औरंगबादेत बनावट कागदपत्रांनी 12 जणांना नोकरी, मोठ्या रॅकेटचे धागेदोरे सापडणार?
औरंगाबाद महापालिकेत चक्क बनावट नियुक्तीपत्र तयार करुन 12 जणांना नोकरी देण्यात आली आहे. (aurangabad municipal corporation job false document)
औरंगाबाद : भरती प्रक्रिया राबवली जात नसल्यामुळे एकीकडे तरुण त्रासलेले असताना औरंगाबाद महापालिकेत एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. औरंगाबाद महापालिकेत चक्क बनावट नियुक्तीपत्र तयार करुन 12 जणांना नोकरी देण्यात आलीये. महापालिकेच्या अग्निशमन विभागात हा प्रकार घडला आहे. या बनावट नियुक्तीपत्र प्रकरणी सिटी चौक पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आलीये. (Aurangabad 12 man got job in Municipal Corporation by providing false document)
महापालिका आयुक्तांनीच भंडाफोड केला
औरंगाबाद महापिलेक सध्या अनेक जागा रिक्त आहेत. याच गोष्टीचा फायदा घेत महापालिकेच्या अग्निशमन विभागात बनावट नियुक्तीपत्र तयार करुन एकूण 12 जणांना नोकरी देण्यात आली. त्यासाठी बनावट लेटरहेड तसेच माहापाकिका आयुक्तांची बनावट सही तयार करण्यात आली. माहापालिका आयुक्तांनीच हा बोगस नोकरी मिळवण्याचा प्रकार बाहेर आणला आहे. संशय आल्यानंतर मनपा अयुक्तांनी चौकशी करण्याचे आदेश दिले होते. या चौकशीतून एकूण 12 जणांनी नोकरी मिळविण्यासाठी बनावट कागदपत्र तयार केल्याचे समोर आले.
हा प्रकार समोर येताच या बारा जणांवर सिटी चौक पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. दरम्यान, 12 जणांचा भंडाफोड झाल्यामुळे सध्या औरंगाबादेत खळबळ उडाली असून फक्त 12 जणांनीच बनावट कागदपत्रांच्या आधारे नोकरी मिलवली? की बनावट कागपत्रं तयार करण्याचं हे जाळं आणखी विस्तारलेलं आहे, याचा तपास शहर पोलीस करत आहेत. त्यानंतर हा बनावट नोकऱ्यांचा प्रकार समोर आल्यामुळे तरुणांकडून चीड व्यक्त केली जात आहे.
औरंगाबादेत गर्दीच्या ठिकाणी लॉकडाऊन
कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असल्यामुळे औरंगाबाद प्रशासनाने 4 मार्च रोजी एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. औरंगाबादमधील गर्दीच्या भागांमध्ये पुन्हा लॉकडाऊन (Lockdown) करण्यात आला आहे. पैठण गेट, गुलमंडी, कॅनॉट प्लेस, जाधवमंडी हे औरंगाबादमधील सर्वाधिक गर्दी होणारे परिसर मानले जातात. या गर्दीमुळे जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याचे दिसून आले आहे. परिणामी स्थानिक प्रशासनाने या भागांमध्ये लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, इतर परिसरांमध्येही कडक निर्बंध लागू असतील, असे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले
इतर बातम्या :
राष्ट्रवादीच्या जेलमधील आमदाराला आता ईडी अटक करुन मुंबईत आणणार
OMG : 11 वीच्या विद्यार्थ्याने मेसेजवर केलं प्रपोज, उत्तर वाचून पोट धरून हसाल
(Aurangabad 12 man got job in Municipal Corporation by providing false document)