औरंगाबादचं नाव लवकरच संभाजीनगर, चंद्रकांत खैरेंची माहिती

औरंगाबादचं नाव संभाजीनगर करण्याची कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झाली आहे, असं शिवसेनेचे माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी सांगितलं

औरंगाबादचं नाव लवकरच संभाजीनगर, चंद्रकांत खैरेंची माहिती
Follow us
| Updated on: Feb 14, 2020 | 3:28 PM

औरंगाबाद : औरंगाबादचं नाव संभाजीनगर करण्याची मागणी लवकरच पूर्ण होणार आहे. कित्येक दशकांपासून प्रलंबित असलेलं औरंगाबादचं नामांतर अखेर प्रत्यक्षात (Aurangabad to be Renamed as Sambhajinagar) येणार आहे. शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी यासंदर्भात माहिती दिली.

औरंगाबादचं नाव संभाजीनगर करण्याची कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झाली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सर्व कागदपत्रं मागवून घेतली आहेत. औरंगाबादच्या जनतेला थोड्याच दिवसात सुखद धक्का देणार असल्याचं चंद्रकांत खैरे यांनी सांगितलं.

‘लोकसभा, विधानसभेत आम्ही ‘संभाजीनगर’ असाच उल्लेख करतो. अटल बिहारी वाजपेयींपासून पंतप्रधान नरेंद्र मोदींपर्यत सगळ्यांकडे ही मागणी मी लावून धरली होती. विधानसभेतही प्रश्न मांडले होते. चार वेळा तत्कालीन मुख्यमंत्र्यांकडे प्रश्न उपस्थित केले’ असं खैरेंनी ‘टीव्ही9’ला सांगितलं.

संभाजीनगरच्या मुद्द्यावर महापालिका निवडणूक जिंकू शकतो, असं वाटल्यामुळे मनसेने ही भूमिका उचलून धरली. परंतु सर्वांना माहित आहे, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी ‘संभाजीनगर’ नाव ठेवलं होतं. त्यामुळे त्याचं क्रेडीट कोणीही घेऊ नये, असंही चंद्रकांत खैरे यांनी सुनावलं

मुख्यमंत्री झाल्यावर लगेच उद्धव ठाकरे यांनी संभाजीनगर नामकरणाच्या प्रक्रियेला सुरुवात केली. दोन महिन्यांपासून कायदेशीर बाबी सुरु आहेत. लवकरच तुम्हाला औरंगाबादचं नामांतर झाल्याचं समजेल. हे शहर शिवसेनेचं आहे. 1990 मध्ये मी पहिला हिंदू आमदार झालो, तेव्हापासून एकदाही दंगल होऊ दिली नाही, असंही खैरे म्हणाले.

मनसेची उडी

‘औरंगाबाद शहराचं नाव बदलण्यासाठी मनसे सर्वतोपरी प्रयत्न करणार आहे. आमदार राजू पाटील विधानसभेत तसा प्रस्ताव मांडतील’, अशी माहिती मनसे नेते अभिजीत पानसे यांनी दिली होती. हिंदूत्ववादी भूमिकेकडे झुकलेल्या मनसेने शिवसेनेची भूमिकाही हायजॅक करण्याच्या हालचाली सुरु केल्याचं दिसत आहे.

औरंगाबाद शहराचं नाव संभाजीनगर करावं, ही मागणी शिवसेनेने जवळपास 30 वर्षांपासून उचलून धरली आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी नामांतराचं स्वप्न पाहिलं होतं. आता भाजपनेही या मागणीवर जोर दिला आहे.

मनसेनेही आता औरंगाबाद महापालिका निवडणुकांमध्ये उतरण्याचं ठरवलं आहे. 50 हून अधिक जागा लढवण्याच्या तयारीत असलेली मनसे संभाजीनगरचा मुद्दा (Aurangabad to be Renamed as Sambhajinagar) उचलून धरण्याची चिन्हं आहेत.

तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल
तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल.
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती.
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे.
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस.
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार.
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू.
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी.
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.