AU चा संबंध आदित्य ठाकरेंशी नाही? रिया चक्रवर्तीनेच सांगितलंय.. संजना घाडींचा दावा, ‘हा’ व्हिडिओ ट्विट…
मी आजपर्यंत आदित्य ठाकरेंना भेटलेले नाही. माझ्याकडे त्यांचा नंबरही नाही.. असं उत्तर रिया चक्रवर्तीने एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत दिलं आहे.
मुंबईः दिशा सालियान (Disha Salian) मृत्यू प्रकरणाचा संबंध आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांच्याशी आहे का, हे तपासून पाहण्यासाठी आज विरोधकांनी अधिवेशनात मोठा गोंधळ घातला. या प्रकरणी एसआयटीतर्फे (SIT) तपास व्हावा, अशी मागणी केली जात आहे. रिया चक्रवर्तीच्या फोनमध्ये AU नावाने कुणाचा नंबर होता, हे उघड झालं पाहिजे, अशी मागणी केली जातेय, त्याबद्दल स्वतः रिया चक्रवर्ती हिनेच खुलासा केला होता. त्यासंबंधीचा एक जुना व्हिडिओ शिवसेना ठाकरे गटाच्या माजी नगरसेविका संजना घाडी यांनी ट्विट केला आहे.
संजना घाडी यांनी खासदार राहुल शेवाळेंना उद्देशून हे ट्विट केलंय. त्यांनी हा व्हिडिओ पाहावा, असे आवाहन केले आहे. सुशांतसिंग राजपूत प्रकरणात संशयाच्या घेऱ्यात असलेल्या रिया चक्रवर्तीची एका वृत्त वाहिनीवरील मुलाखतीतला हा व्हिडिओ आहे.
सुशांतसिंगच्या मृत्यू पूर्वी रिया चक्रवर्तीला AU नावाने सेव्ह असलेल्या फोन नंबरवरून ४४ वेळा कॉल आला होता, तो नंबर नेमका कुणाचा आहे, अशी मागणी खासदार राहुल शेवाळे, नितेश राणे, भरत गोगावले तसेच महिला आमदारांनी लावून धरली आहे.
राहुल शेवाळे विडियो पाहावा!@shewale_rahul pic.twitter.com/STY3Wnz8Fv
— Sanjana Ghadi – संजना घाडी (@GhadiSanjana) December 21, 2022
संजना घाडी यांनी ट्विट केलेल्या त्या व्हिडिओत रिया चक्रवर्तीला विचारण्यात आलंय की, मुंबई पोलिसांवर या प्रकरणी काही राजकीय दबाव आहे का? AU चा अर्थ आदित्य उद्धव ठाकरे असा आहे का?
उत्तर देताना रिया चक्रवर्ती म्हणतेय, माझी एक मैत्रीण आहे अनया उदास. तिचे नाव AU नावाने सेव्हा आहे. पण लोकांनी त्याचा आदित्य उद्धव..असा अर्थ घेतलाय.
तिनेही स्पष्टीकरण दिलंय. पण पुन्हा याच्याशी आदित्य ठाकरेंशी संबंध जोडला जातोय… मी आजपर्यंत आदित्य ठाकरेंशी भेटलेले नाही. माझ्याकडे त्यांचा नंबरही नाही.. मला प्रोटेक्ट करण्यासाठी राजकीय दबाव आणला जातोय, असं म्हटलं जातंय. मात्र तसं काहीही नाही, मला उलट प्रोटेक्शनची गरज आहे, असं उत्तर रिया चक्रवर्तीने दिलं आहे.
SIT मार्फत चौकशी होणार
भाजप तसेच शिंदे गटाच्या आमदारांनी आज विधानसभेत दिशा सालियान मृत्यू प्रकरणाची एसआयटीमार्फत चौकशी व्हावी, हा मुद्दा जोरदार लावून धरला. यावरून सभागृह अनेक वेळा तहकूब करावे लागले. अखेर आज गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणाची चौकशी एसआयटीमार्फत व्हावी, अशा सूचना दिल्या आहेत.