औरंगाबादेत भर रस्त्यात माथेफिरुचा चौघांवर चाकू हल्ला, एकाचा मृत्यू
मध्यरात्रीच्या सुमारास नितीन उर्फ गब्या खंडागळे या तरुणाने तिघांवर हल्ला केला. (Aurangabad Man attacks knife)
औरंगाबाद : औरंगाबादेत माथेफिरुने चौघांवर चाकू हल्ला केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. चाकू हल्ल्यात एकाचा मृत्यू झाला, तर तिघे जण गंभीर जखमी झाले आहेत. पोलिसांनी हल्लेखोराला जेरबंद करण्यात यश मिळवलं आहे. (Aurangabad Crime Man attacks four men with knife)
औरंगाबादच्या अंगुरीबाग परिसरात ही घटना घडली. मंगळवारी मध्यरात्रीच्या सुमारास नितीन उर्फ गब्या खंडागळे या तरुणाने तिघांवर हल्ला केला. या प्रकरणी औरंगाबादमधील क्रांतिचौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
हल्ल्यात दानिश सय्यद या तरुणाला आपले प्राण गमवावे लागले. तर शेख सलीम, शेख बाबा, शेख जब्बार हे तिघे जण चाकू हल्ल्यात गंभीर जखमी झाले आहेत. पोलिसांनी हल्लेखोर नितीन गब्या खंडागळेला बेड्या ठोकल्या आहेत.
रत्नागिरीत माथेफिरुच्या कोयता हल्ल्यात सात जण जखमी
माथेफिरु तरुणाने तब्बल सात जणांवर कोयत्याने जीवघेणा हल्ला केल्याची घटना गेल्या वर्षी रत्नागिरी जिल्ह्यातील लांजा गावात घडली होती. धक्कादायक म्हणजे या माथेफिरुने सर्वांच्या मानेवर, हातावर आणि डोक्यावर हल्ला केला होता. जखमींमध्ये एका पाच वर्षाच्या बालकाचाही समावेश होता.
यवतमाळमध्ये एकतर्फी प्रेमातून तरुणीवर हल्ला
एकतर्फी प्रेम प्रकरणातू माथेफिरुने तरुणीवर जीवघेणा हल्ला केल्याची घटना महिन्यापूर्वी घडली होती. यवतमाळच्या घाटंजी तालुक्यातील मारेगाव इथं हा सगळा प्रकार घडला होता. त्यामुळे महिलांच्या सुरक्षितेचा प्रश्न पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला. ही तरुणी शेतात काम करत होती, तेव्हा संबंधित तरुण तिथे गेला होता. आणि हातातील धारदार शस्त्राने त्याने तिच्यावर सपासप वार केले होते. त्यामुळे रक्तबंबाळ झालेली तरुणी जागेवरच कोसळली होती.
हा सगळा प्रकार शेताच्या दुसऱ्या बाजूला असलेल्या मुलीच्या काकाने पाहिला. त्यानंतर तो तातडीने तिथे धावत गेला. मात्र, तोपर्यंत तरुणानं तिथून पोबारा केला होता. या घटनेत गंभीर जखमी झालेल्या तरुणीला खांद्यावर घेऊन अर्धा किलोमीटरपर्यंत तिचा काका धावत होता. त्यानंतर गावातून दुचाकीवर तिला उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल केलं. काकाने वेळीच धाव घेतल्यानं तरुणीचे प्राण वाचल्याचं डॉक्टरांनी सांगितलं होतं.
संबंधित बातम्या :
माथेफिरुचा 7 जणांवर कोयत्याने हल्ला, मानेवर, डोक्यात वार, जखमींमध्ये 5 वर्षांचा चिमुकला
यवतमाळमध्ये एकतर्फी प्रेमातून तरुणीवर शेतात जीवघेणा हल्ला
(Aurangabad Crime Man attacks four men with knife)