औरंगाबादः शहरात सध्या मराठवाडा ऑटो क्लस्टरच्या (Marathwada Auto cluster) पुढाकारातून मिशन फॉर ग्रीन मोबिलिटी अभियान सुरु आहे. या अभियानाच्या माध्यमातून इलेक्ट्रिक वाहनांसाठी (Electric Vehicle) नागरिकांना प्रोत्साहन दिले जात आहे. शहरातील विविध उद्योजकांनी यासाठी पुढाकार घेत इलेक्ट्रिक चारचाकी खरेदी करण्याचे ठरवले असून चारचाकींचे उद्दिष्ट पूर्ण झाले आहे. शहरातर्फे आतापर्यंत 300 इलेक्ट्रिक चारचाकी वाहनांची बुकिंग करण्यात आली आहे. आता येत्या 25 आणि 26 मार्च रोजी मराठवाडा ऑटो क्लस्टरमध्ये दोन दिवसीय प्रदर्शन भरवण्यात येणार आहे. प्रदर्शनात एकूण 30 स्टॉल्स असतील तसेच ई चार्जिंग स्टेशन (E Charging Station) कंपन्यांचाही यात समावेश असेल. याद्वारे शहरातील जास्तीत जास्त नागरिकांना ई चार्जिंक स्टेशन उभारण्यासाठी प्रोत्साहन दिले जाईल.
शहरातील चारचाकी वाहनांसाठीचे 250 बुकिंगचे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते. प्रत्यक्षात अपेक्षेपेक्षा जास्त म्हणजेच 300 वाहनांसाठीचे बुकिंग झाले आहे. त्यामुळे आता तीनचाकी वाहनांच्या खरेदीसाठी जनजागृती केली जाणार आहे. शहरात जवळपास 500 तीनचाकींचे उद्दिष्ट आहे. त्यासाठीच दोन दिवसीय प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आल्याचे सीएमआयएचे माजी अध्यक्ष तथा मॅजिकचे विद्यमान संचालक आशिष गर्दे यांनी सांगितले.
औद्योगिक नगरी असलेल्या औरंगाबादसाठी तीनचाकी वाहनांची भूमिका मोठी आहे. अनेक उद्योजकांना कच्च्या मालाची वाहतूक करण्यासाठी लहान वाहनांची गरज असते. बाजारातही तीनचाकी वाहनांचा जास्त वापर होतो. त्यामुळे इलेक्ट्रिक तीनचाकी वाहनांचा वापर झाल्यास पर्यावरणाला अधिक लाभ होईल, म्हणून या वाहनधारकांमध्ये जनजागृतीले उद्दिष्ठ ठेवण्यात आले आहे.
शहरात येत्या 25 आणि 26 फेब्रुवारी रोजी होणाऱ्या प्रदर्शनात ईव्ही तंत्रज्ञानावर कार्यशाळा आणि व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे. येत्या काही वर्षात बाजारात विशेषतः इलेक्ट्रिक वाहन बाजारपेठेत अमूलाग्र बदल होणार आहे. अशा वाहनांमुळे वाहनधारकांचा खर्च मोठ्या प्रमाणावर कमी होणार आहे तसेच पर्यावरण रक्षणातही यांची मोठी भूमिका असेल. त्यासाठीच प्रदर्शनातून जनजागृती करण्यात येणार आहे. या प्रदर्शनाबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी https://bit.ly/AMGMExhibition या वेबसाइटला भेट द्यावी, असे आवाहन ऑटो क्लस्टरच्या वतीने करण्यात आले आहे.
शहरात सध्या ई चार्जिंग स्टेशन उभारण्यासाठी नागरिकांना प्रोत्साहन दिले जात आहे. आगामी काळात इलेक्ट्रिक वाहनांची संख्या वाढणार आहे. त्यामुळे या वाहनांसाठी चार्जिंग स्टेशन ही सर्वात महत्त्वाची गरज ठरणार आहे. ई चार्जिंग स्टेशन उभारण्यासाठी ही उत्तम संधी असून याद्वारे प्रयावरण संवर्धनातही हातभार लावता येईल. त्यामुळे जास्तीत जास्त नव्या उद्योजकांनी ई चार्जिंग स्टेशनचा विचार करावा, असे आवाहन करण्यात येत आहे.
इतर बातम्या-