मुंबई, पुण्यानंतर औरंगाबाद कोरोनाचा नवा हॉटस्पॉट, दिवसेंदिवस रुग्ण वाढतेच
औरंगाबादमध्ये कोरोनाने थैमान घातलं आहे. औरंगाबादेत आणखी 24 जणांचा रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह (Aurangabad Corona Positive Cases) आला आहे.
औरंगाबाद : राज्यात कोरोनाबाधितांचा आकडा दिवसेंदिवस वाढत चालला (Aurangabad Corona Positive Cases) आहे. औरंगाबादमध्ये कोरोनाने थैमान घातलं आहे. औरंगाबादेत आणखी 24 जणांचा रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे औरंगाबाद शहर आणि ग्रामीण भागात कोरोनाचा वाढता कहर पाहायला मिळत आहे.
औरंगाबादमध्ये आज (12 मे) दिवसाच्या सुरुवातीलाच 24 जणांचा रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह (Aurangabad Corona Positive Cases) आला आहे. त्यामुळे कोरोनाबाधितांचा आकडा हा 651 वर पोहोचला आहे. तर दुसरीकडे आतापर्यंत 15 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे औरंगाबादेत कोरोनाचा हाहा:कार पाहायला मिळत आहे.
दरम्यान औरंगाबादेत काल (11 मे) दिवसभरात तब्बल 69 जणांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले. त्यातील 18 जण हे 17 वर्षावरील कमी वयोगटाची आहेत. यात जवळपास 8 मुले आणि 9 मुलींचा समावेश आहे. तर 5 मुले ही 10 वर्षांपेक्षा कमी वयाची आहेत. औरंगाबादेत सोमवारी 69, तर रविवारी 50 नवे रुग्ण आढळले होते.
औरंगाबादमध्ये 15 मार्च रोजी पहिला कोरोनाबाधित रुग्ण आढळला होता. या रुग्णानंतर कोरोनाबाधितांचा आकड्यात काहीशी वाढ होत होती. मात्र गेल्या 20 दिवसात हा आकडा प्रचंड वेगाने वाढत आहेत. त्यामुळे सद्यस्थितीत कोरोनाची साखळी तोडण्याचे मोठं आवाहन प्रशासनापुढे आहे.
राज्यात कोरोनाबाधितांचा आकडा वाढला
महाराष्ट्रात कोरोनाचं थैमान सुरुच आहे. राज्यात काल (11 मे) दिवसभरात 1 हजार 230 नवे रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या 23 हजार 401 वर पोहोचली आहे. दरम्यान, राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असला तरी कोरोनावर मात करणाऱ्या रुग्णांची संख्यादेखील हळूहळू वाढू लागली आहे. राज्यात काल दिवसभरात 587 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. राज्यात आतापर्यंत 4 हजार 786 रुग्ण बरे झाले (Aurangabad Corona Positive Cases) आहेत.
संबंधित बातम्या :
1 वरुन 31 रुग्णांपर्यंत मजल, मालेगावनंतर आता येवलाही कोरोनाचा हॉटस्पॉट ठरण्याची भीती
औरंगाबादमध्ये कोरोना रुग्णांचा आकडा वाढताच, रुग्णांची संख्या 600 च्या वर