Electric Vehicles | औरंगाबादेत मार्च अखेरीस 250 इलेक्ट्रिक कार, हजारांपेक्षा जास्त दुचाकी, चार्जिंगचे नियोजन काय?

इलेक्ट्रिक वाहने चार्ज करण्यासाठी शहरात पुरेशी सुविधा आहे का, हेही तपासावे लागेल. अर्थात महावितरणणे ईव्ही चार्जिंग स्टेशन्स उभारण्यासाठी सवलतीच्या दरात वीज जोडणी देऊ केली आहे. अशी चार्जिंग स्टेशन्स उभारण्यासाठी महावितरणतर्फे प्रोत्साहनही दिले जात आहे.

Electric Vehicles | औरंगाबादेत मार्च अखेरीस 250 इलेक्ट्रिक कार, हजारांपेक्षा जास्त दुचाकी, चार्जिंगचे नियोजन काय?
Pic Source - Google
Follow us
| Updated on: Feb 08, 2022 | 3:00 AM

औरंगाबादः औरंगाबाद शहर आणि मराठवाडा विभागात ईव्ही इकोसिस्टिमला (Eco System) प्रोत्साहन देण्यासाठी मराठवाडा ऑटो क्लस्टरने  औरंगाबादच्या पाठिंब्याने औरंगाबाद मिशन ग्रीन मोबिलिटी अभियानाची सुरुवात केली आहे. या अंतर्गत उद्योजकांच्या पुढाकारातून मार्च अखेरपर्यंत 250 इलेक्ट्रिक कार (Electric car) आणि एक हजारांहून अधिक दुचाकी आणि तीनचाकींची मार्च अखेरपर्यंत एकत्रित खरेदी करण्याचे नियोजन आहे. त्यामुळे येत्या दोन महिन्यात शहरातील इलेक्ट्रिक वाहनांची संख्या वाढून गेल्याचे चित्र दिसेल. मात्र ही वाहने चार्ज करण्यासाठी शहरात पुरेशी सुविधा (E Charging stations) आहे का, हेही तपासावे लागेल. अर्थात महावितरणणे ईव्ही चार्जिंग स्टेशन्स उभारण्यासाठी सवलतीच्या दरात वीज जोडणी देऊ केली आहे. अशी चार्जिंग स्टेशन्स उभारण्यासाठी महावितरणतर्फे प्रोत्साहनही दिले जात आहे.

शहरात कुठे कुठे चार्जिंगची सोय?

इलेक्ट्रिक व्हेइकल चार्ज कऱण्यासाठी शहरात स्मार्ट सिटीचे 8 स्टेशन उभारण्याचे नियोजन आहे. त्यापैकी – एक स्मार्ट सिटी कार्यालयात 26 जानेवारी रोजी सुरुही झाले. तेथे वेगवान आणि मंदगती असे दोन चार्जर आहेत. – लवकरच मनपाच्या आवारात, मनपाच्या पेट्रोल पंपावरही ही सुविधा उपलब्ध होईल. – वाळूजमध्ये मराठवाडा ऑटो क्लस्टरच्या आवारातदेखील चार्जिंग स्टेशन उभारले जाणार आहे. – शहरात 20 स्टेशन उभारण्यासाठी उद्योजक संघटना पुढाकार घेणार आहेत.

चार्जिंग स्टेशन उभारण्याची योजना काय?

शहरात किंवा संपूर्ण मराठवाड्यात चार्जिंग स्टेशन उभारण्यासाठी महावितरण तर्फे सवलतीच्या देण्यात येत आहे. यातून लोकांना रोजगार मिळेल, अशी योजना आहे. लघुदाब जोडणीसाठी 4.12 रुपये प्रतियुनिट तर उच्चदाब जोडणीसाठी 4.94 रुपये प्रतियुनिट असे दर असतील. फास्ट चार्जिंग स्टेशन उभारण्यासाठी 15 लाख तर स्लो चार्जिंग स्टेशन उभारण्यासाठी 1 ते सव्वा लाखांपर्यंत खर्च येऊ शकतो. या स्टेशनसाठी 150 ते 200 चौरस फूट जागा लागते. महावितरणकडून तांत्रिक बाबी पूर्ण केल्यानंतर हे स्टेशन सुरु करता येते.

चार्जिंगसाठी किती वेळ, किती खर्च?

– एक कार फास्ट चार्जिंग करण्यासाठी 40 ते 60 मिनिटे तर स्लो चार्जिंगसाठी 6 तासांपर्यंत वेळ लागू शकतो. – मुंबईत चार्जिंगसाठी 15 रुपये प्रति युनिट तर दिल्लीत 5 रुपये प्रति युनिट असे दर लागतात. – एक कार पूर्ण चार्जिंगसाठी 20 ते 30 युनिट लागतात. त्यानुसार दिल्लीत 150 तर मुंबईत 300 ते 400 रुपये खर्च येतो. – इलेक्ट्रिक स्कूटर चार्ज करण्यासाठी 3 युनिट वीज लागते. त्यासाठी 50 रुपयांपर्यंत खर्च येऊ शकतो.

इतर बातम्या-

धनुष्यबाण हाताच्या नादी लागल्यापासून..,Jayant Patil यांच्या ‘त्या’ वक्तव्याने सभागृहात एकच हशा

थुकणं आणि फुंकर घालणं यातील फरक नेमका काय ? | Shah Rukh Khan

लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, राज-उद्धव ठाकरेंमध्ये काय संवाद?
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, राज-उद्धव ठाकरेंमध्ये काय संवाद?.
खातेवाटपानंतर 'मीच होणार पालकमंत्री', ठाणे, पुण्याचं पालकत्व कोणाकडे?
खातेवाटपानंतर 'मीच होणार पालकमंत्री', ठाणे, पुण्याचं पालकत्व कोणाकडे?.
मराठी कुटुंबाला मारहाण, चिमुकलीसोबत अश्लील चाळे, विचारणा केली तर...
मराठी कुटुंबाला मारहाण, चिमुकलीसोबत अश्लील चाळे, विचारणा केली तर....
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?.
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्...
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्....
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?.
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र.
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला.