VIDEO | मांस विक्रीवरुन राडा, औरंगाबादेत दोन गटात तुंबळ हाणामारी
मार्केटमध्ये मांस विकण्याच्या कारणावरुन दोन गटांमध्ये राडा झाल्याची माहिती आहे (Aurangabad two group fight video viral)
औरंगाबाद : मांस विक्रीच्या कारणावरुन दोन गटात तुंबळ हाणामारी झाल्याची घटना समोर आली आहे. औरंगाबाद जिल्ह्यातील अडुळ गावात ही घटना घडली. या घटनेचा व्हिडीओ समोर आला आहे. (Aurangabad two group fight video viral)
मार्केटमध्ये मांस विकण्याच्या कारणावरुन दोन गटांमध्ये राडा झाल्याची माहिती आहे. शेख आणि कुरेशी गटात राडा झाल्याची माहिती आहे. या प्रकरणी दोन्ही गटांनी परस्परविरोधी तक्रारी पोलिसात दाखल केल्या आहेत.
पाहा व्हिडीओ :
नांदेड जिल्ह्यात लोहा तालुक्यातील शिवणी जामगा गावात दोन गटात हाणामारी झाली होती. या हाणामारीत एक तरुण गंभीर जखमी झाला. या हाणामारीचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला. या घटनेमुळे शिवणी जामगा शिवारात काहीसा तणाव निर्माण झाला होता. जातीय वादातून ही घटना घडल्याचा आरोप एका गटाने केला होता.
नाशिकमध्ये शिवजयंतीला दगडफेक
नाशकात पोलिसांवर दगडफेक करणाऱ्या आरोपींची काही दिवसांपूर्वी धिंड काढण्यात आली होती. नाशिकमधील देवळाली परिसरात धिंड काढण्यात आली होती. देवळाली परिसरात शिवजयंतीच्या रात्री दगडफेक करण्यात आली होती. या घटनेत दोन पोलिस कर्मचारी जखमी झाले होते. या प्रकरणी दोन आरोपींना अटक करण्यात आली.
शिवजयंतीला दगडफेक
छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती निमित्ताने देवळाली पोलिस हद्दीत कर्तव्यावर असताना संसरी येथील चारणवाडी येथील एका इसमाबरोबर भांडण होऊन ते पोलिस ठाण्यात तक्रार देण्यासाठी आले, यावेळी चारणवाडी येथील सोनू जाधव हातात दगड घेऊन आला आणि अमोल जाधवला म्हणाला की पोलीस नाईक आहेर यांच्या डोक्यात दगड घाल, अशी फिर्याद पोलीस नाईक पंढरीनाथ आहेर यांनी दिली होती.
संबंधित बातम्या :
शिवजयंतीला पोलिसांवर दगडफेक करणाऱ्या आरोपींची नाशकात धिंड
VIDEO | नांदेडमध्ये दोन गटात हाणामारी, तरुण गंभीर जखमी
(Aurangabad two group fight video viral)