भावना गवळी भडकल्या, तक्रार थेट केंद्रीय गृहमंत्रालयाकडेच, नेमकं प्रकरणं काय…?

अकोला रेल्वे स्टेशनवर घडलेला प्रकार गंभीर आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यात आपण राहतो, त्यामुळे कालच्या प्रकाराबद्दल महिला आयोगाकडेच तक्रार करणार असल्याचे भावना गवळींनी सांगितले.

भावना गवळी भडकल्या, तक्रार थेट केंद्रीय गृहमंत्रालयाकडेच, नेमकं प्रकरणं काय...?
Follow us
| Updated on: Nov 23, 2022 | 8:16 PM

मुंबईः आधी शिवसेनेच्या आणि नंतर शिंदे गटात प्रवेश केलेल्या खासदार भावना गवळी यांनी आपल्यावर अकोल्यात खासदार विनायक राऊत, नितीन देशमुख यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह हल्ला करण्याचा प्रयत्न केला असल्याची तक्रार त्यांनी अकोला जिल्हा पोलीस प्रमुखांकडे केली आहे. त्यामुळे कालचे अकोला रेल्वे स्टेशनवर खासदार भावना गवळी यांच्याविरोधात झालेली घोषणाबाजी खासदार विनायक राऊत आणि नितीन देशमुख यांना महागात पडणार का असा सवाल आता उपस्थित होऊ लागला आहे.

शिंदे गटाच्या खासदार भावना गवळी अकोल्याहून रेल्वेने मुंबईला येत असताना त्यांच्या विरोधात खासदार विनायक राऊत, नितीन देशमुख यांनी कार्यकर्त्यांना चिथावणी खोर घोषणा देण्याच्या सूचना केल्या, त्यांनी आपल्यावर हल्ला केल्याचा प्रयत्न केला असल्याचा आरोपही त्यांनी त्यांच्यावर केला आहे.

त्यामुळे त्यांनी राज्य गृहमंत्र्यालय आणि केंद्रीय गृहमंत्रालयाकडे तक्रार करणार असल्याचे म्हटले आहे. त्याचबरोबर त्या याबाबत महिला आयोगाकडेही तक्रार करणार असल्याचे सांगितले आहे.

एका महिला लोकप्रतिनिधींवर एवढ्या हीन पातळीवर जाऊन कोणी राजकारण करत असेल तर ते चुकीचे असल्याचे सांगत. त्यांनी याची तक्रार मी केंद्राकडे करणार असल्याचेही त्यांनी सांगितले. शिंदे गट नेहमी विकासाचे आणि जनसामान्य माणसांच्या अडीअडचणी डोळ्यासमोर ठेऊन आम्ही राजकारण करत आलो आहे.

विनायक राऊत आणि नितीन देशमुख यांच्याप्रमाणे हीन दर्जाचे राजकारण आम्ही केले नसल्याचेही त्यांनी सांगितले. माझ्याबाबतीत घडलेला प्रसंग विनायक राऊत अथवा नितीन देशमुख यांच्या घरातीली महिलांबाबत घडला असता तर त्यांनी काय केले असते असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे.

खासदार भावना गवळी यांनी काल घडलेल्या अकोला रेल्वे स्टेशनवरील प्रकार हा गंभीर असल्याचे सांगत त्यांनी आपली तक्रार थेट महिला आयोगाकडे करणार असल्याचे सांगितले आहे. त्यामुळे भावना गवळी वाद आणि ठाकरे गटाचा वाद पुन्हा वाढणार असल्याचे दिसून येत आहे.

खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.