Corona : औरंगाबादेत गर्भवती महिलेसह तिघांना करोना, आकडा 28 वर

औरंगाबादेत एका गर्भवती महिलेसह तिघांना करोनाची लागण झाली आहे. औरंगाबादेत तीन जणांचे करोना अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.

Corona : औरंगाबादेत गर्भवती महिलेसह तिघांना करोना, आकडा 28 वर
Follow us
| Updated on: Apr 16, 2020 | 2:45 PM

औरंगाबाद : राज्यात कोरोनाचा विळखा दिवसेंदिवस वाढत (Aurangabad Corona Update) चालला आहे. औरंगाबादेत एका गर्भवती महिलेसह तिघांना करोनाची लागण झाली आहे. औरंगाबादेत तीन जणांचे करोना अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे आता औरंगाबादेत करोनाबधितांचा आकडा हा 28 वर (Aurangabad Corona Update) येऊन पोहोचला आहे.

याविषयी डॉ. सुंदर कुलकर्णी आणि डॉ. अरविंद गायकवाड यांनी माहिती दिली आहे. कोरोनाची लागण झालेली महिला ही नऊ महिन्यांची गर्भवती आहे. या गर्भवती महिलेची आज सायंकाळपर्यंत प्रसुती होण्याची शक्यता आहे, असंही, डॉ. सुंदर कुलकर्णी यांनी सांगितलं. या कोरोनाबाधित महिलेच्या प्रसुतीसाठी रुग्णालय स्टाफ सज्ज झाला आहे.

बारामतीतील पहिला ‘कोरोना’ रुग्ण ठणठणीत

बारामतीतील पहिला ‘कोरोना’ रुग्ण असलेला रिक्षाचालक ‘कोरोना’मुक्त झाला आहे. रिक्षाचालकाला लागण झाल्याने बारामती तालुक्यात ‘कोरोना’चा शिरकाव झाला होता. त्याच्यावर पुण्यातील नायडू रुग्णालयात उपचार सुरु होते. उपचार आणि तपासणीनंतर आता त्या रिक्षाचालकाची प्रकृती ठणठणीत असल्याचं समोर आलं आहे. यामुळे बारामतीकरांना मोठा दिलासा मिळाला आहे.

Aurangabad Corona Update

हिंगोलीतून गुड न्यूज

दुसरीकडे, हिंगोली जिल्ह्यातील पहिल्या कोरोना रुग्णाचा रिपोर्टही निगेटिव्ह आला आहे. हिंगोली जिल्हाच्या पालकमंत्री वर्षा गायकवाड यांनी ट्विटरवरुन ही माहिती दिली. ‘ही बाब दिलासादायक आहे. जिल्हा प्रशासन चांगली कामगिरी बजावत आहे. तसेच जिल्ह्यातील सर्व नागरिकांच्या सहकार्यबद्दल मी ऋणी आहे’ अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या आहेत.

राज्यातीस स्थिती काय?

राज्यातील कोरोना बाधितांची संख्या 2916 वर पोहचली आहे. काल नव्याने 232 रुग्णांची नोंद झाली. आज दिवसभरात 36 रुग्णांना उपचारानंतर घरी सोडण्यात आले (Total Corona Patient in Maharashtra). आतापर्यंत राज्यभरातील 295 रुग्ण बरे झाले आहेत. आजपर्यंत राज्यात 52 हजार कोरोना चाचण्या झाल्या आहेत. यातील 48 हजार 198 जण कोरोना निगेटिव्ह आले आहेत, तर 2916 जण कोरोना पॉझिटिव्ह आले. सध्या राज्यात 69 हजार 738 लोक होम क्वारंटाईनमध्ये, तर 5617 लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

Aurangabad Corona Update

संबंधत बातम्या :

Corona – जगभराची खबरबात | अमेरिकेत दिवसभरात 2600 ‘कोरोना’बळी, महाराष्ट्रात नवे रुग्ण घटले

Corona : पुण्यात कोरोनाबाधित क्षेत्रातील बँका बंद ठेवण्याचे आदेश, एटीएम मात्र सुरु

आजाराचा बनाव, पुणे मनपा कर्मचाऱ्यांना सेवामुक्त करणार, अतिरिक्त आयु्क्तांचा इशारा

बारामतीतील रिक्षाचालक ‘कोरोना’मुक्त, हिंगोलीतील पहिल्या रुग्णाचे रिपोर्टही निगेटिव्ह

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.