Corona | पुण्यात कोरोनाबाधितांची संख्या वाढली, राज्यातील रुग्णांची संख्या 33 वर

पुण्यामध्ये एक कोरोनाग्रस्त रुग्ण आढळल्याने राज्यातील कोरोना बाधितांची संख्या आता 33 वर पोहोचली आहे.

Corona | पुण्यात कोरोनाबाधितांची संख्या वाढली, राज्यातील रुग्णांची संख्या 33 वर
त्यामुळे अशा काळात स्वत:चा या कोरोना विषाणूपासून बचाव करणे हा एकमात्र पर्याय आहे. त्यासाठी स्वच्छता पाळणे अत्यंत महत्त्वाचे आहे.
Follow us
| Updated on: Mar 15, 2020 | 7:52 PM

औरंगाबाद : जगभरात हाहा:कार माजवणाऱ्या (pune Corona Positive Case) कोरोनाची देशासह राज्यातही दहशत पसरली आहे. पुण्यात आणखी एक कोरोनाग्रस्त रुग्ण आढळल्याने राज्यातील कोरोना बाधितांची संख्या आता 33 वर पोहोचली आहे. तर पुण्यात कोरोना रुग्णांची संख्या 15 वरुन 16 झाली आहे.

औरंगाबादेत आज दुपारी 59 वर्षीय महिला कोरोना पॉझिटिव्ह असल्याचं निष्पन्न झालं होतं. ही महिला रशिया आणि कझाकिस्तानचा दौरा करुन (pune Corona Positive Case) आली होती. सध्या तिच्यावर उपचार सुरु आहेत. त्या पाठोपाठ पुण्यातही आज आणखी एक कोरोनाचा रुग्ण आढळला आहे.

हेही वाचा : इटलीत अडकलेले 218 भारतीय मायदेशी, ‘इथे’ होणार रवानगी

औरंगाबाद आणि पुण्याच्या रुग्णानंतर राज्यात कोरोनाची लागण झालेल्या (Aurangabad Corona Positive Case) रुग्णांची संख्या 33 वर येऊन पोहोचली आहे. त्यासोबतच महाराष्ट्र देशात सर्वाधिक कोरोनाचे रुग्ण असलेलं राज्य ठरलं आहे. तर, दुसऱ्या क्रमांकावर केरळ आहे. केरळमध्ये कोरोनाचे 22 रुग्ण आहेत. कुटुंब आणि आरोग्य कल्याण मंत्रालयाच्या सध्याच्या आकडेवारीनुसार, सध्या संपूर्ण देशात 108 कोरोनाबाधित रुग्ण आहेत. त्यातील 33 रुग्ण हे महाराष्ट्रातील आहेत.

कोरोना बाधितांच्या संख्येत दररोज वाढ होत आहे. त्यामुळे महाराष्ट्राचा धोका वाढत आहे. ही चिंतेची बाब आहे. कोरोना विषाणूचा संसर्ग पसरु नये यासाठी राज्य सरकारकडून कठोर निर्णय घेतले जात आहेत. अनेक जिल्ह्यांमध्ये आपत्ती व्यवस्थापन कायदा लागू करण्यात आला आहे. तर मुंबईतही कलम 144 लागू करण्यात आलं आहे. तसेच, राज्यातील शाळास कॉलेज, जिम, मॉल, चित्रपट गृह हे 31 मार्चपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

कोरोनाचे कुठे किती रुग्ण?

  • पुणे – 16
  • मुंबई – 5
  • नागपूर – 4
  • यवतमाळ – 2
  • नवी मुंबई – 2
  • ठाणे – 1
  • कल्याण – 1
  • अहमदनगर – 1
  • औरंगाबाद – 1

महाराष्ट्रात कुठे आणि कधी कोरोनाचे रुग्ण आढळले?

