औरंगाबादचं संभाजीनगर नामांतरावरून शिवसेनेच्या दोन गटातच हमरी-तुमरी, MIM चं आंदोलनही चिघळणार, आज काय?

नामांतरावरून शहरातील नागरिकांकडून जनमत चाचणी घ्यावी, अशी मागणी खा. जलील यांनी केली आहे. औरंगाबाद नामांतर विरोधी संघर्ष समितीचा छत्रपती संभाजीनगर नामांतराच्या विरोधात आज कँडल मार्च निघणार आहे.

औरंगाबादचं संभाजीनगर नामांतरावरून शिवसेनेच्या दोन गटातच हमरी-तुमरी, MIM चं आंदोलनही चिघळणार, आज काय?
Image Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Mar 09, 2023 | 11:57 AM

दत्ता कनवटे,  छत्रपती संभाजीनगर : औरंगाबाद (Aurangabad) शहराचं नाव छत्रपती संभाजीनगर (Sambhajinagar) केल्याचा वाद आता आणखीच चिघळलेला दिसतोय. नामांतराविरोधात एमआयएमचा पूर्वीपासूनचाच लढा आहे. तर आता शिवसेनेत फूट पडल्याने शहरातील दोन गटातच परस्परांवर आरोप प्रत्यारोप सुरु आहेत. गेल्या सहा दिवसांपासून एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांच्या नेतृत्वात नामांतर विरोधी कार्यकर्ते साखळी उपोषणाला बसले आहेत. तर इकडे शिंदे विरुद्ध ठाकरे गटाच्या नेत्यांमधले वादही विकोपाला गेले आहेत. औरंगजेबाची कबर हैदराबादला हलवण्याची मागणी शिंदे गटाच्या नेत्यांनी केली. यावरून चंद्रकांत खैरेंनी त्यांची पोलिसात तक्रार केली. तर चंद्रकांत खैरे हे आता मुस्लिमांचं लांगुलचालन करत आहेत, अशी टीका शिंदे गटाच्या नेत्याने केली आहे.

जैस्वाल, शिरसाट विरुद्ध खैरे वाद पेटला

ज्यांना औरंगजेबाबद्दल प्रेम आहे, त्यांनी संभाजीनगरातील औरंगजेबाची कबर हैदराबाद येथे घेऊन जावी, अशी मागणी शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट तसेच प्रदीप जैस्वाल यांनी केली आहे. त्यावरू चंद्रकांत खैरे आक्रमक झाले आहेत. चंद्रकांत खैरे म्हणाले की, शहराचा वातावरण बिघडण्याचं काम काही लोक करत आहेत. शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाठ आणि प्रदीप जयस्वाल यांच्यावरही औरंगजेबच्या कबरीवरील वक्तव्याविरोधात कारवाई करण्याची मागणी चंद्रकांत खैरे यांनी केली आहे.

आंदोलनाची नौटंकी कशाला?

तर एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांच्यावरही चंद्रकांत खैरे यांनी निशाणा साधला. नामांतराला विरोध असेल तर खा. जलील यांनी कोर्टात जावं, अशी आंदोलनाची नौटंकी का करताय, असा सवाल माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी केलाय.

‘खैरेंनी नाव बदलून चाँद खैरुद्दीन करावं…’

तर चंद्रकांत खैरे हे मुस्लिमांचं लांगुलचालन करत असल्याचा आरोप शिंदे गटाच्या नेत्यांनी केलाय. खैरे यांनी स्वतःचं नाव बदलून चाँद खैरुद्दीन औरंगबादी असं करावं, असा सल्ला शिंदे गटाची शिवसेना जिल्हा प्रमुख राजेंद्र जंजाळ यांनी दिला आहे. त्यांची ही सोशल मीडिया पोस्ट तुफान व्हायरल होत आहे. तर हैदराबादमध्ये औरंगजेबाची कबर नेऊन त्या कबरीचे इमाम म्हणून खैरे यांची नियुक्ती करावी, असं वक्तव्य जंजाळ यांनी केलंय.

MIM चा आज कँडल मार्च

दरम्यान, संभाजीनगर नामांतराविरोधात एमआयएमने अधिक आक्रमक भूमिका घेतली आहे. नामांतरावरून शहरातील नागरिकांकडून जनमत चाचणी घ्यावी, अशी मागणी खा. जलील यांनी केली आहे. औरंगाबाद नामांतर विरोधी संघर्ष समितीचा छत्रपती संभाजीनगर नामांतराच्या विरोधात आज कँडल मार्च निघणार आहे. जिल्हाधिकारी कार्यालयापासून भडकल गेट पर्यंत कँडल मार्च काढला जाणार आहे. आज सायंकाळी ६ वाजता हा मार्च निघणार आहे. खासदार इम्तियाज जलील स्वतः यात सहभाग घेतील. कँडल मार्चला अद्याप पोलिसांनी परवानगी दिली नसल्याची माहिती आहे.

भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.
'लाडक्या बहिणीं'नो मोठी बातमी, लाभार्थी महिलांना याच महिन्यात...
'लाडक्या बहिणीं'नो मोठी बातमी, लाभार्थी महिलांना याच महिन्यात....