक्षातर्फे लोकसभेत नवनीत राणांविरोधात उमेदवार उभा करण्यात आला. या निवडणुकीत महायुतीच्या नवनीत राणा यांचा दारूण पराभव झाला.

2019 विधानसभा निवडणूक निकाल

बच्चू बाबाराव कडू – प्रहार जनशक्ती पार्टी – 81,252 मतं

अनिरुद्ध उर्फ बबलूभाऊ सुभानराव देशमुख – काँग्रेस – 72,856 मतं

सुनीता नरेन्द्राराव फिस्के – शिवसेना- 15,064 मतं

अब्दुल नाझिम अब्दुल रौफ – इतर – 6,329 मतं

नंदेश शेषराव अंबडकर – इतर – 3,355 मतं

Non Stop LIVE Update
'मैंने मेरा बाप खोया है, और...', उमेदवारी मिळताच झिशान सिद्दीकी भावूक
'मैंने मेरा बाप खोया है, और...', उमेदवारी मिळताच झिशान सिद्दीकी भावूक.
राज्यात पुन्हा एकदा महायुती येणार? काय म्हणाल्या अमृता फडणवीस?
राज्यात पुन्हा एकदा महायुती येणार? काय म्हणाल्या अमृता फडणवीस?.
कंठ दाटला, डोळे पाणावले...जरांगे झाले भावूक; म्हणाले, 'लढा थांबता...'
कंठ दाटला, डोळे पाणावले...जरांगे झाले भावूक; म्हणाले, 'लढा थांबता...'.
यंदा राष्ट्रवादी vs राष्ट्रवादी लढत, ‘या’ मतदारसंघात येणार आमने-सामने
यंदा राष्ट्रवादी vs राष्ट्रवादी लढत, ‘या’ मतदारसंघात येणार आमने-सामने.
'हम तो ऐसे बदनाम है की बदनामी...', गुलाबराव पाटलांचा विरोधकांवर निशाणा
'हम तो ऐसे बदनाम है की बदनामी...', गुलाबराव पाटलांचा विरोधकांवर निशाणा.
'संजयमामा शिंदेंनी सर्वांना फसवलं, त्यांना तोंड...', कोणाचा घणाघात?
'संजयमामा शिंदेंनी सर्वांना फसवलं, त्यांना तोंड...', कोणाचा घणाघात?.
शिंदेंचे आमदार शहाजीबापूं पाटलांचं चॅलेंज, यंदा जिंकू किंवा मरू
शिंदेंचे आमदार शहाजीबापूं पाटलांचं चॅलेंज, यंदा जिंकू किंवा मरू.
'या' दिग्गजांनी भरले अर्ज, कुठे तडगी फाईट अन् कोणी केला विजयाचा दावा?
'या' दिग्गजांनी भरले अर्ज, कुठे तडगी फाईट अन् कोणी केला विजयाचा दावा?.
जरांगेंकडून इच्छुकांच्या भेटीगाठी सुरू असताना धमकी, '10 मिनिटांत...'
जरांगेंकडून इच्छुकांच्या भेटीगाठी सुरू असताना धमकी, '10 मिनिटांत...'.
नवाब मलिक यांना सर्वात मोठा धक्का, अजितदादा गटाचा मोठा निर्णय काय?
नवाब मलिक यांना सर्वात मोठा धक्का, अजितदादा गटाचा मोठा निर्णय काय?.