Aurangabad | औरंगाबादेत भोंग्यांवरून पहिला गुन्हा दाखल, सातारा पोलीस ठाण्याच्या हद्दीत काय घडला प्रकार?

सातारा पोलीस स्टेशन हद्दीतील मशिदीकडे भोंग्याचे तोंड करून एकाने गाणे वाजवले. यामुळे दोन समजात तेढ आणि वादाची स्थिती निर्माण झाली होती.

Aurangabad | औरंगाबादेत भोंग्यांवरून पहिला गुन्हा दाखल, सातारा पोलीस ठाण्याच्या हद्दीत काय घडला प्रकार?
Image Credit source: TV9 Marathi
Follow us
| Updated on: Apr 25, 2022 | 4:34 PM

औरंगाबादः राज्य सरकारने एकिकडे भोंगे (Loudspeakers) हटवायचे की नाही, यावरून भूमिका स्पष्ट केली तर इकडे औरंगाबादेत भोंग्यांवरून पहिला गुन्हा दाखल झाला आहे. शहरातील सातारा पोलीस स्टेशनच्या (Satara police station) हद्दीत भोंग्यांवरून दोन समाजात तेढ निर्माण करणारी घटना घडल्याने पोलिसांनी (Aurangabad police) तत्काळ कारवाई करत एका आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला आहे. मशिदीकडे भोंग्याचे तोंड वरून त्यावर गाणे वाजवल्याप्रकरणी पोलिसांनी ही कारवाई केल्याची माहिती हाती आली आहे. 03 मे पूर्वी राज्यातील सर्व मशिदींवरील भोंगे उतरवण्यात यावेत, असा इशारा राज ठाकरे यांनी दिला होता. त्यानंतर औरंगाबाद पोलिसांनी सर्वच धार्मिक स्थळांवरील भोंगे अधिकृत घेण्यासंदर्भातील आदेश जारी केले होते. त्यानंतरही सातारा पोलीस स्टेशन परिसरात ही घटना घडल्यानंतर पोलिसांनी तत्काळ कारवाई केल्याचे दिसून येत आहे.

काय घडली घटना?

नुकत्याच घडलेल्या या घटनेत प्राथमिक स्तरावर हाती आलेल्या माहितीनुसार, सातारा पोलीस स्टेशन हद्दीतील मशिदीकडे भोंग्याचे तोंड करून एकाने गाणे वाजवले. यामुळे दोन समजात तेढ आणि वादाची स्थिती निर्माण झाली होती. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करत परिस्थिती नियंत्रणात आणली. रेल्वे पोलीस दलातील कर्मचाऱ्याने मिशीदीकडे तोंड करून अशा प्रकारचे भोंगे लावून गाणे वाजवले होते. या कर्मचाऱ्याविरोधात पोलिसांनी आता कारवाई केली आहे. किशोर गंडापा मलकूनाईक असं आरोपीचं नाव आहे.

औरंगाबाद पोलिसांसमोर आव्हान

येत्या 01 मे रोजी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची औरंगाबादमध्ये भव्य सभा आयोजित करण्यात आली आहे. तत्पुर्वी राज ठाकरे यांनी 03 मे पर्यंत राज्यातील सर्व मशिदींवरील भोंगे हटवण्याचा इशारा दिला आहे. तसेच 03 मे रोजी रमजान ईददेखील आहे. या सर्व पार्श्वभूमीवर शहरातील शांतता व सुव्यवस्था राखण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे. राज ठाकरेंनी सभेची तारीख बदलावी, अशी विनंती पोलिसांनी केलीय. पण मनसे सभेचे ठिकाण आणि तारखेवर ठाम आहे. तसेच भोंगे हटवण्याच्या इशाऱ्यावरही आपण ठाम असल्याचं मनसेनं नुकतंच जाहीर केलं आहे. त्यामुळे येत्या काही दिवसात शहरातील शांतता व सुव्यवस्था राखण्याचं मोठं आव्हान औरंगाबाद पोलिसांसमोर आहे.

इतर बातम्या-

Pune MNS : राज्यात सुरू झालेलं भारनियमन सरकारचं अपयश, मनसेचा आरोप; पुण्यात महावितरण कार्यालयाबाहेर आंदोलन

IPL 2022: Mumbai Indians ची टीम अजूनही Play off मध्ये क्वालिफाय करु शकते का? जाणून घ्या संपूर्ण गणित

Non Stop LIVE Update
बटेंगे तो कटेंगेच्या वक्तव्यावरून पंकजा मुंडेंचा यू-टर्न? म्हणाल्या...
बटेंगे तो कटेंगेच्या वक्तव्यावरून पंकजा मुंडेंचा यू-टर्न? म्हणाल्या....
'पंकजाताईंनी मोठ मन केल म्हणून मी...', सभेतून धनंजय मुंडे काय म्हणाले?
'पंकजाताईंनी मोठ मन केल म्हणून मी...', सभेतून धनंजय मुंडे काय म्हणाले?.
चित्रपटात काम केलं असत.., सदा सरवणकरांच्या मुलीचा अमित ठाकरेंना टोला
चित्रपटात काम केलं असत.., सदा सरवणकरांच्या मुलीचा अमित ठाकरेंना टोला.
'रामदास कदम सरपटणारा साप, निवडणुकीनंतर...',ठाकरे गटाच्या नेत्याची टीका
'रामदास कदम सरपटणारा साप, निवडणुकीनंतर...',ठाकरे गटाच्या नेत्याची टीका.
'राणे पिता-पुत्र हे गाडग्यासारखे..', ठाकरे गटाच्या बड्या नेत्याची टीका
'राणे पिता-पुत्र हे गाडग्यासारखे..', ठाकरे गटाच्या बड्या नेत्याची टीका.
भाजपच्या किती जागा येणार?,कोण होणार CM?; विनोद तावडेंनी थेट सांगितलं..
भाजपच्या किती जागा येणार?,कोण होणार CM?; विनोद तावडेंनी थेट सांगितलं...
डोंबिवलीत भाजपचं कार्यालय फोडल, कोणी केल्ला हल्ला? घटना CCTV मध्ये कैद
डोंबिवलीत भाजपचं कार्यालय फोडल, कोणी केल्ला हल्ला? घटना CCTV मध्ये कैद.
एकनाथ शिंदेंच्या आमदारानं पैसे वाटले? विधानसभेच्या तोंडावर अडचणी वाढल्
एकनाथ शिंदेंच्या आमदारानं पैसे वाटले? विधानसभेच्या तोंडावर अडचणी वाढल्.
पंकजा मुंडेंकडून भाऊ धनंजय मुंडेंना खास गिफ्ट, सभेतून काय केली घोषणा?
पंकजा मुंडेंकडून भाऊ धनंजय मुंडेंना खास गिफ्ट, सभेतून काय केली घोषणा?.
पवार कुटुंबातील कटुता भविष्यात दूर होणार? अजित पवारांचं मोठं वक्तव्य
पवार कुटुंबातील कटुता भविष्यात दूर होणार? अजित पवारांचं मोठं वक्तव्य.