Amol Kolhe : इतिहासाचा वापर देशहितासाठी व्हावा, द्वेषासाठी नव्हे, खासदार अमोल कोल्हेंचा राज ठाकरेंना टोला

महिला घोरण राबवणारे महाराष्ट्र पाहिलं राज्य आहे. महिला धोरणला तुम्ही जातीवादी रंग देणार, तर ते योग्य होणार नाही, असेही ते म्हणाले आहेत. तर इतिहासाचा वापर हा देशहितासाठी व्हावा, द्वेशासाठी नाही, असा टोला खासदार अमोल कोल्हे यांनी राज ठाकरे यांना लगावला आहे. 

Amol Kolhe : इतिहासाचा वापर देशहितासाठी व्हावा, द्वेषासाठी नव्हे, खासदार अमोल कोल्हेंचा राज ठाकरेंना टोला
इतिहासाचा वापर देशहितासाठी व्हावा, द्वेषासाठी नव्हे, खासदार अमोल कोल्हेंचा राज ठाकरेंना टोलाImage Credit source: tv9
Follow us
| Updated on: May 02, 2022 | 8:44 PM

औरंगाबाद : कालच राज ठाकरेंची (Raj Thackeray) औरंगाबादेत हायव्होल्टेज सभा पार पडली आणि त्यानंतर आता राष्ट्रवादीच्या नेत्यांनी राज ठाकरेंवर टीकेची झोड उडवली आहे. कारण राज ठाकरेंनी काल पुन्हा जातीय राजकारणावरून शरद पवारांवर (Sharad Pawar) हल्लाबोल चढवला. राज ठाकरेंच्या या टीकेला आता राष्ट्रवादी खासदार अमोल कोल्हे (Amol Kolhe) यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. पवार साहेबांवर टीका करणे हे हास्यास्पद आहे. गेल्या 55 वर्षापासून महाराष्ट्राच्या, देशाच्या जडणघडणीत योगदान देणाऱ्या पवार साहेबांवर जेव्हा आरोप होतो, तेव्हा आपल्या वाटलं तथ्य पडताळून पाहिजे, अशी प्रतिक्रिया अमोल कोल्हे यांनी दिली आहे. पवार साहेबांच्या काळामध्ये स्थानिक स्वराज संस्थान मध्ये 55 टक्के आरक्षण देणारे महाराष्ट्र पहिलं राज्य आहे. महिला घोरण राबवणारे महाराष्ट्र पाहिलं राज्य आहे. महिला धोरणला तुम्ही जातीवादी रंग देणार, तर ते योग्य होणार नाही, असेही ते म्हणाले आहेत. तर इतिहासाचा वापर हा देशहितासाठी व्हावा, द्वेशासाठी नाही, असा टोला खासदार अमोल कोल्हे यांनी राज ठाकरे यांना लगावला आहे.

चुकीचं नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यपीठला नाव देणाऱ्या पवारसाहेबांना तुम्ही जातीयवादी म्हणता, तेस त्यांनी प्रबोधनकार ठाकरे यांचे समग्रवान वाचावे, ज्यामध्ये जातीचा उल्लेख आहे, असा सल्लाही त्यांनी दिला आहे. कुठे तरी चुकीचं नेरेटिव्ह सेट करणं हा प्रयत्न आहे, मला वाटतं पवार साहेबांवर आरोप करत असताना एक गोष्ट लक्षात घेतलं पाहिजे, स्व. यशवंतराव चव्हाण साहेबांनी जेव्हा उद्योग स्नेही धोरण सुरू केलं, महाराष्ट्रात पहिली एमआयडीसी झाली. या नोकऱ्या देताना कोणी जाती धर्माचा विचार केला नाही, असेही त्यांनी सांगितले. पवार साहेब कृषिमंत्री असताना देश पहिल्यांदा अन्नपूर्ण झाला, असेही कोल्हे यांनी सांगितले.

महाराज्यांच्या समाधीबाबत काय म्हणाले?

तसेच महाराजांची समाधी कुणी बांधली याबाबत बोलताना, कुठे तरी त्यांच्या फिडमध्ये गडबड झालेली असू सकते, कारण सोशल मीडियावर कालपासून बघत असल अनेक समाज संशोधकाने पुरावे दिले आहेत. रायगडावर महाराजांच्या समाधी 1869 साली ही महात्माफुले यांनी पहिल्यांदा शोधली, शिवजयंती महात्मा फुले आदींनी सुरू केली, पुण्यामध्ये पहिला छत्रपती शिवाजी महाराज्यांचा पुळळा उभा करण्यात आला. ब्रिटिश सरकारने समाधी बाधण्यासाठी पुढाकार घेतला होता. महाराजांच्या समाधीबद्दल फीड चुकीचं देण्यात आलं, असेही कोल्हे म्हणाले आहेत. तसेच मला यावर भाष्य करण्याचं गरज नाही. हा जो इतिहास आहे. इतिहास तरखांच्या आधारे बोलायचा असतो, असेही कोल्हे म्हणाले आहेत.

हे सुद्धा वाचा

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.