Akbaruddin Owaisi : अकरबरुद्दीन ओवैसी औरंगाबाद दौऱ्यावर येणार, ‘आ रहा हूं मै’ इम्तियाज जलील यांची फेसबुक पोस्ट चर्चेत

शैक्षणिक संकुलाचे उद्घाटन ते करणार असल्याचीही फेसबुक पोस्ट करत इम्तियाज जलील यांनी माहिती दिली आहे. त्यांनी 'आ रहा हूं मै' या टायटल खाली फेसबुक पोस्ट केली. त्यामुळे अकबरुद्दीन ओवै

Akbaruddin Owaisi : अकरबरुद्दीन ओवैसी औरंगाबाद दौऱ्यावर येणार, 'आ रहा हूं मै' इम्तियाज जलील यांची फेसबुक पोस्ट चर्चेत
अकरबरुद्दीन ओवैसी औरंगाबाद दौऱ्यावर येणारImage Credit source: tv9
Follow us
| Updated on: May 08, 2022 | 7:16 PM

औरंगाबाद : राज्यात सध्या हिंदूत्व (Hindutva) , हनुमान चालीसा (Hanuman Chalisa), तसेच राज ठाकरेंना (Raj Thackeray) अयोध्या दौरा चर्चेत असताना आता आणखी एक दौरा आता गाजू लागला आहे. कारण 12 मे रोजी अकरबरुद्दीन ओवैसी औरंगाबाद दौऱ्यावर येत आहेत, अशी माहिती खासदार इम्तियाज जलील यांनी फेसबुकवरून दिली आहे. शैक्षणिक संकुलाचे उद्घाटन ते करणार असल्याचीही फेसबुक पोस्ट करत इम्तियाज जलील यांनी माहिती दिली आहे. त्यांनी ‘आ रहा हूं मै’ या टायटल खाली फेसबुक पोस्ट केली. त्यामुळे अकबरुद्दीन ओवैसी यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर औरंगाबादचे वातावरण पुन्हा तापणार आहे एवढं मात्र नक्की. मला हे जाहीर करताना आनंद होत आहे की AIMIM चे ज्येष्ठ नेते, आमदार आणि संस्थापक अध्यक्ष सालार-ए-मिल्लत एज्युकेशनल ट्रस्ट, हबीब-ए-मिल्लत जनाब अलहाज अकबरुद्दीन ओवेसी साहेब “नकीब-ए-मिल्लत एज्युकेशनल” च्या पायाभरणीसाठी औरंगाबाद येथे येणार आहेत. कॅम्पस (ओवेसी स्कूल ऑफ एक्सलन्सची शाखा – औरंगाबाद) हिमायतबागच्या मागे 12 मे 2022 रोजी संध्याकाळी 4.00 वाजता वंचित मुलांसाठी मोफत शाळा सुरू करत आहोत, अशी पोस्ट त्यांनी केली आहे.

महाराष्ट्रातील पहिली शाखा

तसेच त्या पोस्टमध्ये ते पुढे लिहितात, जनाब अकबरुद्दीन ओवेसी साहेब हैदराबादमध्ये 11 मोफत शाळा चालवतात आणि सर्व खर्च स्वतः उचलतात. त्यांचा शैक्षणिक आणि धर्मादाय ट्रस्ट या शाळांचे व्यवस्थापन करतो जे हजारो मुली आणि महिलांना मोफत व्यावसायिक प्रशिक्षण देण्यासोबतच हजारो मुलांना मोफत शिक्षण देत आहेत. ओवेसी स्कूल ऑफ एक्सलन्सची महाराष्ट्रातील पहिली शाखा औरंगाबादमध्ये असेल, अशी माहितीही त्यांनी या पोस्टद्वारे दिली आहे.

जलील यांची फेसबुक पोस्ट

हे सुद्धा वाचा

आणखी एका दौऱ्याची चर्चा

गेल्या अनेक दिवसात औरंगाबादचे राजकारण राज्याच्या राजकारणाभोवती फिरत आहे. कारण काही दिवसांपूर्वीच औरंगाबादेत राज ठाकरेंची हायव्होल्टेज सभा पार पडली. या सभेवर एमआयएमसह महाविकास आघाडीनेही जोरदार टीका केली. या सभेवेळी राज ठाकरेंनी पुन्हा मशीदीवरील भोंग्याचा मुद्दा उचलून धरत पुन्हा जोरदार बॅटिंग केली. त्यावेळी असुद्दीन ओवैसी यांनीही राज ठाकरेंवर जोरदार टीका केली. तर राज्यात कायदा आणि सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी ही सरकारची आहे. उद्या काहीही झालं तरी त्याला सरकार जबाबदार असेल आणि राज ठाकरे जबाबदार असतील असाही सूर या सभेनंतर पहायाल मिळाला. राज ठाकरे औरंगाबादेत असतानाच असदुद्दीन ओवैसी हेही औरंगाबादेत आल्याने बऱ्याच राजकीय चर्चाही रंगल्या. आता पुन्हा अकबरुद्दीन ओवैसी हे औरंगाबेदत येत असल्याने या सभेचीही बरीच चर्चा आहे.

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.