Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

यवतमाळमध्ये एकतर्फी प्रेमातून तरुणीवर शेतात जीवघेणा हल्ला

तरुणी शेतात काम करत होती, तेव्हा संबंधित तरुण तिथं आला. आणि हातातील धारदार शस्रानं तिच्यावर सपासप वार केले

यवतमाळमध्ये एकतर्फी प्रेमातून तरुणीवर शेतात जीवघेणा हल्ला
Follow us
| Updated on: Jan 29, 2021 | 7:43 PM

यवतमाळ: एकतर्फी प्रेम प्रकरणातून (One Side Love) एका तरुणीवर माथेफिरुने जीवघेणा हल्ला केल्याची घटना घडली आहे. यवतमाळच्या (Yawatmal) घाटंजी तालुक्यातील मारेगाव इथं हा सगळा प्रकार घडला आहे. त्यामुळं मुलीच्या सुरक्षितेचा प्रश्न पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे.  ही तरुणी शेतात काम करत होती, तेव्हा संबंधित तरुण तिथं आला. आणि हातातील धारदार शस्रानं तिच्यावर सपासप वार केले. रक्तबंबाळ झालेली तरुणी जागेवरच कोसळली. ( Attack on Young Girl by One sided Lover)

मुलीचा काका तिथं होता म्हणून…

हा सगळा प्रकार शेतीच्या दुसऱ्या बाजूला असलेल्या मुलीच्या काकाने पाहिला. आणि तातडीने तो धावत आला. मात्र, तोपर्यंत तरुणानं तिथून पोबारा केला. या घटनेत गंभीर जखमी झालेल्या तरुणीला खांद्यावर घेऊन अर्धा किलोमीटरपर्यंत तिचा काका धावत होता…त्यानंतर गावातून दुचाकीवर तिला उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल केलं. काकाने वेळीच धाव घेतल्यानं तरुणीचे प्राण वाचल्याचं डॉक्टरांनी सांगितलं आहे.

आरोपीला पोलिसांकडून बेड्या

या घटनेतील माथेफिरुचं नाव चिंतामण पुसनाके आहे. एकतर्फी प्रेमातून त्यानं शेतीत काम करणाऱ्या तरुणीवर धारदार शस्राने वार केले. मात्र, अचानक तरुणीचा काका तिथं आल्याने त्यानं गावातून पोबारा केला. मात्र, या घटनेची माहिती मिळताच, पोलिसांनी तपासाची चक्र फिरवली. आणि आरोपी चिंतामण पुसानकेच्या मुस्क्या आवळल्या. सध्या माथेफिरु चिंतामण पोलिसांच्या ताब्यात असून त्याच्यावर गुन्हा नोंद करण्यात आला आहे. लवकरच त्याला कोर्टात हजर केलं जाणार आहे..

संबंधित बातम्या:

( Attack on Young Girl by One sided Lover)

टोळक्यासोबत डान्स, अन् गर्दीवर पैशांची उधळण; कुख्यात टिपूचा व्हिडिओ
टोळक्यासोबत डान्स, अन् गर्दीवर पैशांची उधळण; कुख्यात टिपूचा व्हिडिओ.
राज्यात अवकाळी पावसाची हजेरी, शेती पिकांचं नुकसान
राज्यात अवकाळी पावसाची हजेरी, शेती पिकांचं नुकसान.
कांदा निर्यात शुल्क रद्द, पण अंमलबजावणी कधी?
कांदा निर्यात शुल्क रद्द, पण अंमलबजावणी कधी?.
बीड कारागृहात उरली फक्त कराड गँग; आठवले आणि गीते गँगचे गंभीर आरोप
बीड कारागृहात उरली फक्त कराड गँग; आठवले आणि गीते गँगचे गंभीर आरोप.
प्रशांत कोरटकरला कोल्हापूर न्यायालयाचा दणका, जामीन अर्ज फेटाळला
प्रशांत कोरटकरला कोल्हापूर न्यायालयाचा दणका, जामीन अर्ज फेटाळला.
एकाच दिवसात 183 जीआर आणि कोट्यवधींच्या निधीचे वाटप
एकाच दिवसात 183 जीआर आणि कोट्यवधींच्या निधीचे वाटप.
'...त्यात तोंड घालू नका', धस दमानिया आणि तृप्ती देसाईंवर भडकले
'...त्यात तोंड घालू नका', धस दमानिया आणि तृप्ती देसाईंवर भडकले.
दिल्लीचा तख्त रखायचा असेल तर.., मुनगंटीवारांनी पुन्हा व्यक्त केली खदखद
दिल्लीचा तख्त रखायचा असेल तर.., मुनगंटीवारांनी पुन्हा व्यक्त केली खदखद.
'एप्रिल फूल' डेला आपल्याकडे 'अच्छे दिन' म्हणतात - आदित्य ठाकरेंची
'एप्रिल फूल' डेला आपल्याकडे 'अच्छे दिन' म्हणतात - आदित्य ठाकरेंची.
पुणे-मुंबई एक्स्प्रेसवेवरून प्रवास करताय? तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी
पुणे-मुंबई एक्स्प्रेसवेवरून प्रवास करताय? तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी.