Aurangabad Lockdown | औरंगाबादेत कडकडीत बंद, काय सुरु, काय बंद?

औरंगाबादमध्ये शनिवार आणि रविवार असे दोन दिवस लॉकडाऊन असणार आहे. (Aurangabad Lockdown)

Aurangabad Lockdown | औरंगाबादेत कडकडीत बंद, काय सुरु, काय बंद?
Aurangabad lockdown
Follow us
| Updated on: Mar 13, 2021 | 10:16 AM

औरंगाबाद : औरंगाबादेत आजपासून दोन दिवस कडक लॉकडाऊन करण्यात आला. वाढत्या कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे. यानुसार आज आणि उद्या दोन दिवस कडक लॉकडाऊन करण्यात आला आहे. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासनाने कठोर पाऊल उचलले आहे. (Aurangabad Weekend Lockdown Update)

औरंगाबादेत विकेंड लॉकडाऊन

औरंगाबादेत कोरोना रुग्णांच्या संख्या सातत्याने वाढ होत आहे. त्यामुळे औरंगाबादेत विकेंड लॉकडाऊन लावण्यात आला आहे. औरंगाबादमध्ये शनिवार आणि रविवार असे दोन दिवस लॉकडाऊन असणार आहे. या काळात जीवनावश्यक वस्तूंची दुकाने आणि एमआयडीसी वगळता सर्व बंद राहणार आहे. विशेष म्हणजे या लॉकडाऊनच्या अंमलबजावणीसाठी शहरात शेकडो पोलीस तैनात करण्यात येणार आहेत. शहरातील कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासनाने हे कठोर पाऊल उचलले आहे. गर्दी होणारे सर्व कार्यक्रम आणि शाळा बंद ठेवण्यात येणार आहेत.

औरंगाबादमधील पर्यटनस्थळं बंद 

त्याशिवाय गेल्या 11 मार्चपासून औरंगाबादमध्ये अंशत लॉकडाऊन करण्यात आला आहे. औरंगाबाद शहराचा संपूर्ण जगात एक पर्यटन शहर म्हणून नावलौकिक आहे. या ठिकाणी देशविदेशातून आलेले अनेक पर्यटक भेट द्यायचे. पण कोरोनामुळे पर्यटकांची संख्या घटली आहे. औरंगाबादचे जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी जिल्ह्यातील सर्व पर्यटनस्थळे बंद ठेवण्याचा आदेश दिला आहे. वेरुळ-अजिंठा लेणीसह औरंगाबाद जिल्ह्यातील सर्व पर्यटन स्थळं 4 एप्रिलपर्यंत बंद राहणार आहे.

औरंगाबादमधील कोरोनाची स्थिती

औरंगाबाद शहरात 92 कोरोना रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे नाशिक शहरातील कोरोना रुग्णांची संख्या ही 16 हजार 694 इतकी झाली आहे. त्याशिवाय औरंगाबाद महापालिका परिसरात 609 कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे औरंगाबादमध्ये 41 हजार 061 कोरोना रुग्ण आहे. दरम्यान औरंगाबादमध्ये आतापर्यंत 1286 रुग्णांचा मृत्यू आहे. तर सद्यस्थितीत 5569 अॅक्टिव्ह रुग्ण आहे.

औरंगाबाद शहराची कोरोना रुग्णांची स्थिती बिघडली आहे. औरंगाबादमध्ये दरदिवशी 300 ते 350 कोरोना रुग्ण आढळत आहे. औरंगाबाद शहरात कोरोना रुग्णांचा आकडा हा दिवसेंदिवस वाढत आहे. दरम्यान कोरोनाचा हाच संसर्गाचा दर कायम राहिला तर येत्या काही दिवसांमध्ये औरंगाबाद शहरामध्ये रुग्णांसाठी बेड सुद्धा उपलब्ध होऊ शकणार नाहीत. त्यामुळे प्रशासनाने लॉकडाऊन लावायला सुरुवात केली आहे.

औरंगाबाद जिल्हाधिकारी अ‍ॅक्शन मोडमध्ये, रस्त्यावर उतरून कारवाई 

औरंगाबादमधील कोरोना रोखण्यासाठी जिल्हाधिकारी सुनील चव्हाण हे रस्त्यावर उतरले आहेत. औरंगाबादच्या जिल्हाधिकाऱ्यांनी अनेक गर्दीच्या ठिकाणी भेट दिली आहे. मास्क न वापरणाऱ्यांवर कारवाई केली जात आहे. तसेच कोरोनाचे नियम न पाळणाऱ्या दुकानदारांवर दंडात्मक कारवाई सुरु आहे. जिल्हाधिकारीच स्वत:च रस्त्यावर उतरून कारवाई करत असल्याने बाजारपेठेत खळबळ उडाली आहे. (Aurangabad Weekend Lockdown Update)

औरंगाबादमध्ये काय बंद?

?औरंगाबाद जिल्ह्यातील सर्व शाळा, महाविद्यालये, विद्यापीठ, शिकवणी वर्ग, प्रशिक्षण संस्था (कौशल्य विकास प्रशिक्षण संस्था) व इतर तत्सम संस्था बंद राहतील. ?सर्व प्रकारच्या धार्मिक सभा, राजकीय सभा, राजकीय व सांस्कृतिक कार्यक्रम, रॅली, मिरवणुका, आंदोलने, मोर्चे, धरणे, सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रम यावर प्रतिबंध ?आठवडी बाजार, जलतरण तलाव (Swimming Pool), क्रीडा स्पर्धा बंद राहतील. ?सर्व प्रकारची सभागृहे, मंगल कार्यालये, लॉन्स पूर्णपणे बंद राहतील. ?कोणत्याही सार्वजनिक विवाह समारंभास परवानगी असणार नाही. ?औरंगाबाद शहरातील जाधवमंडी 11 मार्च ते 17 मार्चपर्यंत पूर्णपणे बंद राहील.

औरंगाबादमध्ये काय सुरु?

1) वैद्यकीय सेवा दुकाने व बाजारपेठा, D-Mart/ Reliance/Big Bazar/More इ. 2) वृत्तपत्र, मिडीया संदर्भातील सेवा मॉल्स, चित्रपटगृहे / नाट्यगृहे 3) दूध व्रिक्री व पुरवठा इ. हॉटेल, रेस्टॉरंट (प्रत्यक्ष डायनिंग सुविधा बंद राहील, मात्र होम डिलिव्ही व त्यासाठी स्वयंपाकगृहे/ किचन रात्री 11.00 वाजेपर्यंत सुरू ठेवण्याची मुभा राहील.) 4) भाजीपाला विक्री व पुरवठा सर्व खाजगी कार्यालये/ आस्थापना 5) फळे विक्री व पुरवठा 6) जीवनावश्यक वस्तुंची दुकाने 7) पेट्रोल पंप, गॅस एजन्सी 8) सर्व प्रकारच्या वाहतूक सेवा (खाजगी व शासकीय), रिक्षासह इ. 9) बांधकामे 10) उद्योग व कारखाने 11) किराणा दुकाने (फक्त Stand Alone स्वरुपातील) 12) चिकन, मटन, अंडी व मांस व मच्छी दुकाने 13) वाहन दुरुस्ती दुकाने / वर्कशॉप 14) पशुखाद्य दुकाने 15) बँक व पोस्ट सेवा संदर्भात त्यांचे नियमानुसार सेवा सुरू ठेवण्यास मुभा राहिल. 16) नोंदणीकृत पद्धतीने विवाहास परवानगी असेल.

(Aurangabad Weekend Lockdown Update)

संबंधित बातम्या : 
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.