रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर अनिल देशमुखांची पहिली प्रतिक्रिया; दिला थेट इशारा, म्हणाले ‘मी मरणार…’
राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते अनिल देशमुख यांच्या गाडीवर काल अज्ञात व्यक्तींकडून हल्ला करण्यात आला होता, या हल्ल्यात ते जखमी झाले होते, त्यांना आता उपचारानंतर डिस्चार्ज देण्यात आला आहे.
विधानसभा निवडणूक प्रचाराच्या तोफा थंडावल्यानंतर सोमवारी रात्री राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते अनिल देशमुख यांच्या वाहनावर अज्ञात व्यक्तीकडून हल्ला करण्यात आला. अनिल देशमुख यांच्या वाहनावर दगडफेक करण्यात आली. या हल्ल्यात देशमुख जखमी झाले होते, त्यांच्या डोक्याला मार लागला होता. त्यानंतर त्यांना काल सायंकाळी उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. दरम्यान उपचारानंतर त्यांना आता डिस्चचार्ज मिळाला आहे, डिस्चार्ज मिळाल्यानंतर त्यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. हल्ला करणाऱ्याला सोडणार नाही असा इशारा अनिल देशमुख यांनी दिला आहे.
नेमकं काय म्हणाले अनिल देशमुख?
सोमवारी अनिल देशमुख यांच्या गाडीवर अज्ञात व्यक्तीकडून हल्ला करण्यात आला होता. या हल्ल्यामध्ये अनिल देशमुख जखमी झाले होते. दरम्यान रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर आता त्यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. ‘मी मरणार नाही, आणि तुम्हालाही सोडणार नाही, आपल्यावर ज्याने कोणी हल्ला केला त्याला सोडणार नाही, असं अनिल देशमुख यांनी म्हटलं आहे. दरम्यान अनिल देशमुख यांच्या वाहनावर झालेल्या हल्लानंतर राजकीय वातावरण तापलं असून, विरोधी आणि सत्ताधाऱ्यांमध्ये आरोप-प्रतिआरोप सुरू असल्याचं पहायला मिळत आहे.
नेमकं काय घडलं?
सोमवारी विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचा शेवटचा दिवस होता. अनिल देशमुख हे नरखेड येथील आपली शेवटची प्रचार सभा आटोपून काटोलच्या दिशेनं निघाले होते, यादरम्यान काटोल जलालखेडा मार्गावर बेलफाट्याजवळ अनिल देशमुख यांच्या गाडीवर अज्ञातांकडून दगडफेक करण्यात आली. या हल्ल्यामध्ये अनिल देशमुख यांच्या गाडीची समोरची काच फुटली तसेच ते देखील जखमी झाले. त्यांच्या डोक्याला मार लागला. त्यानंतर त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्यांना आज रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. डिस्चार्ज मिळताच त्यांनी आपल्यावर हल्ला करणाऱ्याला सोडणार नसल्याचा इशारा दिला आहे, दरम्यान या हल्ल्यानंतर सोमवारी वातावरण चांगलंच तापलं होतं, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी हल्लेखोरांवर कारवाईच्या मागणीसाठी जोरदार आंदोलन केल्याचं पहायला मिळालं.