VIDEO: औरंगाबादेत विधानसभेवर एकही निवडून येत नाही, ही मोठी खंत, Ajit Pawar यांनी मराठवाड्यासाठी टार्गेटच ठरवलं!

आपल्याला परभणी, औरंगाबाद यासारख्या जिल्ह्यात जास्त लक्ष द्यावे लागणार आहे. तसेच भविष्यात बेरजेचे राजकारणही करावे लागणार आहे. इतर पक्षांतील लोक राष्ट्रवादीत येऊ पाहतात, त्याची चर्चा सुरु आहे. त्यानुसार, ते प्रवेश होती, असेही अजित पवार म्हणाले.

VIDEO: औरंगाबादेत विधानसभेवर एकही निवडून येत नाही, ही मोठी खंत, Ajit Pawar यांनी मराठवाड्यासाठी टार्गेटच ठरवलं!
उपमुख्यमंत्री अजित पवार
Follow us
| Updated on: Feb 10, 2022 | 4:45 PM

मुंबईः औरंगाबाद ही मराठवाड्याची राजधानी आहे. येथील विधानसभेच्या 9 जागांपैकी राष्ट्रवादी काँग्रेसचा (National Congress Party) एकही आमदार निवडून आला नाही. पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघातून राष्ट्रवादीचा आमदार निवडून येतो, पण विधानसभेला एकदी आमदार निवडून येत नाही, ही विचार करण्यासारखी गोष्टी आहे. मराठवाड्यासाठी माझ्या मनातली ही सर्वात मोठी खंत असल्याचे वक्तव्य राज्याचे उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी व्यक्त केली. मुंबई येथील कार्यक्रमात ते बोलत होते. मुंबईत औरंगाबाद जिल्ह्यातील काँग्रेसचे नेते संजय जाधव (Sanjay Jadhav) आणि इतर पाच नेत्यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश झाला. या वेळी आयोजित कार्यक्रमात अजित पवार बोलत होते.

संजय जाधवांसह 5 नगरसेवक राष्ट्रवादीत!

औरंगाबाद जिल्ह्यातील गंगापूरचे काँग्रेसचे माजी नगराध्यक्ष संजय जाधव आणि पक्षाच्या पाच नगरसेवकांसह बाजार समितीचे माजी संचालक यांनी गुरुवारी मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांचे पक्षात स्वागत केले. त्यावेळी बोलताना अजित पवार म्हणाले, आमदार सतीश चव्हाण यांनी गंगापूरचे माजी नगराध्यक्ष संजय जाधव यांच्या प्रवेशाबाबत मला निरोप दिला होता. तेव्हा जाधव यांच्या पक्षप्रवेशावेळी मी हजर राहीन असा शब्द दिला होता. त्यानुसार आज मी तुमच्यासमोर उपस्थित आहे.’

संजय जाधवांवर कोणती जबाबदारी?

अजित पवार यांनी यावेळी बोलताना, संजय जाधव यांच्यावर आता औरंगाबादमधील राष्ट्रवादीचे संघटन वाढवण्याची मोठी जबाबदारी असल्याचे सांगितले. त्यांच्या नेतृत्वाखाली गंगापूर-खुलताबादचा विकास होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये राष्ट्रवादीला प्रथम स्थानावर आणायचे आहे. त्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

मराठवाड्यासाठी कोण-कोणते टार्गेट?

मुंबई येथील कार्यक्रमात बोलताना अजित पवार यांनी मराठवाड्याची राजधानी असलेल्या औरंगाबादसह इतर जिल्ह्यांमध्ये राष्ट्रवादीसमोर कोण-कोणते टार्गेट आहेत, याची यादीच वाचून दाखवली. ते म्हणाले, ‘आगामी जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुका आपल्यासाठी महत्त्वाच्या आहेत. आपल्याला परभणी, औरंगाबाद यासारख्या जिल्ह्यात जास्त लक्ष द्यावे लागणार आहे. तसेच भविष्यात बेरजेचे राजकारणही करावे लागणार आहे. इतर पक्षांतील लोक राष्ट्रवादीत येऊ पाहतात, त्याची चर्चा सुरु आहे. त्यानुसार, ते प्रवेश होती, असेही अजित पवार म्हणाले.

इतर बातम्या-

मग मी त्यात बोट घातलं होतं का? नितेश राणेंनी स्वत:च्या आरोग्याची कुंडलीच मांडली, आजार राजकीय?

Video : अजित पवारांना पुन्हा आठवण आली आबांची, कार्यकर्त्यांना का म्हणाले हलक्या कानाचे राहू नका?

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.