  • पुण्यातील दाम्पत्य (2) – 9 मार्च
  • पुण्यातील दाम्पत्याची मुलगी (1) – 10 मार्च
  • पुण्यातील कुटुंबाचा नातेवाईक (1)– 10 मार्च
  • पुण्यातील कुटुंबाला नेणारा टॅक्सी चालक (1)– 10 मार्च
  • मुंबईतील सहप्रवासी (2) – 11 मार्च
  • नागपूर (1) – 12 मार्च
  • पुणे (1) – 12 मार्च
  • पुणे (3) – 12 मार्च
  • ठाणे (1) – 12 मार्च
  • मुंबई (1) – 12 मार्च
  • नागपूर (2) – 13 मार्च
  • पुणे (1) – 13 मार्च
  • अहमदनगर (1) – 13 मार्च
  • मुंबईत (1) – 13 मार्च
  • नागपूर (1) – 14 मार्च
  • यवतमाळ (2) – 14 मार्च
  • मुंबई (1) – 14 मार्च
  • वाशी (1) – 14 मार्च
  • पनवेल (1) – 14 मार्च
  • कल्याण (1) – 14 मार्च
  • पिंपरी चिंचवड (5) – 14 मार्च
  • औरंगाबाद (1) – 15 मार्च
  • पुणे (1) – 15 मार्च
  • एकूण – 33 कोरोनाबाधित रुग्ण

Aurangabad Corona Positive Case

संबंधित बातम्या :

‘आयसिस’लाही कोरोनाची धास्ती, युरोप दहशतवाद्यांच्या टार्गेटवरुन दूर

Corona | कोल्हापुरात पोल्ट्री व्यावसायिकाकडून साडेतीन लाख कोंबडीची पिल्लं, 2 लाख अंडी नष्ट

Corona | कोरोनाची भीती! मुंबईतील आयआयटीचे वर्ग, प्रयोगशाळा 29 मार्चपर्यंत बंद

Corona | महाराष्ट्रात कोरोनाचे आणखी पाच रुग्ण, देशातील आकडा 100 च्या पार, पाक सीमा सील

Non Stop LIVE Update
बाप.. बाप होता है, विजयानंतर काय म्हणाले धर्मरावबाबा आत्राम
बाप.. बाप होता है, विजयानंतर काय म्हणाले धर्मरावबाबा आत्राम.
साकोलीत नाना पटोले यांचा कसाबसा निसटता विजय, पाहा काय घडले?
साकोलीत नाना पटोले यांचा कसाबसा निसटता विजय, पाहा काय घडले?.
वसईतून भाजपाच्या स्नेहा दुबे विजयी, काय म्हणाल्या...पाहा
वसईतून भाजपाच्या स्नेहा दुबे विजयी, काय म्हणाल्या...पाहा.
'या' दिग्गज नेत्यांचा दारूण पराभव, कोणाच्या जिव्हारी लागला निकाल?
'या' दिग्गज नेत्यांचा दारूण पराभव, कोणाच्या जिव्हारी लागला निकाल?.
..अन् मुसंडी, भाजप-महायुतीच्या यशाचं क्रेडिट फक्त फडणवीसांना कारण...
..अन् मुसंडी, भाजप-महायुतीच्या यशाचं क्रेडिट फक्त फडणवीसांना कारण....
माहिममध्ये अमित ठाकरे,सदा सरवणकर पराभूत; ठाकरे गटाच्या उमेदवाराची बाजी
माहिममध्ये अमित ठाकरे,सदा सरवणकर पराभूत; ठाकरे गटाच्या उमेदवाराची बाजी.
भावानं परळीचा गड राखला... धनंजय मुंडे म्हणाले, 'माझी बहीण पंकजा...'
भावानं परळीचा गड राखला... धनंजय मुंडे म्हणाले, 'माझी बहीण पंकजा...'.
महायुतीच्या विजयनानंतर एकनाथ शिंदे म्हणाले, ही तर लँडस्लाईड व्हिक्ट्री
महायुतीच्या विजयनानंतर एकनाथ शिंदे म्हणाले, ही तर लँडस्लाईड व्हिक्ट्री.
फडणवीस CM होणार? सलग तिसऱ्यांदा महाराष्ट्राच्या चाणाक्यावर मात अन्...
फडणवीस CM होणार? सलग तिसऱ्यांदा महाराष्ट्राच्या चाणाक्यावर मात अन्....
कणकवलीत भाजपचा जल्लोष, निलेश राणे म्हणाले, आता अल्लाहू अकबर नाही तर...
कणकवलीत भाजपचा जल्लोष, निलेश राणे म्हणाले, आता अल्लाहू अकबर नाही तर....