Aurangabad Lockdown : औरंगाबादेतील लॉकडाऊनमध्ये बदल, पेट्रोल पंप आणि हॉटेल्ससाठी नवी नियमावली
औरंगाबादेतील कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्ह्यात 30 तारखेच्या मध्यरात्रीपासून 8 एप्रिलपर्यंत लॉकडाऊन जाहीर करण्यात आला होता. त्यात आता काहीसा बदल करण्यात आला आहे.
औरंगाबाद : राज्यात पुन्हा एकदा कोरोनाचा धोका मोठ्या प्रमाणात वाढत आहे. औरंगाबादेतील रुग्णसंख्याही मोठ्या प्रमाणात वाढतेय. औरंगाबादेतील कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्ह्यात 30 तारखेच्या मध्यरात्रीपासून 8 एप्रिलपर्यंत लॉकडाऊन जाहीर करण्यात आला होता. त्यात आता काहीसा बदल करण्यात आला आहे. आता हा लॉकडाऊन 31 मार्च ते 9 एप्रिल दरम्यान असणार आहे. यात पेट्रोल पंप आणि हॉटेल्ससाठी काही नवी नियमावली जारी करण्यात आली आहे.(Changes in lockdown in Aurangabad district, some relief to petrol pumps and hoteliers)
नव्या नियमावलीनुसार लॉकडाऊनच्या काळात सकाळी 8 ते दुपारी 12 वाजेपर्यंत पेट्रोल पंपावर नागरिकांना पेट्रोल उपलब्ध असणार आहे. तसंच हॉटेलमध्येही रात्री 8 वाजेपर्यंत होम डिलिव्हरी देऊ शकणार आहेत. प्रशासनाच्या सुधारित आदेशानुसार लॉकडाऊनच्या काळात नागरिकांना सकाळी 8 ते दुपारी 12 वाजेपर्यंत इंधन उपलब्ध असेल. तर 12 नंतर फक्त अत्यावश्यक सेवेतील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना ओळखपत्र दाखवल्यानंतर इंधन मिळेल. त्याचबरोबर शहरात होम आयसोलेशनची संख्या मोठी असल्यानं हॉटेल्सना रात्री 8 वाजेपर्यंत होम डिलिव्हरी करण्याची मुभा देण्यात आली आहे.
लॉकडाऊन दरम्यान शहरात तगडा पोलीस बंदोबस्त तैनात केला जाणार आहे. चौकाचौकात, गल्लीबोलात पोलिस पेट्रोलिंग करतील. त्याचबरोबर 16 पोलीस ठाण्याअंतर्गत ठराविक चौकात पोलिसांचा खडा पहारा असणार आहे. यावेळी पोलिसांच्या मदचतीला होमगार्डही असणार आहेत.
इम्तियाज जलील यांचा लॉकडाऊनला विरोध
औरंगाबाद जिल्ह्यात लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. मात्र, या निर्णयाला विरोधी पक्षाच्या नेत्यांकडून मोठा विरोध होत आहे. जिल्ह्यात लॉकडाऊन लावण्याच्या निर्णयाला AIMIMचे खासदार इम्तियाज जलील यांनी विरोध दर्शवला आहे. औरंगाबाद जिल्ह्यात लॉकडाऊन लावणं म्हणजे उद्योजकांना खुश करण्याचा प्रयत्न असल्याची टीका जलील यांनी केली आहे.
औरंगाबाज जिल्ह्यात लॉकडाऊन लावण्याच्या निर्णयाविरोधात इम्तियाज जलील यांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे. 31 मार्च रोजी लॉकडाऊनच्या निर्णयाविरोधात आंदोलन करण्यात येणार असल्याची घोषणा जलील यांनी केलीय. या आंदोलनावेळी वैद्यकीय विभागात तातडीने भरती करण्यात यावी अशी मागणीही केली जाणार आहे. औरंगाबाद जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग वाढत असल्यानं 30 मार्च ते 8 एप्रिल या कालावधीत पूर्ण लॉकडाऊन करण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला आहे. त्याला जलील यांनी तीव्र विरोध दर्शवला आहे.
काय सुरु राहणार?
औरंगाबाद जिल्ह्यातील लॉकडाऊनमधून उद्योग क्षेत्राला वगळण्यात आलं आहे. सर्व उद्योग आणि त्याचे पुरवठादार नियमानुसार काम करतील. औद्योगिक वस्तूंचा पुरवठा सुरळीत चालू ठेवण्यासाठी स्थानिक, आंतरजिल्हा, आंतरराज्य वाहतूक शासकीय नियमानुसार सुरु राहणार आहे. त्याचबरोबर वृत्तपत्रे, नियतकालिकांची छपाई आणि वितरण सुरु राहील. डिजिटल आणि प्रिंट मीडिया यांची कार्यालयेही शासकीय नियमानुसार सुरु राहणार आहेत. माहिती आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपन्यांनी वर्क फ्रॉम होमचा पर्याय निवडावा असे आदेशही जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आले आहेत.
Special Report | अमित शाह-शरद पवारांमध्ये भेट, पुन्हा महाराष्ट्रात राजकीय भूकंप होणार?https://t.co/FnpodcF1Cr#SharadPawar | #amitshah
— TV9 Marathi (@TV9Marathi) March 29, 2021
संबंधित बातम्या :
Aurangabad corona Update : घाटी रुग्णालयात कोरोना रुग्णांचे प्रचंड हाल, एका बेडवर 3 रुग्ण!
Changes in lockdown in Aurangabad district, some relief to petrol pumps and hoteliers