औरंगाबादेत शाळा पुन्हा बंद, कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेता निर्णय

नव्या नियमानुसार फक्त इयत्ता 10 वी ते 12 चे वर्ग सुरु असणार आहेत. 12 आणि 10 चे वर्ग वगळता सर्व वर्ग बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. (schools Aurangabad city municipal corporation commissioner)

औरंगाबादेत शाळा पुन्हा बंद, कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेता निर्णय
औरंगाबादमधील शाळा बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
Follow us
| Updated on: Feb 18, 2021 | 5:33 PM

औरंगाबाद : राज्यात कोरोना संसर्ग पुन्हा वाढला आहे. या पार्श्वभूमीवर औरंगाबाद शहरातील(Aurangabad   सर्व शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या नव्या नियमानुसार फक्त इयत्ता 10 वी ते 12 चे वर्ग सुरु असणार आहेत. 12 आणि 10 चे वर्ग वगळता सर्व वर्ग बंद ठेवण्याचे आदेश येथील महापालिका आयुक्त आस्तिककुमार पांडे यांनी दिले आहेत. (all the schools of Aurangabad city will be closed ordered municipal corporation commissioner)

कोरोना रुग्णांची सखंख्या पुन्हा एकदा वाढत असल्यामुळे चिंता पुन्हा वाढली आहे. राज्यातील सर्व जिल्ह्यात पुन्हा कोरोना रुग्ण झपाट्याने वाढत आहेत. औरंगाबादेतही कोरोना रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढते आहे. त्यामुळे कोरोनाचा चढता आलेख लक्षात घेता येथील प्रशासन सतर्क झाले आहे. औरंगाबाद माहनगरपालिका आयुक्त आस्तिककुमार पांडे  (astik kumar pandey) यांनी शहरातील सर्व शाळा पुन्हा बंद करण्याचा आदेश दिला आहे. या नव्या आदेशानुसार शहरातील इयत्ता 10 आणि 12 वीचे वर्ग वगळता इतर सर्व वर्ग बंद असणार आहेत. या नव्या आदेशानुसार विद्यार्थ्यांना शाळेत उपस्थित राहण्यापासून सूट देण्यात आली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पालिका आयुक्तांनी हा निर्णय घेतला.

कोरोनाबाधित रुग्णाचे घर सील होणार

औरंगाबादेत कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यामुळे येथील प्रशानने प्रतिबंधात्मक उपायांची अंमबलबजावणी करणे सुरु केले आहे. ज्या व्यक्तीला कोरोनचा संसर्ग झालेला असेल, त्या रुग्णाचे घर औरंगाबादेत सील करण्यात येणार आहे. घर सील करून घरावर स्टिकरही लावण्यात येणार आहे. येथील प्रशासनाने कॉन्टॅक्ट ट्रेसिंगलाही गती दिलेली आहे.

नाशिकमध्येही लग्न सोहळ्यांवर पुन्हा निर्बंध

राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या (Coronavirus patient) पुन्हा झपाट्याने वाढायला लागल्यामुळे नाशिक प्रशासनाकडून एक महत्त्वाची निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार आता नाशिक जिल्ह्यात लग्नसोहळ्यांवर पुन्हा एकदा निर्बंध घालण्यात आले आहेत. त्यामुळे आता लग्नाला फक्त 100 लोकच उपस्थित राहू शकतील. नाशिकचे जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांनी हे आदेश जारी केले आहेत. तसेच आगामी काळात हे निर्बंध आणखी कठोर होऊ शकतात, असे संकेतही त्यांनी दिले आहेत.

इतर बातम्या :

कोरोनाच्या युटर्नमुळे राज्यात धोका वाढला, ‘या’ जिल्ह्यामध्ये घरं सील करण्याचा पालिकेचा निर्णय

लग्नात वऱ्हाडी मंडळी जास्त, तर नवरदेवावर कारवाई होणार!

(all the schools of Aurangabad city will be closed ordered municipal corporation commissioner)

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.