पनवेल रेल्वे स्थानकात घडली भयानक घटना’; प्रवाशांनी डायरेक्ट रेल्वे ट्रॅकवर उडया मारल्या आणि…
पनवेल रेल्वे स्थानाकतून सुटणारी दिवा रोहा ही ट्रेन पकडण्यासाठी प्रवाशांनी आपला जीव धोक्यात घातला.
मुंबई : पनवेल रेल्वे स्थानकात शनिवारी एक विचित्र प्रकार घडला आहे. रेल्वे चुकीच्या प्लॅटफॉर्मवर लागल्याने प्रवाशांनी डायरेक्ट रेल्वे ट्रॅकवर उडया मारल्या. रेल्वे पकडण्यासाठी प्रवाशांनी आपला जीव धोक्यात घालून रेल्वे पकडली. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. मध्य रेल्वे या प्रकरणाची चौकशी करणार असल्याचे समजते.
पनवेल रेल्वे स्थानाकतून सुटणारी दिवा रोहा ही ट्रेन पकडण्यासाठी प्रवाशांनी आपला जीव धोक्यात घातला. ही ट्रेन चुकीच्या प्लॅटफॉर्मवर लागल्याने प्रवाशांनी रेल्वे ट्रॅकवर उडया मारत ही ट्रेन जिथे लागली होती तिथे धाव घेतली.
पनवेल रेल्वे स्थानकातून सकाळी 9.30 ला सुटणारी दिवा रोहा ही ट्रेन प्लॅटफॉर्म क्रमांक 5 ला लागणार होती. परंतु ती चुकून दुसऱ्याच ट्रॅकवर लागल्याने प्रवाशांचा गोंधळ उडाला.
ही रेल्वे पकडण्यासाठी प्रवाशांनी आपला जीव धोक्यात घातला. प्रवाशांनी रुळ ओलांडून ट्रेन पकडली. दिवा – रोहा रेल्वे प्लॅटफॉर्मवर न लागल्याने प्रवाशांनी रेल्वे रुळ न ओलांडण्याचा नियम मोडला.
अनेक पुरुष आणि महिला प्रवाशी रेल्वे ट्रॅकवर उतरुन या ट्रेनकडे धावत असल्याचे व्हिडिओत दिसत आहे. दरम्यान मध्य रेल्वे कडून या घटनेची चौकशी केली जाणार आहे.
दिवा – रोहा रेल्वे दुसऱ्या ट्रॅकवर का लागली? ही रेल्वे कुठे लागणार या बाबात काही सूचना अथवा उद्घोषणा करण्यात आल्या नव्हत्या का? असे अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत.