अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकारचे ‘वरातीमागून घोडे’!

अतिवृष्टीनं नुकसान झाल्यानंतर आता 2 महिन्यांनी केंद्र सरकारचं पथक नुकसानाची पाहणी करण्यासाठी येणार आहे. 20 आणि 21 डिसेंबर रोजी केंद्राचं पथक मराठवाड्यात दाखल होईल.

अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकारचे 'वरातीमागून घोडे'!
Follow us
| Updated on: Dec 16, 2020 | 7:46 AM

औरंगाबाद: अतिवृष्टीमुळं मराठवाड्यातील शेतकऱ्यांचं आतोनात नुकसान झालं. अनेक शेतकऱ्यांचं सोयाबीन वाहून गेलं. ऊस आडवा झाला. कापूस आणि भूईमुगाचंही मोठं नुकसान झालं. काहींची तर जमीन खरडून गेली. अशावेळी शेतकऱ्यांना तातडीच्या मदतीची गरज होती. पण राज्य सरकारनं जाहीर केलेली मदत अद्यापही शेतकऱ्यांच्या हातात पडली नाही. त्यात आता केंद्र सरकार वरातीमागून घोडे नाचवताना पाहायला मिळत आहे. (Center’s team will arrive in Marathwada after 2 months to inspect the damage by heavy rains)

अतिवृष्टीनं नुकसान झाल्यानंतर आता 2 महिन्यांनी केंद्र सरकारचं पथक नुकसानाची पाहणी करण्यासाठी येणार आहे. 20 आणि 21 डिसेंबर रोजी केंद्राचं पथक मराठवाड्यात दाखल होईल. या पथकानं नुकसानाची पाहणी केल्यानंतर मग राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापनाकडून शेतकऱ्यांना मदत मिळणार आहे. केंद्र सरकारचं हे पथक मराठवाड्यातील नुकसानाची दोन दिवस पाहणी करेल. पण अतिवृष्टी आणि झालेल्या नुकसानाला आता 2 महिने उलटून गेले. आता हे पथक काय पाहणी करणार? आणि शेतकऱ्यांना काय मदत मिळणार? असा प्रश्न सर्वसामान्य शेतकऱ्यांना पडला आहे.

राज्य सरकारकडून 10 हजार कोटीचं पॅकेज

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या या दु:खावर फुंकर घालण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी 23 ऑक्टोबर रोजी पत्रकार परिषदेत 10 हजार कोटी रुपयांची मदत जाहीर केली. त्यामध्ये रस्ते, पिकांचं झालेलं नुकसान, वीजेचे पडलेले खांब, खरडून गेलेली जमीन, पडलेली घरं या सर्व बाबींसाठी ही मदत असेल, असं मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलं होतं. पण ही मदत अद्यात शेतकऱ्यांपर्यंत पोहोचली नाही. त्यात दिवाळीसारखा सणही शेतकऱ्यांना मदतीविनात घालवावा लागला.

शेतकऱ्यांना मदत नेमकी कशी?

मुख्यमंत्री ठाकरे यांनी केलेल्या घोषणेनुसार कोरडवाहू आणि बागायती जमिनीसाठी प्रतिहेक्टरी १० हजार रुपयांची मदत दिली जाणार आहे.

ही मदत दोन हेक्टर क्षेत्रापर्यंत मिळणार आहे.

म्हणजे ५ एकर जमीन असलेल्या शेतकऱ्यांना २० हजार रुपयांची मदत मिळेल.

अतिवृष्टीमुळं फळबागांचंही मोठं नुकसान झालं आहे. त्यामुळं फळबागांसाठी प्रति हेक्टरी २५ हजार रुपये मदतीची घोषणा

दोन हेक्टर क्षेत्राच्या मर्यादेत ही मदत मिळणार आहे.

मृत व्यक्तीच्या वारसांना, मयत पशुधनासाठी आणि घर पडझडीसाठीही भरीव मदत देण्याची घोषणा मुख्यमंत्री ठाकरे यांनी केली आहे.

१० हजार कोटी रुपयांच्या पॅकेजचं विभागवार विभाजन

रस्ते आणि पूल – २ हजार ६३५ कोटी

नगरविकास – ३०० कोटी

महावितरण उर्जा – २३९ कोटी

जलसंपदा – १०२ कोटी

ग्रामीण रस्ते आणि पाणीपुरवठा – १ हजार कोटी

शेती आणि घरांसाठी – ५ हजार ५०० कोटी

एकूण – ९ हजार ७७६ कोटी रुपये

संबंधित बातम्या:

ठाकरे सरकारची मोठी घोषणा, अतिवृष्टीग्रस्तांसाठी 10 हजार कोटींचं पॅकेज जाहीर

पश्चिम महाराष्ट्रातील पुरावेळी केंद्राकडून 900 कोटीही आले की नाही शंका, संभाजीराजेंचं भाजपकडे बोट

Center’s team will arrive in Marathwada after 2 months to inspect the damage by heavy rains

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.