Ambadas Danve | दानवेंनी खोतकरांना संपवण्यासाठी ED चौकशी लावली, रावसाहेब दानवेंची संपत्ती ED ला दिसत नाही? शिवसेना आमदार अंबादास दानवेंचं वक्तव्य

औरंगाबाद महापालिकेसाठी स्वबळावर तयारी सुरू आम्ही सगळ्या जागावर निवडणूक लढवण्याची तयारी करत आहोत, शिंदे गटाने तयारी केली तरी आम्हाला फरक पडणार नाही, असं वक्तव्य अंबादास दानवे यांनी केलं आहे.

Ambadas Danve | दानवेंनी खोतकरांना संपवण्यासाठी ED चौकशी लावली, रावसाहेब दानवेंची संपत्ती ED ला दिसत नाही? शिवसेना आमदार अंबादास दानवेंचं वक्तव्य
अंबादास दानवे, शिवसेना आमदारImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Jul 28, 2022 | 2:32 PM

औरंगाबादः जालना लोकसभा मतदार संघाचे शिवसेना नेते अर्जुन खोतकर (Arjun Khotkar) यांच्यावर ईडी मार्फत दबाव आणला जातो. एकनाथ शिंदे (Eknath Shinde) गटात शामिल होण्यासाठी ईडीचा वापर केला जातोय, अशी टीका शिवसेनेच्या नेत्यांनी वारंवार केली आहे. खुद्द अर्जुन खोतकर यांनीदेखील आपल्यावर दबाव असल्याचे मान्य केले आहे. अर्जुन खोतकर काही दिवसातच एकनाथ शिंदे यांच्या गटात जातील, अशी चर्चा आहे. मात्र जालना लोकसभा मतदार संघाचे खासदार रावसाहेब दानवेंची (Raosaheb Danve) संपत्तीदेखील सर्वांना माहिती आहे. पण त्यांच्यामागे ईडीची चौकशी लावली जात नाही. ईडीला फक्त अर्जुन खोतकरच दिसतात, असा आरोप शिवसेनेचे विधान परिषद आमदार अंबादास दानवे यांनी केला आहे. गेल्या काही दिवसांपासून अर्जुन खोतकर हे दिल्लीत आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, रावसाहेब दानवे आणि इतर खासदारांच्या बैठकांना ते उपस्थित आहे. त्यांनी शिंदे गटात येण्यासाठी दबाव आणला जातोय, अशी चर्चा आहे. खोतकर पुढील काही दिवसात जालन्यात पोहोचतील. त्यानंतरच त्यांची भूमिका स्पष्ट करतील.

‘रावसाहेब दानवेंकडेही भरपूर संपत्ती’

जालन्यात शिवसेनेचे अर्जुन खोतकर विरुद्ध भाजपचे रावसाहेब दानवे असे समीकरण आहे. भाजप-शिवसेना युतीच्या काळातही दोघांमधील वाद विकोपाला गेले होते. आता एकनाथ शिंदे गटाच्या बंडामुळे दानवे आणि खोतकरांना पुन्हा एकत्र आणण्याचे प्रयत्न सुरु आहेत. मात्र अर्जुन खोतकरांनी अद्याप दानवेंबद्दल तसेच एकनाथ शिंदे गटात जाण्याबद्दल स्पष्ट भाष्य केलेलं नाही. मात्र माझ्यावर आणि कुटुंबियांवर ताण असल्याचे त्यांनी सांगितले. यावरून भाजपवर टीका करताना शिवसेना आमदार अंबादास दानवे म्हणाले, ‘ अर्जुन खोतकर अजून तरी शिवसेना सोडण्याचा निर्णय घेतला नाही. मात्र ईडीसारखी यंत्रणा भाजपकडून वापरली जात आहे. रावसाहेब दानवे यांनी आपला विरोधक संपवण्यासाठी खोतकरांविरोधात ईडीची चौकशी लावली, रावसाहेब दानवे यांच्याकडे किती संपत्ती आहे हे सगळ्यांना माहिती आहे. ईडीला फक्त अर्जुन खोतकर यांचीच संपत्ती दिसते रावसाहेब दानवे यांची दिसत नाही का, असा सवाल अंबादास दानवे यांनी केला.

‘महापालिकेत शिवसेनेला फरक पडणार नाही’

औरंगाबाद महापालिकेत एकनाथ शिंदे गट आणि भाजपाने एकत्र निवडणुक लढवण्याच्या हालचाली सुरु झाल्या आहेत. यावर बोलताना अंबादास दानवे म्हणाले, ‘ औरंगाबाद महापालिकेसाठी स्वबळावर तयारी सुरू आम्ही सगळ्या जागावर निवडणूक लढवण्याची तयारी करत आहोत, शिंदे गटाने तयारी केली तरी आम्हाला फरक पडणार नाही, असं वक्तव्य अंबादास दानवे यांनी केलं आहे.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.