Amol Kolhe : औरंगजेबाचे उदात्तीकरण कशासाठी? अकबरुद्दीन ओवेसींसोबत माथा टेकणाऱ्या जलील यांना अमोल कोल्हेंचा सवाल

सुरूवातील याचा समाचार शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी जलील यांनी मुलाचं नाव औरंगजेब का ठेवलं नाही? म्हणत या घटनेचा समाचार घेतला. त्यानंतर राष्ट्रवादीची धडाडणारी तोफ खासदार अमोल कोल्हे (Amol Kolhe) यांनीही यावरून खोचक सवाल विचारले आहेत.

Amol Kolhe : औरंगजेबाचे उदात्तीकरण कशासाठी? अकबरुद्दीन ओवेसींसोबत माथा टेकणाऱ्या जलील यांना अमोल कोल्हेंचा सवाल
औरंगजेबाचे उदात्तीकरण कशासाठी? अकबरुद्दीन ओवेसींसोबत माथा टेकणाऱ्या जलील यांना अमोल कोल्हेंचा सवालImage Credit source: tv9
Follow us
| Updated on: May 12, 2022 | 8:47 PM

औरंगाबाद : राज्यात एमआयमचे आमदार अकबरुद्दीन ओवैसी (Akbaruddin Owaisi) आले आणि पुन्हा नवा वाद पेटला आहे. गेल्या काही दिवसांपूर्वीच अकबरुद्दीन ओवैसी एका शाळेच्या उद्घाटनाला औरंगाबादेत येत असल्याचे जलील यांनी सांगितले. मात्र त्यांनी शाळेच्या उद्घाटनाबरोबरच औरंगाबादेतल्या मशीदींनाही बेट दिली आणि फुलं वाहिली, चादर चढवली. मात्र ते तेवढं करून थांबली नाही तर थेट औरंगाबादेतल्या औरंगजेबाच्या कबरीवर (Aurangjeb kabar) पोहोचले आणि तिथ जाऊन त्यांनी चादर चढवली. त्यामुळे आता पुन्हा राजकीय घमासान सुरू झालं आहे. या कृतिवरून इम्तियाज जलील आणि अकबरुद्दीन ओवैसी यांच्यावर सडकून टीका होत आहे. सुरूवातील याचा समाचार शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी जलील यांनी मुलाचं नाव औरंगजेब का ठेवलं नाही? म्हणत या घटनेचा समाचार घेतला. त्यानंतर राष्ट्रवादीची धडाडणारी तोफ खासदार अमोल कोल्हे (Amol Kolhe) यांनीही यावरून खोचक सवाल विचारले आहेत.

काय म्हणाले अमोल कोल्हे?

मला आत्ता समजलं हैदराबादचे एक महाशय औरंगजेबाच्या कबरीवर जाऊन आले. हे अतिशय दुर्दैवी आहे. ज्या औरंजेबाने स्वतःच्या वडिलांना हाल हाल करून मारलं. त्याचं उदात्तीकरण कश्यासाठी..? असा सवाल आता खासदार अमोल कोल्हे यांनी केला आहे. त्यामुळे आता यावर आणखीही राजकीय प्रतिक्रिया उमटणार हे निश्चत झालं आहे. दुपारी चंद्रकांत खैरे यांनीही यावरून खरपूस समाचार घेतला होता. हा बाहेरील नेता चर्चेच राहायला इथे आला आहे. हे लोक हिंदू -मुस्लिम संघर्ष पेटवण्याचे काम करत आहेत. मात्र आता शिवसेनाही गप्प बसणार नाही, आम्ही लोकांना यांची खेळू समाजावून सांगणार आहे. असे ते म्हणाले होते.

भोंग्यावरूनही आवाहन

खासदार अमोल कोल्हे यांनी बोलातना ओवैसी यांचा तर समाचार घेतलाच. मात्र आता भोंग्यांच्या वादावरूनही त्यांनी निशाना साधला आहे. त्यांनी एका शाळकरी पोराचं उदाहर त्यासाठी दिलं आहे. देशात ज्या पद्धतीने वातावरण बदलत चाललं आहे या वातावरणाचा पार्श्वभूमीवर इथं रस्त्यात येताना वाटेत एक भोंग्यांचं दुकान दिसलं. त्यात एक हिरवा भोंगा, एक भगवा भोंगा होता आणि एक रंग नसलेला भोंगा होता. रंग नसलेल्या भोंग्यांकड बघून रंग असलेलं भोंगे त्याला म्हणाले तू तर अडगळीत पडलाय. तेव्हा रंग नसलेला भोंगा म्हणाला आत्ता तुमचं मार्केट आहे, पण मी कोविड सेंटरच्या बाहेर होतो. तेव्हा एक शाळेतला मुलगा आला, तिन्ही भोंगे पाहून भोंगेवाल्याला म्हणाला मला रंग नसलेला भोंगा द्या. शाळेला भेट द्यायचा आहे, त्यातून फक्त जन गण मन ऐकू येईल. आता हातात दगड दिले जातात, दगड भिरकवायचे का रचायचे हे तुम्ही ठरवा, असे म्हणत त्यांनी जनतेला आवाहन केले आहे.

हे सुद्धा वाचा

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.