केंद्रीय एजन्सी या भाजपच्या प्रचार यंत्रणा, महाराष्ट्र झुकणार नाही, थांबणार नाही- आदित्य ठाकरेंचा पलटवार!

आज पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय आणि युवासेनेचे पदाधिकारी राहुल कनाल (Rahul Kanal) यांच्या घरी आयकर विभागाच्या पथकाने छापा मारला. या विषयावर आदित्य ठाकरे यांची प्रतिक्रिया पत्रकारांनी जाणून घेतली. तेव्हा त्यांनी केंद्र सरकारला खडे बोल सुनावले.

केंद्रीय एजन्सी या भाजपच्या प्रचार यंत्रणा, महाराष्ट्र झुकणार नाही, थांबणार नाही- आदित्य ठाकरेंचा पलटवार!
आदित्य ठाकरेंचा केंद्र सरकारवर पलटवार
Follow us
| Updated on: Mar 08, 2022 | 12:00 PM

मुंबईः केंद्रीय तपास यंत्रणांच्या (Central Investigative Agencies) एकामागून एक धाडी हे महाराष्ट्रावरचं दिल्लीचं आक्रमण आहे. पण महाराष्ट्र अशा कारवायांसमोर झुकणार नाही, थांबणार नाही, असा पलटवार शिवसेना नेते आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी केलं. मुंबईत पत्रकारांशी बोलताना त्यांनी हे विधान केलं. महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप विरुद्ध शिवसेना वातावरण चांगलंच तापलं आहे. परस्परांवर आरोप प्रत्यारोप, अटकसत्र, धाडसत्र सुरु आहेत. याच मालिकेत आज पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय आणि युवासेनेचे पदाधिकारी राहुल कनाल (Rahul Kanal) यांच्या घरी आयकर विभागाच्या पथकाने छापा मारला. या विषयावर आदित्य ठाकरे यांची प्रतिक्रिया पत्रकारांनी जाणून घेतली. तेव्हा त्यांनी केंद्र सरकारला खडे बोल सुनावले.

काय म्हणाले आदित्य ठाकरे?

युवासेनेचे राहुल कनाल यांच्यावर आयकर विभागाने धाड टाकली. यावर प्रतिक्रिया देताना आदित्य ठाकरे म्हणाले, ‘ महाराष्ट्रावर आधीही आक्रमक आहे. हे दिल्लीच आक्रमण. जेव्हापासून इथे निवडणूक लागेल आणि महाविकास आघाडीची भीती वाटू लागलीय, तेव्हापासून हे सुरु आहे. हे यूपी, हैदराबाद, बंगालमध्ये केलेलं. आता महाराष्ट्रात सुरु आहे. सगळ्या सेंट्रल एजन्सीज या भाजपच्या प्रचार यंत्रणा झाल्या आहेत. महाराष्ट्र झुकणार नाही आणि महाराष्ट्र थांबणारही नाही, असा पलटवार आदित्य ठाकरे यांनी केला.

राहुल कनाल यांच्यावरील छाप्याची चर्चा

आज आयकर विभागाच्या पथकाने सकाळीच राहुल कनाल यांच्या घरी छापा मारला. त्यांच्या वांद्रे येथील भाभा हॉस्पिटलच्या गल्लीतील नाइन अल्ेमडा इमारतीतील कनाल यांच्या घरी ही झाडाझडती सुरु झाली. त्यामुळे आज मुंबईत या धाडसत्राबद्दल जोरदार चर्चा सुरु आहे. राहुल कनाल हे उद्योजक असून युवासेनेचे सक्रिय पदाधिकारी आहेत. तसेच आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय मानले जातात. कनाल हे मुंबई महापालिकेत स्वीकृत सदस्य असून प्रसिद्ध निर्माते आणि ड्रग्ज प्रकरणात नाव आलेल्या इम्तियाज खत्री यांच्याशी त्यांचे संबंध असल्याचे सांगितले जात आहे.

इतर बातम्या-

नागपूरच्या तरुणांचा अमरावतीत फिल्मी थरार! डोक्यावर बंदूक ठेवून हवेत गोळीबार, कशासाठी तर…

Women’s Day | त्याच्याएवढंच काम करताय, पण पगार बरोबरीचा नाही? कुठे करणार तक्रार? समान वेतन कायदा काय?

सोबतच्या महिलांना Happy Women’s Day म्हणताय? जरा थांबा, त्यांना नेमकं काय हवंय, तेही जाणून घ्या!

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.