औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील भ्रष्टाचार तसेच कर्मचाऱ्यांवरील अन्यायाविरोधात तीव्र आंदोलन छेडण्यात आले आहे. आंबेडकरी संघटना तसेच विद्यार्थ्यांनी हे आंदोलन छेडले असून आज येथे तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. विद्यापीठाच्या प्रवेशद्वारावर आंदोलकांनी आक्रमक पवित्रा धारण केला होता. विद्यापीठाचा गेट खोलण्यासाठी आंदोलकांनी राडा घातल्याचेही पाहायाला मिळाले.
औरंगाबादमधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ मागील अनेक दिवसांपासून वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत आले आहे. विद्यापीठात वेगवेगळ्या विभागात मोठ्या प्रमाणत भ्रष्टाचार होत असल्याचा आरोप करण्यात येतोय. तसेच काही कर्मचाऱ्यांवर अन्यायदेखील सुरु असल्याचा आरोप आंबेडकरी संघटनांनी घेतला आहे. याच कारणामुळे आंबेडकरी संघटनांनी भ्रष्टाचार तसेच कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाविरोधात आक्रमक पवित्रा धारण करत आंदोलन छेडले आहे. आज विद्यापीठाच्या प्रवेशद्वारावरच आंदोलकांनी राडा घातला. या आंदोलनात शेकडो विद्यार्थी सहभागी झाले होते. या आंदोलनामुळे येथे काही काळासाठी तणावाचे वातावरण निर्माण झाल्याचे पाहायला मिळाले.
तर दुसरीकडे मागील महिन्यात विद्यापीठाच्या जनसंपर्क अधिकाऱ्यावर गंभीर स्वरुपाचे आरोप करण्यात आले होते. विद्यापीठातील जनसंपर्क अधिकाऱ्यावर एका विद्यार्थिनीने विनयभंगाचा आरोप केला होता. त्यानंतर विद्यार्थिनीच्या तक्रारीवरुन जनसंपर्क अधिकाऱ्याविरोधात बेगमपुरा पोलीस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
विद्यार्थिनीने दाखल केलेल्या तक्रारीनुसार जनसंपर्क अधिकारी संजय शिंदे यांनी पीडितेशी अश्लिल चॅटिंग केली होती. हा प्रकार समोर आल्यानंतर विद्यार्थिनीने थेट बेगमपुरा पोलीस ठाणे गाठले होते. तसेच येथे विद्यार्थिनीने तक्रार दाखल केली होती. विद्यार्थिनीने दिलेल्या तक्रारीनुसार जनसंपर्क अधिकारी संजय शिंदे यांच्यावर कलम 354 ड आणि 509 प्रमाणे विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. सध्या शिंदे यांना निलंबित करण्यात आलं आहे.
इतर बातम्या :
जयंत पाटलांकडून फडणवीसांच्या महत्वाकांक्षी प्रकल्पाची पाठराखण! तज्ज्ञांच्या मतावर बोलणं टाळलं
नागपूरच्या निवासी डॉक्टरांचं कामबंद आंदोलन, शैक्षणिक शुल्कमाफीसह केल्या महत्त्वाच्या मागण्या
Mouni Roy | मौनी रॉय लवकरच ‘नवरीबाई’ बनणार, ‘या’ व्यावसायिकाशी बांधणार लग्नगाठ!#MouniRoy | #bollywoodactress | #Entertainment https://t.co/Mof2nzLqPZ
— TV9 Marathi (@TV9Marathi) October 1, 2021
(ambedkarite organization and students protest in aurangabad bamu university against corruption and Injustice on employees)