डॅशिंग अधिकारी शिवदीप लांडे ATS कार्यालयात, मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणी महत्त्वाची चर्चा

एटीएसचे डीआयजी शिवदीप लांडे यांनी यापूर्वी रेती बंदर भागातील खाडीत मनसुख हिरेन यांच्या डमी पुतळ्याचे नाट्य रुपांतरण केले होते. (Shivdeep Lande Thane ATS Office)

डॅशिंग अधिकारी शिवदीप लांडे ATS कार्यालयात, मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणी महत्त्वाची चर्चा
शिवदीप लांडे ठाणे एटीएस कार्यालयात
Follow us
| Updated on: Mar 17, 2021 | 3:26 PM

ठाणे : दहशतवाद विरोधी पथकाचे पोलिस उपमहानिरीक्षक शिवदीप लांडे ठाणे एटीएस कार्यालयात दाखल झाले आहेत. डीसीपी राजकुमार शिंदेही त्यांच्यापाठोपाठ कार्यालयात पोहोचले. लांडे ठाण्यातील एटीएसच्या अधिकाऱ्यांसोबत मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणी ते महत्त्वाची चर्चा करणार आहेत. (ATS DIG Shivdeep Lande at Thane ATS Office to discuss on Mansukh Hiren Death Case)

एटीएसचे डीआयजी शिवदीप लांडे यांनी यापूर्वी रेती बंदर भागातील खाडीत मनसुख हिरेन यांच्या डमी पुतळ्याचे नाट्य रुपांतरण केले होते. आज लांडे ठाणे एटीएस अधिकाऱ्यांसोबत महत्त्वाची चर्चा करणार आहेत. मनसुख प्रकरणात संबंधित एटीएस अधिकाऱ्यांना महत्वाचे मार्गदर्शन दिले जाणार आहे, सप्टेंबर 2020 मध्ये दहशतवाद विरोधी पथकाचे पोलिस उपमहानिरीक्षक म्हणून शिवदीप लांडे यांची पदोन्नती झाली.

कोण आहेत शिवदीप लांडे?

शिवदीप वामनराव लांडे हे 2006 च्या बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत बिहार कॅडरचे अधिकारी असलेले लांडे ह सध्या महाराष्ट्रात कार्यरत आहेत अकोला जिल्ह्यातील परसा गावात शेतकऱ्याच्या पोटी शिवदीप लांडे यांचा जन्म शिक्षणात हुशार, शिष्यवृत्ती मिळवून इंजिनिअरिंगचे शिक्षण पूर्ण मुंबईत यूपीएससीचे शिक्षण, बिहार कॅडरमध्ये आयपीएस म्हणून निवड बिहारमधील मुंगेर जिल्ह्यातील नक्षलग्रस्त जमालपूरमध्ये पहिल्यांदा पोस्टिंग पाटणाचे एसपी म्हणून वेगळ्या शैलीमुळे देशभरात प्रसिद्ध शिवसेना नेते आणि माजी मंत्री विजय शिवतारे यांचे जावई 44 वर्षीय शिवदीप लांडे दहशतवाद विरोधी पथकाचे पोलिस उपमहानिरीक्षक

मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणाचा तपासही NIA कडे?

दरम्यान, मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणाचा तपासही राज्य दहशतवादविरोधी पथकाकडून (ATS) काढून राष्ट्रीय तपास यंत्रणेला (NIA) दिला जाण्याची शक्यता आहे. सध्या एनआयए केवळ उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर सापडलेल्या स्फोटकांच्या प्रकरणाचा तपास करत आहे. तर दहशतवादविरोधी पथक मनसुख हिरेन मृत्यू प्रकरण आणि स्कॉर्पिओ गाडी प्रकरणाचा तपास करत आहे. (Shivdeep Lande Thane ATS Office)

सचिन वाझे यांना अटक झाल्यापासून एनआयएच्या तपासाने वेग घेतला आहे. गेल्या दोन दिवसांत अनेक महत्त्वाचे पुरावे समोर आले आहेत. या तिन्ही प्रकरणांच्या केंद्रस्थानी सचिन वाझे हेच आहेत. त्यामुळे या तिन्ही प्रकरणांचा एकत्रित तपास एनआयएकडे सोपवण्याच्या हालचाली सुरु असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

संबंधित बातम्या :

ठाकरे सरकारला आणखी एक धक्का? मनसुख हिरेन प्रकरणाचा तपासही NIA कडे जाण्याची शक्यता

पोलिस दलात पुन्हा फेरबदल, अमिताभ गुप्ता पुणे पोलीस आयुक्तपदी, शिवदीप लांडे यांना पदोन्नती

(ATS DIG Shivdeep Lande at Thane ATS Office to discuss on Mansukh Hiren Death Case)

'साई भक्तांच्या भावना दुखावल्या हे मान्य, पण...', विखेंचं स्पष्टीकरण
'साई भक्तांच्या भावना दुखावल्या हे मान्य, पण...', विखेंचं स्पष्टीकरण.
'खासदराची चड्डी जागेवर राहणार नाही', पोलीस अधिकाऱ्याची वादग्रस्त पोस्ट
'खासदराची चड्डी जागेवर राहणार नाही', पोलीस अधिकाऱ्याची वादग्रस्त पोस्ट.
संजय गायकवाड मतदारांवर भडकले, मतदारांवर बोलताना घसरली जीभ
संजय गायकवाड मतदारांवर भडकले, मतदारांवर बोलताना घसरली जीभ.
'तुम्ही माझे मालक नाही...', भर कार्यक्रमात अजितदादा कोणावर संतापले?
'तुम्ही माझे मालक नाही...', भर कार्यक्रमात अजितदादा कोणावर संतापले?.
संतोष देशमुख हत्या प्रकरणातील अरोपींचा मुक्काम भिवंडीनंतर गुजरातमध्ये
संतोष देशमुख हत्या प्रकरणातील अरोपींचा मुक्काम भिवंडीनंतर गुजरातमध्ये.
'...तर ते इतके दिवस गप्प का?', चाकणकरांचा धसांवर हल्लाबोल अन् थेट सवाल
'...तर ते इतके दिवस गप्प का?', चाकणकरांचा धसांवर हल्लाबोल अन् थेट सवाल.
'अजितदादा तुझ्या पाया पडतो...', सुरेश धस जाहीरपणे काय बोलून गेले?
'अजितदादा तुझ्या पाया पडतो...', सुरेश धस जाहीरपणे काय बोलून गेले?.
'आकाचा आका कोण? मुंडेंनासुद्धा फाशी झाली पाहिजे', कोणाचा आक्रमक सवाल?
'आकाचा आका कोण? मुंडेंनासुद्धा फाशी झाली पाहिजे', कोणाचा आक्रमक सवाल?.
'शिर्डीतलं मोफत जेवण बंद करा, सगळे महाराष्ट्रातील भिकारी इथे गोळा...'
'शिर्डीतलं मोफत जेवण बंद करा, सगळे महाराष्ट्रातील भिकारी इथे गोळा...'.
'SIT मध्ये असलेला अधिकारी कराडच्या जवळचा...', सोनावणेंचा आणखी एक दावा
'SIT मध्ये असलेला अधिकारी कराडच्या जवळचा...', सोनावणेंचा आणखी एक दावा.