BJPच्या 12 आमदारांच्या सभागृहातल्या प्रवेशाबाबत विधानसभा अध्यक्ष निर्णय घेतील : Vijay Wadettiwar
भाजपा(BJP)च्या 12 आमदारांच्या सभागृहातल्या प्रवेशाबाबत विधानसभा अध्यक्ष निर्णय घेणार असल्याची माहिती मंत्री विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी दिली आहे. सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय पाळणं सभागृहाला बंधनकारक किती आहे आणि किती नाही याचा अभ्यास सुरू आहे, असंही ते म्हणाले.
भाजपा(BJP)च्या 12 आमदारांच्या सभागृहातल्या प्रवेशाबाबत विधानसभा अध्यक्ष निर्णय घेणार असल्याची माहिती मंत्री विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी दिली आहे. सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय पाळणं सभागृहाला बंधनकारक किती आहे आणि किती नाही याचा अभ्यास सुरू आहे, असंही ते म्हणाले. यासह त्यांनी विविध विषयावर बातचीत केली. ताडोबा (Tadoba) व्याघ्र प्रकल्प आंतरराष्ट्रीय दर्जाचा होणार, अशी सकारात्मक भूमिका मुख्यमंत्र्यांनी घेतली आहे, अशी माहिती मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिली आहे. नुकतीच मुख्यमंत्र्यांसोबत बैठक झाली. त्यात ताडोबात पर्यटकांसाठी आणखी सोयीसुविधा उपलब्ध करणार असल्याचं त्यांनी म्हटलंय. ताडोबाच्या विकासासाठी सफारी, टायगर रेस्क्यू सेंटर असा 140 कोटींचा प्रकल्प उभारला जाणार आहे. ताडोबात जखमी वाघांवरही उपचार होणार असल्याचं त्यांनी म्हटलंय. ताडोबा जगप्रसिद्ध असून वनपर्यटनासाठी एक उत्तम ठिकाण आहे.
Latest Videos