औरंगाबादमध्ये MIM ला तिसरा मोठा झटका, माजी नगरसेवकांचा राष्ट्रवादीत प्रवेश

माजी नगरसेविका साजेदा सईद फारुकी आणि सईद फारुकी यांनी राष्ट्रवादीचे घड्याळ हाती बांधले आहे. अलिकडेच एमआयएमच्या दोन नगरसेवकांनी पक्षाला रामराम ठोकला होता.

औरंगाबादमध्ये MIM ला तिसरा मोठा झटका, माजी नगरसेवकांचा राष्ट्रवादीत प्रवेश
औरंगाबादेत माजी नगरसेवकांच्या हाती घड्याळ
Follow us
| Updated on: Sep 19, 2021 | 8:22 AM

औरंगाबाद : औरंगाबाद महापालिका निवडणुकांच्या तोंडावर एमआयएमला आणखी एक धक्का बसला आहे. MIM च्या माजी नगरसेविकेने राष्ट्रवादीचा झेंडा हाती घेतला. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) आणि आरोग्य मंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) यांच्या उपस्थितीत एमआयएमच्या माजी नगरसेवकांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला.

एमआयएममध्ये गळती

माजी नगरसेविका साजेदा सईद फारुकी आणि सईद फारुकी यांनी राष्ट्रवादीचे घड्याळ हाती बांधले आहे. अलिकडेच एमआयएमच्या दोन नगरसेवकांनी पक्षाला रामराम ठोकला होता. महापालिका निवडणुकांच्या आधीच एमआयएममध्ये गळती सुरु झाली आहे. त्यामुळे महापालिका निवडणुकांमध्ये एमआयएमला झटका बसण्याची शक्यता आहे.

राष्ट्रवादीमध्ये इन्कमिंग वाढले

गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादीमध्ये मोठ्या प्रमाणात इन्कमिंग वाढल्याचे दिसत आहे. नुकतेच लोककलावंत सुरेखा पुणेकर आणि गायिका देवयानी बेंद्रे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. मुंबई महापालिकेतील माजी विरोधी पक्षनेते बबनराव गवस, मनसेच्या महिला पदाधिकारी मनिषा खैरे, अशोकराव सवने, प्रभाकर शेट्ये, संजय त्रिपाठी, सुरेश बागवे, नितीन पाटील, ओंकार गवस यांनीही राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे.

एमआयएम दहा विद्यमान नगरसेवकांना डच्चू देणार?

पक्षविरोधी काम, असमाधानकारक कामगिरी आणि मतदारांमधील नाराजी यामुळे दहा विद्यमान नगरसेवकांचा पत्ता कट होण्याचे संकेत आहेत. सध्या एमआयएमचे 25 नगरसेवक निवडून आले आहेत. परंतु दहा विद्यमान नगरसेवकांचा पत्ता कट होणार असल्याची माहिती आहे. निवडणुकीत पक्षाचा नव्या चेहऱ्यांना संधी देण्यावर भर असेल.

आगामी महापालिका निवडणुकीसाठी ‘एमआयएम’ने गेल्या वर्षी मार्च महिन्यात गुप्त सर्वेक्षण करुन नगरसेवकांची माहिती घेतली होती. या सर्व्हेचा अहवाल ‘एमआयएम’चे प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांना सादर करण्यात आला होता. त्यांच्या सूचनेनुसार दहा नगरसेवकांचे तिकीट कापले जाण्याची शक्यता आहे. म्हणजेच 15 विद्यमान लोकप्रतिनिधींना पुन्हा संधी मिळेल. एमआयएम सर्व 112 जागा लढवणार असल्यास जवळपास 100 नवे उमेदवार ‘एमआयएम’च्या तिकीटावर निवडणूक लढवताना दिसतील.

औरंगाबाद महापालिका निवडणुकांचे मतदान, मतमोजणी याविषयी अद्याप घोषणा झालेली नाही. परंतु त्याआधीच जिल्ह्यातील राजकीय वातावरण तापायला सुरुवात झाली आहे.

औरंगाबाद महापालिका पक्षीय बलाबल

शिवसेना – 29 एमआयएम – 25 भाजप – 22 काँग्रेस – 08 राष्ट्रवादी – 04 इतर – 24 एकूण – 112

संबंधित बातम्या :

औरंगाबादमध्ये भाजपला मोठा धक्का, माजी शहराध्यक्ष शिवसेनेच्या वाटेवर

राष्ट्रवादीच्या वाटेवर असणाऱ्या एमआयएमच्या तौफिक शेख यांचं नगरसेवक पद रद्द

ओवेसींकडे रिपोर्ट कार्ड, औरंगाबादेत ‘एमआयएम’ दहा विद्यमान नगरसेवकांना डच्चू देणार

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.