Aurangabad | बंडखोराचं औरंगाबादेत इनकमिंग सुरू, वैजापुरात रमेश बोरनारेंचं तगडं शक्तिप्रदर्शन, भूमरेही पैठणमध्ये!

वैजापुरात आज शेकडो शिवसेना कार्यकर्ते रस्त्यावर उतरले होते. एकनाथ शिंदेंच्या नावाने त्यांनी घोषणाबाजी केली. यावेळी आमदार रमेश बोरनारे यांनी सर्व समर्थकांनी केलेले स्वागत स्वीकारले.

Aurangabad | बंडखोराचं औरंगाबादेत इनकमिंग सुरू, वैजापुरात रमेश बोरनारेंचं तगडं शक्तिप्रदर्शन, भूमरेही पैठणमध्ये!
Follow us
| Updated on: Jul 05, 2022 | 5:07 PM

औरंगाबादः एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यासोबत बंड पुकारलेल्या औरंगाबादमधील आमदार आता स्वगृही परतू लागलेत. आज सुरुवातीला वैजापूरचे आमदार रमेश बोरनारे (Ramesh Bornare) हे मतदार संघात पोहोचले. रमेश बोरनारे यांच्या स्वागतासाठी वैजापूरात (Vaijapur) शिवसेना कार्यकर्त्यांनी मोठी तयारी केली. वैजापूरात त्यांची मोठी विजयी रॅली काढण्यात आली. शिवसेनाच नव्हे तर भाजपच्या कार्यकर्त्यांनी वैजापुरातील या रॅलीत सहभाग नोंदवला. एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात महराष्ट्रात शिवसेना-भाजप युतीचे सरकार स्थापन झाल्याबद्दल कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. तर पैठणमध्ये आमदार संदिपान भूमरे यांच्या स्वागतासाठीही शिवसेना कार्यकर्त्यांनी मोठी तयारी केली.

15 दिवसानंतर औरंगाबादेत

विधानपरिषद निवडणुकीच्या निकालानंतर एकनाथ शिंदेंसोबत गेलेल्या आमदारांचे फोन नॉट रिचेबल होते. त्यानंतर काही दोनच दिवसात औरंगाबादेतून या बंडात पाच आमदार सहभागी झाल्याचे उघड झाले. यात संजय शिरसाट, अब्दुल सत्तार, संदिपान भूमरे, रमेश बोरनारे आणि प्रदीप जैस्वाल यांचा सहभाग होता. शिवसेना पक्षप्रमुख यांना महाविकास आघाडी तोडण्याची विनंती बंडखोर आमदारांनी केली. तसेच भाजपाशी युती करण्याची मागणी केली. मात्र उद्धव ठाकरेंनी ही विनंती न ऐकल्यामुळे बंडखोर आमदारांनी शिवसेनेचाच दुसरा गट स्थापन करत भाजपसोबत हातमिळवणी करत सरकार स्थापन केले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची काल विधानसभेत बहुमत चाचणी झाली. शिंदे यांनी विश्वासमत जिंकल्यानंतर आता राज्यभरातील आमदार आता स्वगृही परतत आहेत. आमदार रमेश बोरनारे यांचंही वैजापुरात जंगी स्वागत झालं. यावेळी बोरनारेंनी मोठं शक्ती प्रदर्शन केलं.

राऊतांनी बाप काढयला नको होता..

वैजापुरात आज शेकडो शिवसेना कार्यकर्ते रस्त्यावर उतरले होते. एकनाथ शिंदेंच्या नावाने त्यांनी घोषणाबाजी केली. यावेळी आमदार रमेश बोरनारे यांनी सर्व समर्थकांनी केलेले स्वागत स्वीकारले. माध्यमांना प्रतिक्रिया देताना मात्र त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. ते म्हणाले, ‘ उद्धव साहेब राजीनामा देत होते तेंव्हा माझ्या डोळ्यात पाणी येत होते. पण आमचा नाईलाज होता. संजय राऊतांनी आमचा बाप काढायला नको होता. राऊतांनी असे शब्द वापरल्यानंतर त्याचे परिणाम होणारच ना.. आमचा बाप काढल्यावर उठाव होणार नाही का ? आम्ही राऊतांना राज्यसभेला मतदान केले मात्र त्यांनी साधे आभारही मानले नाही, अशी टीका रमेश बोरनारे यांनी केली.

पैठणमध्ये संदिपान भूमरेचं आगमन

दरम्यान, संध्याकाळी पाच वाजेच्या सुमारास पैठणचे आमदार संदिपान भूमरे यांच्याही स्वागताची जंगी तयारी करण्यात आली. संदिपान भूमरेही काही वेळातच पैठणमध्ये दाखल होत आहेत.

बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.
मंत्रिमंडळात 39 पैकी 20 नव्या चेहऱ्यांना संधी, बघा कोणाची लागली वर्णी?
मंत्रिमंडळात 39 पैकी 20 नव्या चेहऱ्यांना संधी, बघा कोणाची लागली वर्णी?.
प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन
प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन.
महायुतीचा अखेर मंत्रिमंडळ विस्तार, कोणत्या जिल्ह्यात किती मंत्री?
महायुतीचा अखेर मंत्रिमंडळ विस्तार, कोणत्या जिल्ह्यात किती मंत्री?.
अजित दादांनी आपल्याच मंत्र्यांचे टोचले कान, '... अन्यथा वेगळा निर्णय'
अजित दादांनी आपल्याच मंत्र्यांचे टोचले कान, '... अन्यथा वेगळा निर्णय'.
प्रचंड बहुमतानंतर बहुप्रतिक्षेत मंत्रिमंडळाचा विस्तार, कोणाची वर्णी?
प्रचंड बहुमतानंतर बहुप्रतिक्षेत मंत्रिमंडळाचा विस्तार, कोणाची वर्णी?.