दुसरीही मुलगी झाली म्हणून जिवंत जाळण्याचा प्रयत्न, डॉक्टर पती फरार, पोलीस कन्येची हादरुण सोडणारी बातमी

पोलिसाच्याच मुलीबद्दल झालेल्या दुरव्यवहार लक्षात येताच कळंब पोलिसांनी मध्य रात्री बीडचे शासकीय रुग्णालय गाठले आणि पीडितेची तक्रार घेत डॉक्टर पती आणि सासरच्या नातेवाईकांवर गुन्हा दाखल केला आहे.

दुसरीही मुलगी झाली म्हणून जिवंत जाळण्याचा प्रयत्न, डॉक्टर पती फरार, पोलीस कन्येची हादरुण सोडणारी बातमी
Follow us
| Updated on: Jan 24, 2021 | 10:46 AM

बीड : एकीकडे मुलींच्या जन्माचं स्वागत व्हावं, सन्मान व्हावा त्यांना समतेची वागणूक मिळावी म्हणून शासन प्रशासन झटत आहे. समाजातल्या सुशिक्षित वर्गाकडून मुलगा-मुलगी समानतेची आशा सगळेच जण बाळगतात. मात्र राष्ट्रीय कन्या दिवसाच्या पूर्वसंध्येला बीडमधून हादरवून सोडणारी बातमी आहे. दुसरीही मुलगी झाली म्हणून पोलीस कर्मचाऱ्याच्या विवाहित मुलीला डॉक्टर पतीने जिवंत जाळण्याचा प्रयत्न केला. (Attempt by a doctor’s husband to burn alive the married daughter of a police officer Beed Crime)

वंशाचा दिवा हवा या हव्यासापोटी माणूस कुठल्या थराला जाऊ शकतो याचा काही नेम नाही. याच हव्यासापोटी बीडमध्ये दुसरीही मुलगीच झाल्याने सासरच्या लोकांनी विवाहितेला जिवंत जाळण्याचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. विशेष म्हणजे ही विवाहिता पोलीस कर्मचाऱ्याची मुलगी आहे. तिच्यावर बीडच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी पीडितेची तक्रार घेण्याऐवजी उस्मानाबादच्या कळंब पोलिसांनी विवाहितेला हाकलून दिल्याचा घृणास्पद प्रकार समोर आला होता. टीव्ही 9 मराठीने पीडितेची बाजू जगासमोर मांडताच राज्यात एकच खळबळ उडाली होती.

पोलिसाच्याच मुलीबद्दल झालेल्या दुरव्यवहार लक्षात येताच कळंब पोलिसांनी मध्य रात्री बीडचे शासकीय रुग्णालय गाठले आणि पीडितेची तक्रार घेत डॉक्टर पती आणि सासरच्या नातेवाईकांवर गुन्हा दाखल केला आहे. विशाल घुगे असं आरोपी डॉक्टरचं नाव असून गुन्हा दाखल झाल्यानंतर तो फरार झाला आहे.

आरोपी डॉक्टर बार्शीत आरोग्य अधिकारी

आरोपी विशाल घुगे हा बार्शी तालुक्यातील पानगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात आरोग्य अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. गतवर्षी मुलींच्या जन्मदारात वाढ व्हावी यासाठी जनजागृती मोहिमेची जबाबदारी याच विकृत डॉक्टरकडे होती. मात्र स्वतःलाच दुसरी मुलगी झाली म्हणून पत्नीला जिवंत जाळण्याचा प्रयत्न केल्याने याच्याविरुद्ध जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल झाला आहे. त्याच्या या नीच कृत्यामुळे डॉक्टरी पेशा पुन्हा एकदा कलंकीत झाला आहे.

मध्यरात्री गुन्हा दाखल झाल्यानंतर आरोपी विशाल घुगे हा पसार झाल्याने पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होतोय. दरम्यान या विकृत डॉक्टरला कायमस्वरूपी बडतर्फ करून त्याची पदवी रद्द करावी अशी मागणी मनसेच्या जिल्हाप्रमुख रेखा अंबुरे यांनी केली आहे.

(Attempt by a doctor’s husband to burn alive the married daughter of a police officer Beed Crime)

हे ही वाचा :

पोलिसांच्या मुलीही असुरक्षित, दुसरीही मुलगी झाल्याने सासरकडून जिवंत जाळण्याचा प्रयत्न

निवृत्त पोलीस हवालदाराची पत्नी, मुलासह आत्महत्या; आत्महत्येचं कारण वाचून हादराल

पोलिसांच्या मुलीही असुरक्षित, दुसरीही मुलगी झाल्याने सासरकडून जिवंत जाळण्याचा प्रयत्न

खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.