हातात मशाल घेऊन ठाकरे यांचा निष्ठावंत कार्यकर्ता अनवाणी सभास्थळी पोहचला; ६० किमीचा अनवाणी प्रवास करणारा हा कोण?
ती व्यक्ती ६० किलोमीटर पायी चालत आली. त्यामागे त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर असलेलं प्रेम असल्याचं सांगितलं. त्यामुळे हा व्यक्ती या सभेचं विशेष आकर्षण ठरतोय.
छत्रपती संभाजीनगर : येथे महाविकास आघाडीच्या नेत्यांची वज्रमूठ ही सभा होत आहे. या सभेला तिन्ही पक्षांचे महत्वाचे नेते हजेरी लावत आहेत. त्यामुळे या सभेला लाखो कार्यकर्ते येणार असल्याचा दावा महाविकास आघाडीच्या नेत्यांनी केलाय. या सभेला एका सामान्य व्यक्तीनं हजेरी लावली. ती व्यक्ती ६० किलोमीटर पायी चालत आली. त्यामागे त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर असलेलं प्रेम असल्याचं सांगितलं. त्यामुळे हा व्यक्ती या सभेचं विशेष आकर्षण ठरतोय.
हातात झेंडा आणि मशाल
जालना जिल्ह्यातील बदलापूर तालुक्यातून उद्धव ठाकरे यांच्या सभेसाठी एक सर्वसामान्य व्यक्ती आला. त्यांच्या पायात चपलासुद्धा नाहीत. त्याच्या हातात झेंडा आणि मशाल चिन्ह आहे. अंकूश कुंडलिग पवार असं या कार्यकर्त्याचं नाव आहे.तो पांगरी येथीर रहिवासी आहे. उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत वज्रमूठ सभा होत आहे. या सभेसाठी हा कार्यकर्ता गावातून पायी चालत आला आहे. विशेष म्हणजे त्यांच्या पायात चप्पलसुद्धा नाही.
गद्दारी करणारे चोर
रक्ताचा एक एक थेंब उद्धव साहेबांसाठी अर्पण आहे. त्यासाठी मी करत असल्याचं अंकूश पवार म्हणाले. ठाकरे यांच्यासोबत गद्दारी करणारे हे चोर आहे. चोर लोकं सुधरू शकत नाही. त्यांचं काय करायचं ते उद्धव ठाकरे आणि चंद्रकांत खैरे साहेब बघतील.
मालेगावच्या सभेलाही लावली होती हजेरी
उद्धव ठाकरे यांची सभा असली म्हणजे अंकूश हे चालत जातात. मालेगाव येथील ठाकरे यांच्या सभेलासुद्धा ते चालत गेले होते. चंद्रकांत खैरे हे पुन्हा एकदा खासदार होतील, अशी अपेक्षा या कार्यकर्त्यानं व्यक्त केली.
हे आहे महाविकास आघाडीवरील प्रेम
चंद्रकांत खैरे म्हणाले, हा कार्यकर्ता पायी येतो कारण त्याचं शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यावर प्रेम आहे. उद्धव ठाकरे यांच्यावरील तसेच महाविकास आघाडीवरील प्रेम आहे. या व्यक्तीसमोर मी नतमस्तक होतो. खोकेवाले फक्त कंत्राटासाठी गेले आहेत. निवडणुकीत लोकं त्यांना साफ करणार आहेत.